Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्था

Local Self Government

Rs.425.00

भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.

या ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.

सदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.

Sthanik Swarajya Sanstha

 1. भारतातील स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती : इतिहास, ग्रामीण, ग्रामपंचायतीची रचना
 2. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास : नागरी स्वशासन संस्था; ब्रिटिश शासन
 3. स्थानिक स्वशासन : स्थानिक प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य प्रशासन, स्थानिक स्वशासनाचे स्वरूप
 4. स्वातंत्र्योत्तर भारतीय लोकशाही विकेंद्रीकरण : स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाही विकेंद्रीकरण संदर्भातील शासकीय समित्या, अ) बलवंतराय मेहता समिती (1957), ब) वसंतराव नाईक समिती (1960)
 5. नागरीकरण : शहर किंवा नगर म्हणजे काय?, नागरीकरणाची कारणे, नागरीकरणाची वैशिष्ट्ये
 6. स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये : स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, राज्य निर्वाचन आयोग
 7. स्थानिक स्वशासन संस्थांचे घटनात्मक स्थान : 73 वी घटना दुरूस्ती, 73 व्या घटना दुरूस्तीची वैशिष्ट्ये
 8. सामूहिक विकास : ग्रामीण विकासाचे प्रकल्प, संकल्पनेची वाटचाल, कार्यक्रमाची रूपरेषा
 9. नागरी स्थानिक स्वशासन संस्था-महानगरपालिका : रचना, सभा, अधिकार व कार्ये, कर्तव्ये, निधी
 10. नागरी स्थानिक स्वशासन संस्था- नगरपरिषद/नगरपालिका : स्थापना, इतर राज्यातील वर्गीकरणाचे नियम
 11. नागरी स्थानिक स्वशासन संस्था- नगरपंचायत : नगरपंचायतीची स्थापना, छावणी मंडळ/कटक मंडळ
 12. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यातील संबंध : राजकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी
 13. स्थानिक स्वशासनातील नेतृत्व : नागरी स्वशासन संस्थातील नेतृत्व, लोकनेतृत्व/नव्या ग्रामीण नेतृत्वाचा विकास
 14. नगरपालिका निवडणूका : नगरपालिका निवडणूका, निवडणूका व राजकीय पक्ष
 15. नगरपालिकांची वित्तीय व्यवस्था : नगरपरिषदेच्या वित्तीय संबंधातील बाबी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न
 16. स्थानिक स्वराज्य/स्वशासन संस्थावरील नियंत्रण : दृष्टीकोन येण्यासाठी कारणे, नियंत्रणाची आवश्यकता
 17. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या : समस्यांचे गंभीर स्वरूप, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी संबंध
 18. भारतातील शहरीकरण आणि त्याच्या समस्या : नविन वसाहती होण्याची कारणे, बोर्डाच्या योजना
 19. भारतातील प्रमुख महानगरपालिका : मुंबई महानगरपालिका, दिल्ली महानगरपालिका
 20. स्थानिक स्वशासनाचे मूल्यमापन : स्थानिक स्वशासनासंबंधीचे महत्त्वाचे प्रश्न- स्वायत्ततेचा प्रश्न, अनुभवहीनता, नागरिकांचा सहभाग, नियोजन आणि विकास, सेवांचा प्रश्न, कर्मचारीवर्ग, वित्तीय प्रश्न, राजकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यातील संबंध, राजकीय पक्षांचे प्राबल्य, नियंत्रणाचा प्रश्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्थानिक स्वराज्य संस्था”
Shopping cart