Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतीय संविधानातील तरतूदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था

Indian Constitution Provisions and Self Government

,

Rs.375.00

कोणत्याही देशाच्या संविधानाच्या स्वरुपावर त्या देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक तथा आर्थिक या सारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो. देशाअंतर्गत या घटकाप्रमाणेच अन्य देशातील काही घडामोडी, विचारप्रणाली, अस्तित्त्वात असलेली संविधाने इत्यादी घटकांचाही प्रभाव पडतो. भारताचे संविधान घटना समितीद्वारा निश्चित काळात तयार केले गेले. भारतीय संविधानाचे स्वरुप 395 कलमे, 22 प्रकरणे व 08 परिशिष्ट्ये मिळून लिखित स्वरुपात तयार करण्यात आले. भारतीय संविधानाचा विचार करता संविधान दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या 3 पद्धतीचा उल्लेख केला आहे. संविधानकर्त्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी राज्याचे धोरण अत्यंत महत्त्वाचे असते. राज्यकारभाराच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य असते. भारतीय राजकीय व्यवस्थेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकसभा व राज्यसभा यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, उद्देशपत्रिका, राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे, घटनात्मक पदे व त्यांची विविध कार्ये, लोकसभा, राज्यसभा, संसद सदस्य, न्यायालय, निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, कायदा निर्मितीची प्रक्रिया, पंचायतराज, केंद्र शासनाशी संबंधित समित्या, मूल्यमापन समित्या, ग्रामसभा व महिलांचा सहभाग, संयुक्त महाराष्ट्र व नागपूर करार, माहितीचा अधिकार इ. बाबींचे अभ्यासपूर्ण व तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे.

Bharatiya Sanvidhanatil Tartudi Aani Sthanik Swarajya Sanstha

  1. भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये : संविधानाची उद्देशपत्रिका, संविधान समितीचे कार्य, मूलभूत अधिकार – अर्थ व महत्त्व
  2. राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे : मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार यातील फरक, भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची विधी विषयक पध्दती (कलम 5 ते 11)
  3. भारताचा राष्ट्रपती : भारताच्या राष्ट्रपतीचे स्थान व भूमिका, भारताचा उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार, पंतप्रधान, पंतप्रधानाचे अधिकार व कार्ये, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळ
  4. भारताची लोकसभा : लोकसभेचे स्थान व भूमिका, राज्यसभा (रचना संविधान कलम 80), राज्यसभा सभापतीचे अधिकार व कार्य, राज्यसभेचे स्थान व भूमिका, संसदेचे कार्य व अधिकार, संसद सदस्याचे विशेषाधिकार, लोकसभेचा सभापती, लोकसभेच्या सभापतीचे अधिकार व कार्य
  5. न्यायालयाचे प्रकार : 1) सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य, 2) उच्च न्यायालय; उच्च न्यायालयाची रचना, उच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य
  6. भारतीय निवडणूक आयोग (संविधान कलम 324-329) : निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये, निवडणूक सुधारणा
  7. राज्यपालाची रचना, अधिकार, कार्य (कलम 153) : राज्यपालाचे अधिकार व कार्य, मुख्यमंत्र्याची रचना, अधिकार, कार्य (कलम 164), मुख्यमंत्र्याचे कार्य व अधिकार, मंत्रिपरिषदेची रचना, अधिकार व कार्य, मंत्रिमंडळाचे कार्य व अधिकार
  8. घटकराज्याचे विधिमंडळ : विधानसभा, विधानपरिषद, राज्य विधिमंडळाचे कार्य व अधिकार, राज्यातील कायदा निर्मितीची प्रक्रिया
  9. पंचायतराज स्थापनेची वाटचाल : केंद्र शासनाशी संबंधित समित्या व अभ्यासगट, महाराष्ट्रातील पंचायतराज स्थापनेच्या वाटचालीसंबंधी मुल्यमापन समित्या, ग्रामीण विकासात ग्रामसभेची भूमिका
  10. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेत महिलांचा सहभाग : संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व नागपूर करार, माहितीचा अधिकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय संविधानातील तरतूदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था”
Shopping cart