Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)

History of Mughal India (1526 to 1707)

Rs.375.00

जहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Mogalkalin Bhartacha Ithihas (1526 te 1707)

  1. इतिहासाची साधने : इतिहासाची साधने, पुरातत्वीय साधने, परकीय प्रवाशांचे वृत्तांत, मुघल काळातील प्रमुख इतिहासकार, मुघलकालीन इतिहास लेखन.
  2. जहिरूद्दीन मोहम्मद बाबर : जन्म व बालपण, फरगणा प्रांताचा राजा, काबुलचा राजा, बाबरांची युद्धप्रणाली, बाबरांच्या भारतावर स्वार्‍या, हिंदुस्थानावरील स्वारीची कारणे, बाबरांच्या आगमनाच्यावेळी भारताची स्थिती, दक्षिण हिंदुस्थान, मोगल साम्राज्याची स्थापना, पानिपतच्या युद्धाचे परिणाम व महत्त्व, खानुआ युद्ध-परिणाम, बाबराचा मृत्यू.
  3. सम्राट हुमायून : राज्यारोहण, हुमायूनच्या अडचणी, हुमायूनची कामगिरी, हुमायून व शेरशहांचा संघर्ष, हुमायून यांच्या अपयशाची कारणे, हुमायून यांची भ्रमणगाथा, हुमायूनची योग्यता.
  4. शेरशहा सूरी : शेरशहांचे प्रारंभिक विजय, सम्राट शेरशहा सूरी यांची कामगिरी, शेरशहांचा साम्राज्यविस्तार, शेरशहांचे प्रशासन, जमिन महसूलमधील पूर्वीचे दोष, शेरशहांनी केलेल्या सुधारणा, शेरशहांची योग्यता, शेरशहांच्या कार्याचे मुल्यांकन, शेरशहांचे उत्तराधिकारी.
  5. सम्राट जलालुद्दीन महंमद अकबर : राज्यारोहण, अकबरांपुढील समस्या, पानिपतचे दुसरे युद्ध-परिणाम, दिल्ली आणि आग्र्यावर ताबा, बैरामखानांची कामगिरी व त्यांचे पतन, अकबरांचा साम्राज्यविस्तार, अकबरांचे राजपूतविषयक धोरण, राजपूत नीतीचे परिणाम, अकबरांचे हिंदूंबद्दलचे धोरण, अकबरांचे धार्मिक धोरण, दिन-ए-इलाहीचा प्रसार, अकबर राष्ट्रीय शासक, अकबरांचा नवरत्न दरबार, दरबार, सम्राट अकबरांची प्रशासन व्यवस्था, प्रांतीय व्यवस्था, जिल्हा किंवा सरकार प्रशासन, परगणा प्रशासन, ग्राम प्रशासन, मनसबदारी पद्धती सैन्यव्यवस्था, न्याय व्यवस्था, अकबरांनी केलेल्या सुधारणा
  6. सम्राट जहांगीर : सलीमचे बंड, जहांगीरच्या बारा आज्ञा, राजपूत विद्रोह, जहांगीर यांचा साम्राज्य विस्तार. नूरजहाँ-नूरजहाँची कारकीर्द, शहजहानचे बंड, महाबतखानाचे बंड, नूरजहाँची योग्यता, जहांगीर यांचे धार्मिक धोरण, योग्यता.
  7. अबुल मुजफ्फर शहाबुद्दीन मुहम्मंद शहाजहान : शहाजहान यांचा राज्याभिषेक, शहाजहान यांच्या शासन काळातील महत्त्वाच्या घटना, शहाजहान यांचे दक्षिण धोरण, शहाजहान व गोवळकोंडा, शहाजहान व विजापूर, दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेबांची कामगिरी, शहाजहान यांचे मध्य आशियाई धोरण, शहाजहान यांचे वायव्य सरहद्द धोरण, शहाजहान यांची कारकीर्द व मोगल साम्राज्याचे सुवर्ण युग, शहाजहान यांच्या कारकीर्दीतील वारसा युद्ध कारणे- युद्धातील महत्त्वाच्या घटना, शहाजहान यांचे धार्मिक धोरण, शहाजहान यांचा मृत्यू, शहाजहान यांची योग्यता.
  8. सम्राट औरंगजेब : औरंगजेबांचे कुटुंब, औरंगजेबांचे राज्यारोहण, औरंगजेबांचे प्रारंभिक कार्य, औरंगजेबांचे ईशान्ये-पूर्वे कडील धोरणे, औरंगजेबांचे वायव्य सरहद्द धोरण, औरंगजेबांचे धार्मिक धोरण, औरंगजेबांचे हिंदू विरोधी धोरण, उत्तर भारतातील विद्रोह, औरंगजेबांचे राजपूत विषयक धोरण, औरंगजेबांचे दक्षिण धोरण व त्याचे परिणाम, औरंगजेब आणि मराठे, औरंगजेबांच्या कार्याचे मूल्यमापन व योग्यता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)”
Shopping cart