Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)

History of India (1750 A.D. to 1857 A.D.)

Rs.275.00

प्राचीन काळापासून भारताचे पाश्चिमात्य देशांशी व्यापारी संबंध होते. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात भारतीय समाज एकसंघ नव्हता तो अनेक गटात विखुरलेला होता. निरनिराळ्या जातींच्या गटात रोटी-बेटी व्यवहार बंद होते. तरी देखील आर्थिक क्षेत्रात भारत संपूर्ण जगात संपन्न राष्ट्र गणले जात होते. भारतातील राजकीय स्थिती अनुकूल असल्याने इ.स. 1526 मध्ये बाबरने सुलतान इब्राहीम खान लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुगलांच्या सततच्या आक्रमणाने भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर 1757 ते 1857 या काळात त्यांनी अनेक बदल केले. मात्र प्रशासकीय व कायदेशीर सुधारणा राबवत असतांना आपल्या स्वार्थाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर पन्नास वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे समीकरण बिघडून हजारो लाखो कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाची अक्षरक्ष: वाताहत झाली. याची परिणती 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाली, पण त्यात अपयश आले.
प्रस्तुत पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे.

Bharatacha Itihas – Ad 1750 to 1857

– डॉ. गोकूळ पाटील

  1. 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील सामाजिक-राजकीय परिस्थिती : 1.1 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील सामाजिक परिस्थिती, 1.2 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय परिस्थिती, 1.3 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील आर्थिक परिस्थिती
  2. वसाहतीक सत्तांचा विस्तार आणि एकत्रीकरण : 2.1 व्यापारवाद आणि बंगालमधील ब्रिटीशांचा व्यापार, 2.2 भारतात ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विस्तार – 1) बंगाल 2) अवध 3) म्हैसूर 4) मराठा
  3. ब्रिटीश काळातील कायदेशीर सुधारणा आणि विचारधारा : 3.1 द्विदल राज्यपद्धती (बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था), 3.2 इ.स. 1773 चा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, 3.3 इ.स. 1784 चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट, 3.4 राजा राममोहन रॉय यांची विचारधारा, 3.5 शिक्षण
  4. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था : 4.1 ब्रिटीश सरकारच्या जमीन महसूल पद्धती, 4.2 भारतीय अर्थव्यवस्थेचे ग्रामिणीकरण, 4.3 शेतीचे व्यापारीकरण, 4.4 दुष्काळ धोरण, 4.5 कंपनी शासनाचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम
  5. भारतातील व्यापार आणि उद्योग : 5.1 हस्तउद्योगांचे अनौद्योगिकरण, 5.2 संपत्तीचे शोषण, 5.3 आधुनिक उद्योगांचा विकास
  6. ब्रिटीश सत्तेविरूद्ध लोकप्रिय प्रतिकार : 6.1 कंपनीच्या सत्तेला 1857 पूर्वी झालेला जनविरोध, 6.2 इ.स. 1857 चा उठाव – अ) 1857 च्या उठावाची कारणे, ब) उठावाची सुरूवात आणि उठावाची वाटचाल, क) इ.स. 1857 च्या उठावाचे स्वरूप, ड) इ.स.1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे, ई) इ.स. 1857 च्या उठावाचे परिणाम

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)”
Shopping cart