Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतीय संविधानाची ओळख

Introduction to Indian Constitution

,

Rs.395.00

भारतीय राज्यघटनेत ‘भारत हा राज्यांचा संघ असेल’ असा उल्लेख आहे. संघराज्यपद्धती ही केवळ संरचनात्मक व्यवस्था नसते; तर तिच्यात विविध लोकगट व त्यांच्या संस्था आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येवून शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय राज्यघटनेत उदारमतवाद, मिश्र अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, कायदेशीर वा कार्यालयीन भाषेची तरतूद, स्वतंत्र निर्वाचन आयोग इत्यादींची तरतूद आढळते. परिणामी भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक ठरते.

प्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, भारतीय संघराज्यवाद, कायदेमंडळ, संविधानिक दुरुस्त्या, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि निवडणूक व्यवस्था अशा मूलभूत व राज्यघटनेची ओळख होण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेतानाच लोकशाही प्रक्रियेचाही अभ्यास होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत यांचाही उहापोह सदरील ग्रंथात आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख होण्याच्या दृष्टीने सोपी, सुटसुटीत अशी ग्रंथरचनेची मांडणी करण्यात आली आहे.

Bharatiya Sanvidhanachi Olkha

  1. भारतीय राज्यघटनेची निर्मिती : 1.1 ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1.2 घटना समिती, 1.3 राज्यघटनेचा सरनामा, 1.4 राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये
  2. मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे : 2.1 मूलभूत हक्क, 2.2 मूलभूत कर्तव्ये, 2.3 राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
  3. संघराज्यवाद : 3.1 भारतीय संघराज्यवादाची ठळक वैशिष्ट्ये, 3.2 केंद्र-राज्य संबंध, 3.3 संघर्षाचे प्रश्न : पाणी प्रश्न, सीमावाद
  4. संविधानिक दुरुस्त्या : व्याप्ती आणि मर्यादा : 4.1 संविधानिक तरतुदी, 4.2 प्रमुख संविधानिक दुरुस्त्या (42, 44, 86), 4.3 भारतीय संविधानाची मूलभूत रचना
  5. विधीमंडळ (कायदेमंडळ) : 5.1 केंद्रीय विधीमंडळ : रचना, अधिकार आणि भूमिका, 5.2 राज्य विधीमंडळ : रचना, अधिकार आणि भूमिका
  6. कार्यकारी मंडळ : अ) केंद्रीय कार्यकारी मंडळ, 6.1 केंद्रीय कार्यकारी मंडळ : राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, अधिकार आणि कार्ये, 6.2 पंतप्रधान : अधिकार, कार्ये आणि भूमिका, 6.3 केंद्रीय मंत्रिमंडळ : अधिकार, कार्ये आणि भूमिका, ब) घटकराज्याचे कार्यकारी मंडळ, 6.4 राज्यपाल : अधिकार, कार्ये आणि भूमिका, 6.5 मुख्यमंत्री : अधिकार, कार्ये आणि भूमिका, 6.6 राज्य कार्यकारी मंडळ : अधिकार, कार्ये आणि भूमिका
  7. न्यायमंडळ : 7.1 सर्वोच्च न्यायालय : अधिकार आणि कार्ये, 7.2 उच्च न्यायालय : अधिकार आणि कार्ये, 7.3 न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन सक्रियता
  8. निवडणूक व्यवस्था : 8.1 निवडणूक आयोग : रचना (निर्मिती), कार्य आणि भूमिका, 8.2 मुख्य निवडणूक आयुक्त, 8.3 निवडणूक सुधारणा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय संविधानाची ओळख”
Shopping cart