Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

महाराष्ट्र

मराठ्यांचा इतिहास

History of the Marathas

, ,

Rs.395.00

सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एकत्र करून त्यांच्यापुढे स्वराज्याची कल्पना मांडली. जे मराठा सरदार प्रारंभी या कल्पनेच्या विरोधात होते, त्यांना त्यांनी पराजित करून धडा शिकविला. अफजलखान, शाहिस्तेखान यासारख्या प्रतिष्ठीत सरदारांना पराभूत केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठ्यांच्या सत्तेचा हिंदुस्तानात लौकिक पसरला.

  1. मराठा सत्तेचा उदय : (अ) मराठा सत्तेच्या उदयाची कारणे, (ब) शहाजीराजे भोसले व जिजाबाई यांची भूमिका, (ख) शहाजीराजे भोसले – पूर्वजीवन, खंडागळे प्रकरण, भातवडीची लढाई (ऑक्टोंबर 1624), (खख) जिजाबाई भोसले – पूर्वजीवन, जिजाबाईचे बालपण व शिक्षण, विवाह, उत्तम संस्काराची देणगी, कुशल प्रशासक, निर्भयता, विजयाच्या प्रेरिका, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांची पूर्ती
  2. शिवाजी महाराजांचे विविध राज्यांशी असलेले संबंध : (अ) शिवाजी महाराज – आदिलशाही संबंध, (ख) जावळीच्या मोर्‍यांचा पराभव – जावळीवरील स्वारीची कारणे, शिवाजी महाराजांचे जावळीवर आक्रमण, जावळीची व्यवस्था, चंद्रराव मोरेचा पाडाव व रायरीवर शिवाजीचे वर्चस्व, जावळीच्या स्वारीचे परिणाम, (खख) अफजलखान प्रसंग – अफजलखानाचे पूर्वजीवन, आदिलशहाच्या स्वारीची कारणे
  3. शिवाजी महाराजांचे प्रशासन : (अ) राज्याभिषेक, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कारणे, स्वतंत्र शब्दाचा नवा अर्थ राज्याभिषेकाने दिला, क्षत्रियत्वाचा सिद्धांत, गागाभट्ट, राज्याभिषेकपूर्वी विविध देवी-देवतांचे दर्शन, राज्याभिषेक सोहळा, राज्याभिषेकाचा खर्च, शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक, दुसर्‍या राज्याभिषेकाची कारणे (23 सप्टेंबर 1674), शिवाजी राजांची दुसर्‍या राज्याभिषेकास मान्यता
  4. छत्रपती संभाजी महाराज : (अ) छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, पूर्वचरित्र, संभाजी महाराजांसमोरील समस्या, रामसेजचा वेढा, रामसेजच्या वेढ्याचे महत्त्व, (ब) छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्ता यांचे संबंध, (ख) छत्रपती संभाजी महाराज-मोगल संबंध – संभाजी-अकबर प्रकरण
  5. मराठा स्वातंत्र्य युद्ध : (अ) मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, (ख) छत्रपती राजाराम महाराज – पूर्व चरित्र, छत्रपती राजाराम महाराजांपुढील समस्या, स्वातंत्र्य युद्धाची पूर्व तयारी, औरंगजेब झुल्फिकारखानाला रायगडाकडे पाठवतो (1689), मराठ्यांचा औरंगजेबाला तडाखा, राजारामाचे प्रतापगडाकडे प्रयाण, रायगडचा पाडाव
  6. शाहू महाराज व पेशवाईचा उदय : (अ) बाळाजी विश्वनाथाची कामगिरी, चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथ यांच्यातील संघर्ष, शाहूचा पेशवा अटकेत (बहिरोपंत पिंगळे पेशवा), कान्होजी आंग्रेस बाळाजी विश्वनाथ शाहूच्या पक्षात आणतो, कृष्णाजी खटावकराचा बंदोबस्त, दमाजी थोरातचा उपद्रव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठ्यांचा इतिहास”
Shopping cart