Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

महाराष्ट्राच्या प्रशासनाची ओळख

,

Rs.395.00

महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संयुक्त महाराष्ट्राची एक फलश्रुती आहे. ‘महाराष्ट्र प्रशासन’ या संबंधीचे अध्ययन हे सामाजिक शास्त्रात मूलभूत स्वरूपाचे आहे. ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दाच्या माध्यमातून बहुविध स्वरूपाची चर्चा व तिचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया गतिशील स्वरूपाची आढळते. उपरोक्त विवेचनात महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती प्राप्त होते. प्रत्येक जिल्हा हा अनेक क्षेत्राच्या दृष्टिने उपयुक्त स्वरूपाचा आहे, पर्यावरण, इतिहास, सामाजिक संदर्भ, सहकार, उद्योग, राजकीय पार्श्वभूमी व नेते, वेगळेपण, याबाबत प्रत्येक जिल्ह्यांचे निराळेपणा वा वैशिष्ट्ये आढळतात.

सदरील पुस्तकात महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ठळक वैशिष्ट्ये, पुनर्रचित प्रशासकिय विभाग आणि जिल्हे, राज्य सचिवालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, ग्रामीण स्थानिक प्रशासन, शहरी स्थानिक प्रशासन – नगरपालिका, महानगरपालिका, इतर शहर स्थानिक संस्थाचे प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, आदिवासी विभाग विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, म. फुले, आण्णासाहेब पाटील, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास महामंडळ, विकेंद्रीकरण वगैरे प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. सदरील पुस्तकातील मांडणी ही स्पष्ट व सुबोध भाषेत करण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तक नेट-सेट, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षार्थ्यांना तसेच वाचक, अभ्यासू आणि जिज्ञासूंनासुद्धा उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

Maharashtrachya Prashasanachi Olakh

  1. महाराष्ट्राची ओळख : महाराष्ट्राची पार्श्वभूमी – ऐतिहासिक, भौगोलिक, सामजिक, आर्थिक आणि राजकीय; महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास; महाराष्ट्राचे प्रशासन : ठळक वैशिष्ट्ये; महाराष्ट्राचे पुनर्रचित प्रशासकिय विभाग आणि जिल्हे.
  2. राज्य सचिवालय / मंत्रालय : परिचय आणि रचना; सचिवालयाची कार्य आणि महत्त्व; राज्याच्या मुख्य सचिवांची भूमिका; संचालनालय – वैशिष्ट्ये आणि कार्य
  3. जिल्हा प्रशासन : अर्थ, महत्त्व; उद्देश आणि कार्य; जिल्हाधिकारी – अधिकार, कार्य; जिल्हाधिकार्‍याचे स्थान (दर्जा) आणि बदलती भूमिका; कायदा आणि सुव्यवस्था : अर्थ, तत्वे, पध्दती आणि अभिकरण
  4. ग्रामीण आणि शहरी प्रशासन : अ) ग्रामीण स्थानिक प्रशासन; अर्थ, महत्व, ऐतिहासिक पार्श्वभूमी; ग्रामपंचायत – ग्रामसेवकांची भूमिका; पंचायत समिती – गटविकास अधिकार्‍यांची भूमिका (बी.डी.ओ); जिल्हा परिषद – मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भूमिका (सी.ई.ओ); ब) शहरी स्थानिक प्रशासन; अर्थ, महत्व, ऐतिहासिक पार्श्वभूमी; नगरपालिका – मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची भूमिका (सी.ओ); महानगरपालिका – आयुक्तांची भूमिका; इतर शहर स्थानिक संस्थाचे प्रशासन – रचना, कार्य, दृष्टीकोन
  5. कायदा आणि सुव्यवस्था : अर्थ, महत्व, ऐतिहासिक पार्श्वभूमी; कायदा व सुव्यवस्थेचे महत्व; जिल्हा पोलीस अधिक्षक – स्थान, कार्य व भूमिका; जिल्हा पोलीस उप अधिक्षक – स्थान, कार्य व भूमिका
  6. महाराष्ट्रातील संवैधानिक आणि कायदेशीर विकास मंडळे : आदिवासी विभाग विकास मंडळ; मराठवाडा वैधानिक विकास मंडळ; म. फुले, आण्णासाहेब पाटील, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ; महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास महामंडळ
  7. विकेंद्रीकरण : उद्दिष्टे; प्रास्ताविक; विषय विवेचन; अर्थ- व्याख्या, वैशिष्ट्ये; केंद्रीकरण-विकेंद्रीकरण यातील मूलभूत फरक; पारिभाषिक शब्द

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राच्या प्रशासनाची ओळख”
Shopping cart