Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

Sold Out

आधुनिक भारताचा इतिहास (सन 1757 ते 1857)

History of Modern India (1757 to 1857)

,

Rs.250.00

Out of stock

आधुनिक भारताचा हा कालखंड अनेक स्थित्यंतरे व प्रचंड उलथापालथीचा होता. या कालखंडात राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, वैचारिक बदल घडून आलेत या बदलाचे भारताच्या राजकीय पटलावर जे परिणाम झालेत ते दूरगामी स्वरुपाचे दिसून येतात.

अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते 1857 पर्यंत भारतात इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. ही परकीय राजसत्ता कशी प्रस्थापित झाली व कशी दृढमूल झाली याची माहिती घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ते इंग्रजी शासनाचा तपशील दिला आहे. या कालावधीत एकीकडे इंग्रज साम्राज्यवादी सत्तेची मुठ हिंदुस्थान भोवती आवळत गेले, तर दुसरीकडे भारतात आधुनिक मूल्ये रुजू लागली.

सन 1757 ते 1857 हा काळ आधुनिक भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भारतीयांचा परकीयांशी आलेला संबंध त्यांनी केलेले आर्थिक शोषण, त्याच बरोबर भारतात प्रबोधनाच्या दृष्टीने आधुनिक पर्वास झालेला प्रारंभ याचा या ग्रंथात साकल्याने विचार केला आहे.

Adhunik Bharatacha Itihas (1757 te 1857)

विभाग पहिले (सत्र पहिलेदुसरे)

  1. प्लाशीच्या युद्धावेळची भारताची राजकिय परिस्थिती-थोडक्यात आढावा : अ) प्लाशीच्या युद्धाची कारणे, ब) प्लाशीच्या युद्धाचा वृत्तांत, क) प्लाशीच्या युद्धाचे परिणाम, ड) बक्सारच्या युद्धाची कारणे, इ) बक्सारचे युद्ध, बक्सार लढाईचे महत्त्व / परिणाम
  2. भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना : 1) रॉबर्ट क्लाईव्ह, 2) बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था, 3) दुहेरी राज्यव्यवस्थेचे अपयश, 4) दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम
  3. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनातील भारत : 1) नियमनाचा कायदा – 1773, 2) पिट्सचा कायदा – 1784, 3) जमिन महसुल धोरण, 4) कायमधारा पद्धती – 1793
  4. ईस्ट इंडिया कंपनी व भारतीय एतद्देशीय सत्ता यांचे संबंध : 1) म्हैसुर सत्ता – पहिले म्हैसुर युद्ध 1767 ते 1769, दुसरे म्हैसुर युद्ध 1780 ते 1784, तिसरे म्हैसुर युद्ध 1790 ते 1792, चौथे म्हैसुर युद्ध 1799, 2) मराठा संबंध – अ) पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782, ब) दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1802 ते 1807, क) तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1818, 3) शिख संबंध – पहिले व दुसरे शिख युद्ध, 4) अवध संबंध

विभाग दुसरा (सत्र दुसरे)

  1. विस्तारवादी धोरण : 1) लॉर्ड वेलस्ली व त्यांचे सहाय्यक मैत्री करार धोरण (तैनाती फौज), 2) डलहौसी – खालसा धोरण व विलीनीकरणाचे धोरण, 3) विल्यम बेंटीक व डलहौसीच्या सुधारणा
  2. भारतविषयक आर्थिक धोरण : औद्योगिक व व्यापार विषयक धोरण, हस्तोद्योगांचा विनाश, मुक्त व्यापार, जकात धोरण, भारताचे आर्थिक धोरण
  3. भारतीय प्रबोधन : राजा राममोहन रॉय यांची भुमिका
  4. 1857 चा उठाव : उठावाची कारणे, उठावाचे परिणाम

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक भारताचा इतिहास (सन 1757 ते 1857)”
Shopping cart