Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

आंतरराष्ट्रीय संबंध

International Relations

Rs.575.00

आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज राज्याचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी जेरेमी बेथंमद्वारा केला गेला होता.
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या कालखंडात परिवर्तन झालेले आहे. आज विज्ञानयुगात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे राज्याराज्यातील अंतर कमी झाले आहे. तद्वतच आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते. प्राचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती. परंतु आज ती परस्परावलंबी बनली आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रत्येक राष्ट्र, राज्य हे सार्वभौम आहे. प्रत्येक राज्यसंबंधांवर राष्ट्र आपले धोरण ठरविण्यास स्वतंत्र आहे. अशा स्वतंत्र, सार्वभौम व सत्तासंपन्न राज्यांच्या आपसांतील संबंधास आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. सार्वभौम राज्ये आपले हित साध्य करीत असतांना परस्परांशी संघर्ष करतात. या संघर्षात सत्तेचा अधिक उपयोग केला जातो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.
वर्तमानकाळात शीतयुद्धाची व्यापकता, टेक्नॉलॉजीचा विकास, वरील वादांचे निर्मूलन, तसेच नवीन राष्ट्रांचा उदय इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय अध्ययनाचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.

Antarrashtriya Sandandh

1) आंतरराष्ट्रीय संबंध, 2) आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासाचे दृष्टिकोन, 3) सिद्धांत, 4) शक्ती : व्याख्या आणि घटक, 5) शक्तीसाठी संघर्ष, 6) तणाव शैथिल्य/देतांत/प्रतिरोध, 7) सत्ता संतुलन, 8) दहशतवाद, 9) सामूहिक सुरक्षितता, 10) संघर्ष नियंत्रणाची साधने : राजनय, 11) नि:शस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण, 12) आंतरराष्ट्रीय राजकारणात पर्यावरण व पर्यावरणवाद, 13) जागतिकीकरण, 14) मानवाधिकार, 15) परावलंबित्व, 16) राष्ट्रीय सत्तेचे घटक, 17) आंतरराष्ट्रीय कायदा/न्याय, 18) संघर्ष आणि सहकार्य, 19) अलिप्तवादी संकल्पना/चळवळ/धोरण, 20) आंतरराष्ट्रीय सत्ता व जागतिक व्यवस्था, 21) क्षेत्रीय संघटना : सार्क आशियान, 22) नवीन उदभवलेले प्रश्न : मानवी हस्तक्षेप, निर्बंध, लोकतांत्रिक, खासगीकरण, 23) राष्ट्र व राष्ट्रवाद, 24) आंतरराष्ट्रीय नैतिकता, 25) जागतिक लोकमत, 26) राष्ट्रीय हित, 27) आंतरराष्ट्रीय संघटना – राष्ट्रसंघ, 28) संयुक्त राष्ट्रसंघ, 29) साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, 30) भारताचे परराष्ट्र धोरण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंतरराष्ट्रीय संबंध”
Shopping cart