Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

आधुनिक भारताचा इतिहास (1857 ते 1950)

History of Modern India (1857 to 1950)

, ,

Rs.350.00

भारताच्या घटनात्मक विकासाला ब्रिटिश काळातच सुरूवात झाली होती. ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने भारतीयांना राजकीय हक्क बहाल केले. त्याची सुरूवात 1990 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याने आधीच झाली होती. या कायद्यांना राजकीय सुधारणांचे हप्ते असेही म्हटले जाते. मोर्लेे-मिंटो कायद्यानंतरचा टप्पा म्हणजे 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होय. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या प्रस्थापनेबरोबर भारतीयांच्या आर्थिक शोषणाला प्रारंभ झाला. भारतीय समाजसुधारकांनी भारतीयांमध्ये विवेकवाद, वैज्ञानिकता, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही या आधुनिक कल्पना रुजविण्यास प्रारंभ केला. 1942 च्या चले जाव चळवळीने भारतीयांमध्ये मोठे चैतन्य निर्माण केले. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या अचाट कार्याने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला सुरुंग लागला. पिंरणामी संपूर्ण स्वातंत्र्याकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म ही भारतीय राजकारणातील क्लेशदायी आणि विवादास्पद घटना ठरली.

Adhunik Bharatacha Itihas (1857 te 1950)

  1. संकल्पनात्मक अभ्यास : 1. द्विदल राज्यपद्धती, 2. होमरूल, 3. आर्थिक निःसारणाचा सिध्दांत, 4. आधुनिकत्व, 5. कायद्याचे राज्य, 6. जन चळवळ, 7. सत्याग्रह, 8. राष्ट्रवाद, 9. शरणार्थी, 10. जमातवाद
  2. 1857 चा उठाव : 1. कारणे, प्रसार आणि परिणाम, 2. उठावासंबंधी विविध मते, 3. अपयशाची कारणे
  3. सामाजिक आणि धार्मिक चळवळी : 1. ब्राह्मो समाज, 2. आर्य समाज, 3. प्रार्थना समाज, 4. थिऑसॉफिकल सोसायटी, 5. सत्यशोधक समाज
  4. भारतीय राष्ट्रवाद : 1. राष्ट्रवादाचा उदय व विकास, 2. राष्ट्रीय सभेची स्थापना, 3. मवाळ व जहाल गट, 4. सशस्त्र क्रांतीकारी चळवळी, अ) अभिनव भारत, ब) गदर, क) अनुशीलन समिती, ड) युगांतर, इ) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
  5. ब्रिटिशांचे प्रशासकीय धोरण : 1. शिक्षण, 2. वृत्तपत्रे, 3. दुष्काळ, 4. स्थानिक स्वराज्य संस्था, 5. जमीन महसूल विषयक धोरण
  6. म. गांधीजी आणि राष्ट्रीय चळवळ : 1. तत्त्वज्ञान, 2. असहकार आंदोलन, 3. सविनय कायदेभंग चळवळ, 4. चले जाव आंदोलन
  7. जमातवादाचा उदय आणि विकास : 1. मुस्लिम लिग, 2. खिलाफत चळवळ, 3. द्विराष्ट्र सिध्दांत, 4. फाळणी
  8. घटनात्मक विकास आणि सत्तांतर : 1. मोर्ले-मिंटो कायदा- 1909, 2. माँटेग्यु-चेम्सफोर्ड कायदा- 1919, 3. प्रांतीक स्वायत्तता- 1935, 4. 1942 ते 1946 या काळातील सत्तांतर विषयक विविध योजना, अ) क्रिप्स योजना, ब) वेव्हेल योजना, क) कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना), 5. सत्तांतर, अ) माऊंट बॅटन योजना, ब) 1947 चा हिंदुस्थान विषयक स्वातंत्र्याचा कायदा
  9. वंचितांच्या चळवळी : 1. स्त्रीयांच्या उत्थापनाचे प्रयत्न, 2. शेतकर्‍यांच्या चळवळी, 3. आदिवासी चळवळ, 4. कामगार चळवळ, 5. दलित चळवळ
  10. स्वातंत्र्योत्तर भारत : 1. फाळणीचे परिणाम, 2. संस्थानांचे विलिनीकरण, अ) हैद्राबाद, ब) जुनागढ, क) काश्मीर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक भारताचा इतिहास (1857 ते 1950)”
Shopping cart