Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947)

History of Indian Independence Movement (1858 to 1947)

Rs.350.00

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. 1757 मध्ये भारतात आपली सत्ता स्थापन केली, परंतु इ.स. 1857 मध्ये भारतीय संस्थानिकांनी कंपनीच्या विरोधात उठाव केल्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली व येथे ब्रिटिश राजसत्ता स्थापन झाली. पुढे भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊन इ.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली. हीच चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ होय. या चळवळीचे नेतृत्त्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांनी केले. याच चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. शेवटी इ.स. 1947 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातला स्वातंत्र्य मिळाले. या ग्रंथात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1858 te 1947)

  1. भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास : राष्ट्रवादाच्या उदयाची पार्श्वभूमी, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची कारणे, काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या प्रांतीय संघटना, इंडिया असोसिएशन, द बाँबे असोसिएशन
  2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इ.स.1885 – इ.स.1905) : काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचे स्वरुप, काँग्रेसचे ध्यये व उद्दिष्टे, काँग्रेसचे ठराव व मागण्या, काँग्रेसची अधिवेशने, काँग्रेसचे मवाळ नेते
  3. जहाल राष्ट्रवादाचा उदय व विकास (इ.स.1893 – इ.स.1907) : जहाल राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे, जहाल राष्ट्रवाद्यांची कार्यपद्धत बंगालची फाळणी, वंगभंग आंदोलन, लोकमान्य टिळकांचे कार्य
  4. होमरुल चळवळ (इ.स.1908 – इ.स.1920) : काँग्रेस व मुस्लिम लीग तडजोड, लोकमान्य टिळकांची सुटका, मवाळ व जहाल गटात ऐक्य, पहिले महायुद्ध व काँग्रेस, लखनौ करार, होमरुल चळवळ
  5. असहकार चळवळ : महात्मा गांधीजींचा राजकारणात प्रवेश, रौलेट अ‍ॅक्ट जालीयनवाला, बाग हत्याकांड, हंटर कमिशन, खिलाफत चळवळ, कलकत्ता अधिवेशन, असहकार चळवळ, चळवळीचा कार्यक्रम
  6. स्वराज्य पक्ष : स्वराज्य पक्षाची स्थापना, पक्षाचा उद्देश, पक्षाचा कार्यक्रम, पक्षाचे ध्येय धोरण, पक्षाची कामगिरी.
  7. सविनय कायदेभंगाची चळवळ : सायमन कमिशन, नेहरु रिपोट, बॅ. जिनांची चौदासुत्री योजना, महात्मा गांधीजी व लॉर्ड आयर्विन भेट, काँग्रेसची संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, सविनय कायदेभंगाची चळवळ
  8. राष्ट्रीय चळवळीचे अंतिम पर्व : दुसरे महायुद्ध व राष्ट्रीय चळवळ, काँग्रेस मंत्रिमंडळाचा राजीनामा, ऑगस्ट योजना, वैयक्तिक सत्याग्रह, क्रिप्स योजना, छोडो भारत चळवळ, वर्धा प्रस्ताव
  9. दहशतवादी क्रांतिकारी चळवळ : चळवळीचा उदय, ध्येय, विकास, ब्रिटिश राजवटीस प्रारंभी झालेला विरोध, रामोशी, भिल्ल, गौंड, हटकर, गडकरी, कोष्टी, कांतिकारी चळवळ, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब
  10. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना : नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना
  11. मुस्लीम संप्रदायवाद-उदय, विकास व राजकारण : ब्रिटिश सत्तेचा उदय व मुस्लिम सत्तेचा अस्त, ब्रिटिशांचे मुसलमानविषयक धोरण, वहाबी आंदोलन, अलिगढ चळवळ, सर सय्यद अहमद खान
  12. भारताचा घटनात्मक विकास : 1892 चा भारतीय कौन्सिल कायदा, 1909 चा कौन्सिल कायदा, 1919 चा भारत प्रशासन कायदा, 1935 चा भारत सरकार कायदा, 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा.
  13. शेतकरी आणि कामगार चळवळ : शेतकरी आंदोलन – ब्रिटिशांची आर्थिक नीती, शेतकर्‍यापुढील कृषीविषयक समस्या शेतकर्‍यांतील असंतोष, रयत व शेतकर्‍यांची आंदोलने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947)”
Shopping cart