Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतातील घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया

Rs.395.00

स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु केली. केवळ स्वातंत्र्य मिळाल्याने सर्व प्रश्न सुटले नव्हते तर पुढील काळामध्ये राष्ट्राचे ऐक्य टिकविण्याचे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या तत्त्वावर आधारित नवा समाज निर्माण करावयाचा होता. सामाजिक व आर्थिक मागासलेपणा दूर करुन लोकशाहीच्या मार्गाने नवसमाज निर्माण करण्याची व त्याचबरोबर धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक विविधतेतून एकता साध्य करण्याची म्हणजेच राष्ट्रीय ऐक्य बळकट करण्याची भारतीय लोकांची आकांक्षा होती. भारतीय राज्यघटना हे त्याचेच प्रतिक आहे. ज्या तत्त्वांच्या आधारे देशात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणायचे आणि विविधतेतून राष्ट्राची एकता साध्य करायची ती आधारभूत तत्त्वे घटनेने ठरवून दिलेली आहेत. देशातील शासनव्यवस्थेचे स्वरुप राज्यघटनेने केलेल्या नियमानुसार ठरते. कोणत्याही देशाची राज्यघटना जनतेच्या व्यक्त वा अव्यक्त संमतीवर आधारलेली असते. जनतेची मान्यता हा तिचा खरा अधिकार असतो. राज्यघटनेने तयार केलेले नियम म्हणजे राजकीय व्यवस्थेचा एक आराखडा असतो; त्यात सहभागी होणार्‍या लोकांमुळे तिला जीवंतपणा प्राप्त होतो. राजकीय व्यवस्थेमध्ये विविध पदांवर कार्य करणार्‍या व्यक्तींची उद्दिष्टे, धोरणे, त्यांचे हितसंबंध तसेच समाजातील विविध गटांचे हितसंबंध या सर्वांचा परिणाम होऊन देशातील घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया चालू राहत असते.

Bharatatil Ghatanatmak Ani Rajkiy Prakiya

  1. भारतीय राज्यघटनेची निर्मिती : अ) घटना परिषद : रचना व कार्य, ब) राज्यघटनेची तात्त्विक बैठक : उद्देशिका, क) मूलभूत रचनेचा प्रश्न
  2. मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे : अ) मूलभूत हक्क, स्वरूप आणि व्याप्ती, ब) मार्गदर्शक तत्त्वे, स्वरूप आणि व्याप्ती, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे, संबंध आणि भेद, मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व, क) न्यायमंडळाची भूमिका : न्यायालयीन पुनर्विलोकन
  3. भारतीय संघराज्य : अ) भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, प्रबळ केंद्रसत्ता, ब) केंद्र-राज्य संबंध, घटकराज्यातील आणीबाणी, क) 73 वी आणि 74 वी घटनादुरूस्ती : तरतुदी आणि महत्त्व
  4. संसदीय प्रक्रिया : अ) कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यातील संंबंध, ब) कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांच्यातील संबंध
  5. भारतातील निवडणूक प्रक्रिया : अ) मतदारसंघाची आखणी, निवडणूक आयोग, ब) 1952 आणि 1967 च्या सार्वत्रिक निवडणुका, क) 1977 आणि 1989 च्या सार्वत्रिक निवडणुका
  6. पक्षीय राजकारण : अ) काँग्रेस वर्चस्वाचा कालखंड, ब) भारतीय जनता पक्ष : स्थापना आणि वाटचाल, क) प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव आणि आघाड्यांचे राजकारण
  7. राजकीय चळवळी : अ) भाषिक राज्यांची मागणी : स्वरूप आणि समस्या, ब) स्त्री चळवळ : स्वरूप आणि समस्या, क) शेतकरी चळवळ : स्वरूप आणि समस्या
  8. समकालीन राजकारण – काही समस्या : अ) विकासाचे राजकारण : कृषी क्षेत्राची भूमिका, शेती विकासाची सद्य:स्थिती आणि समस्या, विकास कार्यात औद्योगिक क्षेत्राची भूमिका, नवे औद्योगिक धोरण परिणाम, ब) जातीयवाद : प्रबळ जातींचा राजकारणातील प्रभाव, इतर मागासवर्गीयांचा वाढता प्रभाव, क) जमातवाद : अलीकडील काळातील जमातवाद, हिंदू जमातवाद, मुस्लीम जमातवाद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतातील घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया”
Shopping cart