Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारताचा इतिहास (इ. स. 1857 – इ. स. 1950)

History of India (1857 - 1950)

Rs.295.00

सन 1857 ते 1950 या कालखंडातील भारताचा इतिहास हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळी आणि अनेक घटकांच्या अस्तित्वाच्या जागृतीचा, प्रतिउत्तराने व्यापलेला इतिहास आहे. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रारंभ होऊन विविध धार्मिक सामाजिक चळवळीत विविध संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या आत्मभानातून स्वदेशी चळवळीने राजकिय, आर्थिक भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनाची लाट ब्रिटीशांच्या धोरणास प्रतिउत्तर देण्यास उदयास आली. इंडियन नॅशनल आर्मीच्या लढ्याने ब्रिटीश प्रशासनास हादरा बसला. भारताच्या इतिहासात अतिजहाल सांप्रदायिकतेची विचार प्रणाली उदयास आली. त्यामुळे मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका इतिहासात नोंद करुन गेली. फाळणीच्या दु:खाबरोबरच भारतीयांना स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. त्या स्वातंत्र्यास अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नातील भारतीय संविधानाची निर्मिती इत्यादींचीही माहितीसोबतच याची जाणीवही विद्यार्थ्यांस व्हावी त्यासाठीच हे ग्रंथलेखन.

Bharatacha Itihas (1857-1950)

  1. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी: सुधारणा चळवळीचे कारणे/कारणीभूत घटक, अ) हिंदूधर्म सुधारणा चळवळी – ब्राम्हो समाज (1728), प्रार्थना समाज (1867), आर्य समाज (1875), रामकृष्ण मिशन (1897) ब) मुस्लीम धर्म सुधारणा चळवळी- वहाबी चळवळ/आंदोलन, देवबंद चळवळ (1866), अलिगढ चळवळ (1875), सिंग सभा चळवळी क) लिंगविषयक भेदाभेद किंवा/लिंगभाव विषमता – लिंगभाव विषमतेची कारणे, लिंगभाव विषमता सुधारणा कार्य (जाणीव जागृती); लिंगभेद नष्टतेसाठी आधुनिक प्रयत्न ड) जात, संस्कृतिकरण व ब्राम्हण विरोधी काळ- जात, संस्कृतिकरण, ब्राम्हण विरोधी काळ (जातविरोधी चळवळी)
  2. राष्ट्रीयकरण (1919 पर्यंतचा कालखंड): अ) राजकीय विचारधारा आणि संस्था- बंगाल प्रांतातील राजकीय संघटना, महाराष्ट्रातील राजकीय संघटना (मुंबई इलाख्यातील राजकिय संस्था), मद्रास प्रांतातील राजकिय संघटना ब) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (1885) क) मवाळवादी व जहालवादी ड) स्वदेशी चळवळ इ) क्रांतीकारी चळवळी/संघटना – बंगाल प्रांतातील क्रांतीकारी चळवळी, महाराष्ट्रातील क्रांतीकारी चळवळी, पंजाबमधील क्रांतीकारी चळवळी, विदेशातील भारतीय क्रांतीकारी चळवळी
  3. राष्ट्रवाद आणि सामाजिक गट संवाद (इ.स.1857-1950): अ) जमिनदार, व्यापारी व मध्यमवर्गीयातील राष्ट्रवादी संवाद/चळवळी (ब) शेतकरी चळवळीचे राष्ट्रवादातील योगदान – बंगालमधील निळ उत्पादक शेतकर्‍याचा उठाव, दक्षिणेतील बंड/दख्खन दंगे, महात्मा फुले व शेतकरी चळवळ, पंजाब शेतकर्‍यांचा असंतोष, गांधीजी व शेतकरी चळवळ (काँग्रेस शेतकरी चळवळ), मोपल्यांचे बंड, सातार्‍याचे बंड, मुळशी सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ आणि शेतकरी; किसान सभांची कामगिरी/लढा क) आदिवासी चळवळीचे राष्ट्रवादी आंदोलन/राष्ट्रवाद- नायकदा विद्रोह, मुंडा विद्रोह, भील विद्रोह, थाओडे कूकी आंदोलन, चेंचू विद्रोह ड) कामगार चळवळीचे राष्ट्रवादी आंदोलन – नारायण मेघाजी लोखंडे आणि कामगार चळवळ, 1908 चा कामगार संप, पहिले महायुद्ध आणि कामगार चळवळ, स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळ इ) राष्ट्रवाद आणि दलित चळवळ- महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. सयाजीराव गायकवाड, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, वि.रा.शिंदे, डॉ. भिमराव आंबेडकर, किसन फागू बंदसोडे फ) राष्ट्रवाद आणि स्त्री चळवळ – विधवाविवाहोत्तेजक मंडळ, बालहत्या प्रतिबंध गृह, शारदा सदन, अनाथ बालिकाश्रम, देशी विवाह कायदा, सेवासदन, अखिल भारतीय मुस्लिम महिला परिषद, भारतीय स्त्रियांची संस्था, हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी अ‍ॅक्ट
  4. 1920 नंतर गांधी आणि राष्ट्रवाद: अ) महात्मा गांधीचा दृष्टीकोन व कार्यपद्धती ब) असहकार चळवळ (1920) – असहकार चळवळीची कारणे/पार्श्वभूमी, असहकार चळवळीचे परिणाम क) सविनय कायदेभंग चळवळ (1930) ड) प्रांतीय स्वायत्तता इ) भारत छोडो आंदोलन (1942) फ) इंडियन नॅशनल आर्मी
  5. सांप्रदायिकता: सांप्रदायिकतेच्या उदयाची कारणे, अ) मुस्लिम लीग (1906) ब) हिंदू महासभा क) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  6. भारत स्वतंत्रता आणि विभाजन: अ) स्वातंत्र्य आणि विभाजनासाठी वाटाघाटी ब) विभाजन दंगली – 1946-47 मधील मुख्य घटना – 1) कलकत्ता ठिकाणच्या दंगली 2) नोआखाली ठिकाणच्या दंगली 3) बिहार ठिकणची दंगल 4) संयुक्त प्रांताची दंगल 5) पंजाबमधील दंगल क) संविधान निर्मिती -संविधान संकल्पनेचा अर्थ व पार्श्वभूमी, स्वातंत्र्यापूर्वीची अधिवेशने, मसुदा समिती, भारतीय संविधानाचे स्त्रोत/आधारस्थान

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताचा इतिहास (इ. स. 1857 – इ. स. 1950)”
Shopping cart