Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

प्राचीन

प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)

History of Ancient India (3000 BC to 1200 CE)

Rs.325.00

प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.

Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)

  1. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने : 1) वाङ्मयीन साधने – अ) धर्मग्रंथ : वैदिक धर्मग्रंथ – वेद, ब्राह्यण व उपनिषद ग्रंथ, सूत्रे व वेदांगे, महाकाव्ये, पुराणे, स्मृती. अवैदिक धर्मग्रंथ- बौद्ध ग्रंथ, जैन वाङ्मय. ब) इतर वाङ्मय – 1) ऐतिहासिक वाङ्मय 2) चरित्रात्मक वाङ्मय व 3) ललित वाङ्मय
  2. हडप्पा किंवा सिंधू संस्कृती : अ) सिंधू संस्कृती – 1) संस्कृतीचा शोध 2) या संस्कृतीचा काळ सिंधु संस्कृतीचा उदय – संस्कृतीचा विकास, ताम्राश्मयुगीन संस्कृती, नागर संस्कृती 3) सिंधुपुत्र कोणत्या वंशाचे? – 1. द्रविड 2. सुमेरियन 3. मिश्रजातीचे लोक, संशोधनातील अडचणी. ब) शहर नियोजन – 1. नगररचना 2. गृहरचना 3. सांडपाण्याची व्यवस्था 4. विहिरी 5. महास्नानगृह क) शेती, हस्तउद्योग व व्यापार
  3. पूर्व वैदिक काळ : नव्या युगास प्रारंभ – आर्यांचा राज्यविस्तार; वैदिक वाङ्मय अ) राजकीय व्यवस्था – 1. राज्य विभाग 2. राजा – राजाची कर्तव्ये 3. पुरोहित 4. सेनापती 5. सभा व समिती, न्यायव्यवस्था. ब) सामाजिक जीवन – (अ) कुटुंब व्यवस्था (ब) स्त्रियांचे स्थान (क) विवाह संस्था (ड) आहार
  4. धर्मक्रांतीचे युग (इ.स.पूर्व 6 वे शतक) : जैन धर्म व बौद्ध धर्म, धर्माच्या उदयाची कारणे, जैन धर्म – भगवान पार्श्वनाथ, भगवान महावीर, महावीराचे प्रारंभिक जीवन, महावीराचा गृहत्याग आणि ज्ञानप्राप्ती, भगवान महावीरांची शिकवण – रत्नत्रय, पंचाणुव्रते, आत्मा, वेद अमान्य, आचरणावर अधिक भर
  5. मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ : मौर्यकाळाची माहिती देणारी साधने, चंद्रगुप्ताचे कुल – हीन कुल, उच्च कुल.चंद्रगुप्ताचे जीवन – बालपण, चंद्रगुप्ताचे बंड, चाणक्याची भेट, विजयाचा अयशस्वी प्रयत्न, सिकंदरची भेट, विजयाकडे कूच, साम्राज्यविस्तार, सेल्यूकस निकेटरशी झुंज, मृत्यू.
  6. गुप्त साम्राज्य : अ) गुप्त साम्राज्य – श्रीगुप्त घटोत्कच 1) पहिला चंद्रगुप्त 2) समुद्रगुप्त – समुद्रगुप्ताचा दिग्विजय, दक्षिण विजय, उत्तरेकडे बंड, समुद्रगुप्ताची योग्यता 3) दुसरा चंद्रगुप्त उर्फ विक्रमादित्य – रामगुप्त, शकांशी टक्कर, शक स्वारीचे परिणाम, मेहेरौली लोहस्तंभावरील चंद्र राजा, वैवाहिक संबंध
  7. वर्धन घराणे : अ) वर्धन घराण्याचा पूर्वेतिहास – प्रभाकर वर्धन, राज्यवर्धन; सम्राट हर्षवर्धन – हर्षवर्धनपुढील संकटे, राजश्रीची सुटका, शत्रूचा नि:पात, साम्राज्य विस्तार, दक्षिणेतून माघार, पश्चिम भारतावर स्वारी, हर्षाची राज्यव्यवस्था – केंद्रीय प्रशासन ब) धार्मिक धोरण, हर्षाची योग्यता – विद्या व कलाप्रेमी
  8. दक्षिण भारत : अ) राष्ट्रकूट घराणे – दन्तिदुर्ग, कृष्ण पहिला, गोविंद दुसरा, धु्रव, गोविंद तिसरा (जंगतुंग), अमोघ वर्ष, कृष्ण द्वितीय, इंद्र तिसरा, कृष्ण तिसरा. राष्ट्रकूट कालीन प्रशासन – राजा, मंत्रिपरिषद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)”
Shopping cart