Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

भारतीय संरक्षण यंत्रणा आणि संघटना

Defence Mechanism and Organization of India

Rs.275.00

देशाचे संरक्षण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जशी सैन्यदलाची गरज असते. त्याचप्रमाणे सैन्याला दिशा देण्यासाठी संघटनेची गरज असते आणि ही संघटना उत्तम अशा प्रशासनाचा मूलभूत स्वरूपाचा पाया समजला जातो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही तिन्ही सेनादलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिघांचीही भूमिका स्वागतार्ह अशी आहे. यातील एकाही दलाचा निर्णय चुकल्यास राष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागते. कुशलता आणि चातुर्य लाभलेल्या संरक्षक घटकास चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही प्राप्त झालेले असते. भारताच्या तिन्ही दलांमध्ये चांगल्या लष्करी संघटनेसाठी उद्देश, सहकार्य, लवचिकता, समतोलपणा, काटकसर, विकेंद्रीकरण, प्रयत्नाची एकता आणि अचूकपणा या तत्त्व समरसून भरलेले आहे असल्यामुळे आज तिन्ही दले भारताची मान जगात उंचावताना दिसून येते. सावध भूमिका घेतानाच वेळप्रसंगी आक्रमकपणाचेही दर्शन तिन्ही दलांनी विविध प्रसंगी घेतलेल्या भूमिकांवरून दिसून येते.

प्रकरण 1 : लष्करी संघटना
अ) लष्करी संघटना : लष्करी संघटनेची तत्त्वे, प्रस्तावना, उद्देश, सहकार्य, लवचिकता, काटकसरपणा, अचूकता ब) लष्करी प्रशासन : लष्करी प्रशासनाची तत्त्वे, प्रस्तावना, दूरदृष्टी, लवचिकता, अर्थव्यवस्था, साधेपणा, सहकार्य

प्रकरण 2 : भारताची उच्चस्तरीय संरक्षण संघटना
प्रस्तावना, सैन्याच्या संदर्भातील राष्ट्रपतींचे अधिकार, संसद आणि सशस्त्र दले, केंद्रिय मंत्रीमंडळाची सुरक्षा समिती, राष्ट्रीय सुरक्षा समिती (एनएससी)

प्रकरण 3 : भारतीय सशस्त्र सैन्यांचे संघटन
प्रस्तावना, सेनाध्यक्ष समिती, भूसेना प्रमुख कार्यालयाची रचना व संघटना, नौसेना प्रमुख कार्यालयाची रचना व संघटना, हवाईसेना प्रमुख कार्यालयाची रचना व संघटना, भूसेना कमांड कार्यालयाची रचना व संघटना, नौसेना कमांड कार्यालयाची रचना व संघटना, हवाईसेना कमांड कार्यालयाची रचना व संघटना, सामरिक सेना कमांड

प्रकरण 4 : पायदळ
अ) पायदळ : प्रस्तावना, वैशिष्टे, भूमिका किंवा कार्य आणि मर्यादा, पायदळ डिव्हिजन व बटालियनची संघटना ब) चिलखतीदळ किंवा रणगाडा दल आणि तोफखाना : प्रस्तावना, वैशिष्टे, भूमिका किंवा कार्य आणि मर्यादा, संघटना

प्रकरण 5 : पुरवठा सेवा
प्रस्तावना, सेना दारूगोळा विभागाची शांतता व युद्ध काळातील भूमिका किंवा कार्ये, सेना मेडिकल विभागाची शांतता व युद्ध काळातील भूमिका किंवा कार्ये, इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल इंजिनियर विभागाची शांतता व युद्ध काळातील भूमिका किंवा कार्ये, सेना सेवा विभाग

प्रकरण 6 : भारतीय नौदल आणि हवाईदल
प्रस्तावना, भारतीय नौदल-लढाऊ जहाजांचे प्रकार व कार्ये, विमानवाहू जहाज, पाणबुडी, भारतीय हवाईदल-विमानांचे प्रकार व कार्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय संरक्षण यंत्रणा आणि संघटना”
Shopping cart