Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारतीय राज्यघटनेची तोंडओळख

Introduction to Indian Constitution

,

Rs.225.00

भारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असून ब्रिटीश राजवटीतील विविध कायदे, प्रशासकीय रचना व नियमावली यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रो. ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेला ‘महत्त्वपूर्ण असा सामाजिक दस्ताऐवज’ म्हटले.

प्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मुलभूत चौकट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व निवडणूक पद्धती तसेच राज्यघटनेतील विविध कलमे, भाग व परिशिष्ट्ये यांची अद्ययावत व अचूक माहिती देण्यात आली आहे.

  1. भारतीय राज्यघटनेची निर्मिती : अ) भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ब) घटना समिती : भारतातील घटना समितीची निर्मिती, क) राज्यघटनेचा सरनामा/उद्देशपत्रिका : सरनाम्याचे विश्लेषण, ड) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
  2. मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे : अ) मुलभूत हक्क : मुलभूत हक्कांची वैशिष्ट्ये; भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क, ब) मुलभूत कर्तव्ये : मुलभूत कर्तव्यांचे मूल्यमापन, क) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे : राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण
  3. संघराज्य : अ) संघराज्याची वैशिष्ट्ये : केंद्रप्रबळ भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, ब) केंद्र-राज्य संबंध, क) केंद्र-राज्य संघर्षाचे मुद्दे
  4. घटनादुरुस्ती : व्याप्ती आणि मर्यादा : अ) घटनादुरुस्तीच्या तरतूदी : घटनादुरुस्तीची व्याप्ती व मर्यादा; घटनादुरुस्तीच्या तरतुदी/पद्धती, ब) प्रमुख घटनादुरुस्त्या (42 वी, 44 वी आणि 86 वी), क) भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट, विविध महत्त्वपूर्ण खटले
  5. कायदेमंडळ : अ) केंद्रीय कायदेमंडळ – रचना, अधिकार व कार्ये, कार्यकाळ, गणसंख्या; राज्यसभेचे अध्यक्ष – अध्यक्षांचा कार्यकाळ, अध्यक्षांचे अधिकार व कार्ये; संसदेचे अधिकार व कार्ये, ब) घटकराज्य विधिमंडळ – रचना, अधिकार व कार्ये
  6. कार्यकारी मंडळ : अ) केंद्रीय कार्यकारी मंडळ : 1) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती – अधिकार व कार्ये, उपराष्ट्रपती – उपराष्ट्रपतीची पात्रता, 2) पंतप्रधान – अधिकार व कार्ये, भूमिका, 3) मंत्रिमंडळ – अधिकार व कार्ये, भूमिका, ब) घटकराज्य कार्यकारी मंडळ : 1) राज्यपाल – अधिकार व कार्ये, 2) मुख्यमंत्री – अधिकार व कार्ये
  7. न्यायमंडळ : अ) सर्वोच्च न्यायालय – अधिकार व कार्ये : न्यायाधीशांची संख्या, न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशाची पात्रता, शपथ किंवा प्रतिज्ञा, कार्यकाल, महाभियोग प्रक्रिया, वेतन व भत्ते; सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, ब) उच्च न्यायालय – अधिकार व कार्ये : उच्च न्यायालयाची रचना, न्यायाधीशांची संख्या, न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशाची पात्रता, न्यायाधीशांचा कार्यकाळफ
  8. निवडणूक व्यवस्था : अ) निवडणूक आयोग – रचना, कार्य व भूमिका : रचना, निवडणूक आयोग : बहुसदस्यीय आयोग, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये ब) मुख्य निवडणूक आयुक्त : ब) मुख्य निवडणूक आयुक्त : निवडणूक आयुक्तांची संख्या, निवडणूक आयुक्तासाठीची रचना, आयुक्तांचा कार्यकाळ, वेतन व भत्ते, बडतर्फी, राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राज्यघटनेची तोंडओळख”
Shopping cart