Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

जग

अमेरिकन संघराज्याचा इतिहास (इ.स. 1776 ते इ.स. 1945)

History of United States of America (CE 1776 to CE 1945)

Rs.275.00

‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ या ग्रंथात वसाहतीपूर्व काळापासून ते दुसर्‍या महायुद्धापर्यंतचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. वसाहतकालीन अमेरिकन समाज संस्कृतीमध्ये काही आधारभूत तत्वे युरोपियन असली तरी संस्कृतीची स्वतंत्र अशी ओळख होती. लोकशाहीवरील अढळ निष्ठा किंवा लोकशाही ही जीवनाची प्रणाली म्हणून स्वीकारणे, लोकशाहीचा स्वीकार केल्यावर समान संधीच्या कायद्याच्या, समतेच्या पायावर नवीन समाजरचना निर्माण करणे, व्यक्तीस्वातंत्र्य व व्यक्तींचा संपूर्ण विकास करण्यास सर्व प्रकारची आवश्यक ती परिस्थिती निर्माण करणे वगैरेंचा त्यात समावेश होता. प्रस्तुत ग्रंथात अमेरिकेची सुरुवातीची पार्श्वभूमी, वसाहती, वसाहतकालीन समाज आणि संस्कृती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन राज्यघटना, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन अ‍ॅडॅम्स, थॉमस जेफरसन, जेम्स मन्रो, अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका, अमेरिकन यादवी युद्ध, औद्योगिकरण, अमेरिका आणि जागतिक युद्धाचा काळ, राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनची कारकीर्द तसेच पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील अमेरिकेतील भूमिका इ. घटनांचे विश्लेषण साध्या सोप्या भाषेत केले आहे.

Amerikan Sangharajyacha Itihas (C.E. 1776 to C.E. 1945)

  1. पार्श्वभूमी : 1.1 अमेरिकेचा भौगोलिक विस्तार, 1.2 वसाहती आणि युरोपीयनांचे अमेरिकेतील वसाहतीकरण, 1.3 वसाहतकालीन समाज आणि संस्कृती, 1.4 मजुरांमधील करारनामा गोरे आणि काळे.
  2. गणतंत्राची निर्मिती : 2.1 अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची कारणे, 2.2 अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, 2.3 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा घटनाक्रम, 2.4 अमेरिकेचे स्वातंत्र्य, 2.5 पॅरिसचा शांतता तह, 2.6 अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम, 2.7 अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे महत्व, 2.8 अमेरिकन राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, 2.9 अमेरिकन राज्यघटनेची वैशिष्ट्ये.
  3. अमेरिकन लोकशाहीचे मूल्यांकन : 3.1 जॉर्ज वॉशिंग्टनची अध्यक्षीय कारकीर्द, 3.2 जॉन अ‍ॅडॅम्सची अध्यक्षीय कारकीर्द, 3.3 थॉमस जेफरसनचा अध्यक्षीय काळ, 3.4 न्यायसंस्था – सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, 3.5 इ.स. 1812 चे युद्ध, 3.6 जेम्स मन्रोची अध्यक्षीय कारकीर्द, 3.7 मन्रो सिद्धांत (तत्वे), 3.8 मन्रो सिद्धांत आणि दैवयोगाचे प्रकटीकरण, 3.9 मिसुरी तडजोड
  4. अमेरिकन यादवी युद्ध : 4.1 राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, 4.2 अमेरिकन यादवी युद्धाची पार्श्वभूमी/कारणे, 4.3 यादवी युद्ध, 4.4 यादवी युद्धात संघराज्याच्या विजयाची कारणे, 4.5 अमेरिकन यादवी युद्धाचे परिणाम, 4.6 अब्राहम लिंकनची कामगिरी.
  5. अमेरिकेचा भांडवलशाहीवाद : 5.1 अमेरिकेतील औद्योगिकरणाच्या उदयाची कारणे, 5.2 अमेरिकेतील औद्योगिकरणाचा विकास, 5.3 औद्योगिक संघाची वाढ व त्याचे परिणाम, 5.4 कामगार चळवळी, 5.5 मळ्यांची (शेती) अर्थव्यवस्था, 5.6 दास समाज आणि संस्कृती, दासांचा प्रतिकार.
  6. अमेरिका आणि जागतिक युद्धाचा काळ : 6.1 थिओडोर रूझवेल्ट आणि त्याचे धोरण, 6.2 राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनची कारकीर्द, 6.3 वुड्रो विल्सन आणि पहिल्या महायुद्धातील अमेरिकेची भूमिका, 6.4 जागतिक आर्थिक महामंदी कारणे आणि अमेरिकेवरील त्याचे परिणाम, 6.5 न्यू डील कार्यक्रम, 6.6 दुसर्‍या महायुद्धातील अमेरिकेतील भूमिका.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अमेरिकन संघराज्याचा इतिहास (इ.स. 1776 ते इ.स. 1945)”
Shopping cart