Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतीय संविधानाची ओळख

Introduction to Indian Constitution

, ,

Rs.395.00

संविधान अथवा राज्यघटना ही संज्ञा प्राचीन स्वरूपाची असून विशेषत: भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या काही नवोदित राष्ट्रांनी स्वातंत्र्य प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय व इतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी नियमावलीची निर्मिती करण्यावर भर दिलेला दिसतो. प्रामुख्याने यामध्ये युरोपातील राष्ट्रे, आशिया खंडातील राष्ट्रे यांचा समावेश करता येईल. ग्रीक नगर राज्यात अ‍ॅरिस्टॉटलच्या अध्ययन पद्धतीत अनेक देशांचा अभ्यास करून जी नियमावली तयार करण्यात आली ती तुलनात्मक राज्यशास्त्रात महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक स्वरूपाच्या राजदरबारात सुद्धा आपल्या नगरराज्याच्या हितासाठी, प्रजेच्या सुरक्षेसाठी ज्या काही नियमावलींची निर्मिती करण्यात आली ती एकाप्रकारे भविष्यकालीन नियमांच्या बांधणीसाठी अथवा विशिष्ट कायद्याची चौकट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरली. भारताच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास सन 1935 च्या भारत प्रशासन विषयक कायद्यातून निश्चित स्वरूपाची एक दिशा भारतीय संविधानाच्या चौकटीकरिता उपयुक्त ठरली असे म्हणावे लागेल. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया ही घटना समिती व मसुदा समितीच्या माध्यमातून संपन्न झाल्याचे निदर्शनास येते. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांचे तुलनात्मक अध्ययन करून 2 वर्षे, 11 महिने, 17 दिवस अखंड व सातत्यपूर्ण अभ्यासातून भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भरीव स्वरूपाचे योगदान दिले. त्यांनी संविधानातील अनेक लहान-मोठ्या तरतूदी व संकल्पनेवर संविधान सभेत व्यापक विचारमंथन केले. परिणामस्वरूप स्वतंत्र भारताला सामाजिक न्याय मिळवून देण्याकरिता, देशाचे नाव जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून नोंदविण्यासाठी भारतीय संविधान एक दस्तऐवज, मूलभूत ग्रंथ आहे असे आपणास म्हणता येईल.

Bhartiy Sanvidhanachi Olakh

  1. भारतीय संविधानाची निर्मिती : 1.1 भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1.2 भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया, 1.3 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे, 1.4 संसदीय शासनपध्दतीची वैशिष्ट्ये
  2. संघराज्यात्मक प्रारूप आणि त्याची कार्ये : 2.1 भारतीय संघराज्य निर्मितीची पार्श्वभूमी, 2.2 संघराज्याची रचना व स्वरूप, 2.3 केंद्र-राज्य संबंध, 2.4 भारतातील वित्त आयोग, 2.5 निती आयोग
  3. मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य : 3.1 मूलभूत अधिकार वा हक्क, 3.2 मूलभूत कर्तव्ये, 3.3 मूलभूत हक्क आणि कर्तव्य यातील फरक, 3.4 हक्कांसंबंधी अलिकडील बदल
  4. राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे : 4.1 राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे, 4.2 मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण, 4.3 मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यातील फरक/भेद
  5. भारतीय संविधानातील प्रमुख घटना दुरुस्त्या : 5.1 भारतीय संविधानातील दुरुस्ती, 5.2 महत्त्वपूर्ण दुरूस्त्या, 5.3 भारतीय संविधानातील सातत्यपूर्ण धोकादायक दुरूस्त्या, 5.4 संविधान दुरुस्त्यांची अंमलबजावणी
  6. भारतातील कार्यकारी मंडळ : 6.1 राष्ट्रपती/राष्ट्राध्यक्ष; 6.2 उपराष्ट्रपती, 6.3 केंद्रीय मंत्रिमंडळ, 6.4 पंतप्रधान, ब) घटक राज्यांची शासनयंत्रणा, 6.5 राज्यपाल, 6.6 मुख्यमंत्री, 6.7 राज्याचे मंत्रिमंडळ
  7. भारतातील विधिमंडळ : 7.1 लोकसभा, 7.2 राज्यसभा, 7.3 घटकराज्यांचे विधिमंडळ
  8. भारतीय न्यायमंडळ : 8.1 सर्वोच्च न्यायालय, 8.2 उच्च न्यायालय, 8.3 न्यायालयीन पुनर्विलोकन, 8.4 न्यायालयीन सक्रियता, 8.5 जनहित याचिका किंवा सार्वजनिक हिताचे दावे
  9. भारतातील निवडणूक प्रक्रिया : 9.1 निवडणूक आयोगाचा इतिहास, 9.2 केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग, 9.3 निवडणूक आयुक्त, 9.4 निवडणूक आयोगाच्या कार्याचे परीक्षण, इलेक्ट्रॉनिक्स मतदार यंत्र
  10. भारतीय लोकशाहीपुढील उदयोन्मुख आव्हाने : 10.1 धर्मनिरपेक्षता, 10.2 राष्ट्रीय एकात्मता, 10.3 प्रदेशवाद, 10.4 आरक्षण धोरण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय संविधानाची ओळख”
Shopping cart