Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

लोकप्रशासन

Public Administration

Rs.550.00

लोकप्रशासन व्यवस्था प्राचीन काळापासुन कार्यरत आहे. कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथात प्रशासनाचे किंवा राज्यकारभाराचे नियम व पद्धती यांचे वर्णन केले आहेे. वुड्रो विल्सननी सन 1887 साली राजकारणापासुन प्रशासनाला वेगळे केले तेव्हापासुन लोकप्रशासनाचा उदय झाला आणि त्याला शास्त्राचा दर्जा मिळु लागला. लोकप्रशासन शास्त्राचा अभ्यास विविध अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन केला. लोकप्रशासनाचे सिद्धांत हे पारंपरिक आणि आधुनिक स्वरुपाचे आहेत. लोकप्रशासनाचा संबंध मानवाच्या विविध पैलूंशी आहे. राज्यांनी स्विकारलेल्या विविध कार्यांमुळे आजचे राज्य हे प्रशासकीय राज्य बनले आहे. गरीब आणि अप्रगत राष्ट्रात लोकप्रशासनाची जबाबदारी आणखी वाढत असते. लोकप्रशासन म्हणजे एक प्रकारे नैतीक कार्य करणारे प्रतिनिधीच आहेत.

सदरील ग्रंथाची भाषा साधी, सरळ व सोपी असून एमपीएससी, यूपीएससी तसेच सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.

Lokprashasan

 1. लोकप्रशासन : नविन लोकप्रशासन, नव लोक व्यवस्थापन, चांगली प्रशासकीय व्यवस्था, ई गव्हर्नन्स/ई प्रशासन, माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनावर प्रभाव.
 2. प्रशासनाचे सिद्धांत : प्रशासकीय सिद्धांताचे स्वरुप, व्यवस्थापनाचा सिद्धांत, अभिजात सिद्धांत, नोकरशाहीवरील वेबरचे विचार, अधिसत्तेचे वर्गीकरण, मेरी यार्कर कॉलेरचे विचार/संकल्पना, संघर्ष, चेस्टर्ड बर्नाडचे प्रतिपादन संघटना, बर्नाडचा अधिसत्तेचा सिद्धांत.
 3. सार्वजनिक संघटना : संघटनेचा अर्थ, व्याख्या; संघटनेचे सिद्धांत व प्रकार- 1) संघटनेचा यांत्रिकी दृष्टीकोन किंवा औपचारिक संघटना, 2) संघटनेसंबंधीचा मानवतावादी द़ृष्टीकोन किंवा अनौपचारिक संघटना; संघटनेचे घटक/आधार, कार्य अथवा उद्देश/हेतु, प्रक्रिया, व्यक्ती/प्रज्ञा संबंधीत लोक
 4. प्रशासकीय वर्तणूक : निर्णय प्रक्रिया – वैशिष्ट्ये, प्रकार, पायर्‍या/ तत्वे; निर्णय प्रक्रियेचे स्तर किंवा निर्णय प्रक्रियेची पद्धती, निर्णयप्रक्रियेचे विविध स्तर, आधार, निर्णयप्रक्रिया प्रभावित करणारे घटक, निर्णयप्रक्रियेतील अडचणी; नेतृत्वाचा सिद्धांत – नेतृत्वाची आवश्यकता/गरज, स्वरुप, मार्गदर्शक तत्वे
 5. उत्तरदायित्व : संकल्पना, प्रशासकिय उत्तरदायित्वाची संकल्पना, वैशिष्ट्ये, जबाबदारीची निर्मिती, प्रशासकिय उत्तरदायित्व, लोकप्रशासनाचे जनतेप्रती उत्तरदायित्व; उत्तरदायित्वाचे प्रकार, उत्तरदायित्वाचे महत्त्व, लोकप्रशासनावरील नियंत्रण, नियंत्रणाची आवश्यकता असण्याची कारणे
 6. प्रशासकीय कायदा : प्रशासकिय कायद्याचा इतिहास – अर्थ, स्वरुप, वैशिष्टे, व्याप्ती, डायसीचे विचार, प्रशासकिस कायद्याच्या वाढीचे कारणे, प्रशासकिय कायद्याचा विस्तार, प्रशासकिय कायद्याचे महत्त्व; प्रदत्त विधिनियम – स्वरुप, प्रदत्त विधीनियमांच्या वाढीची कारणे, प्रदत्तविधीनियमांचे/विधानाचे प्रकार
 7. कार्यालयीन प्रशासन : कार्यालयीन प्रशासनाचे स्वरुप- 1) प्राथमिक स्वरुपाची कार्ये, 2) दुय्यम कार्ये, 3) सेवा कार्ये; कार्यालयीन प्रशासनाची कार्ये, कार्यालयीन प्रशासनाचे घटक, नियोजन, आवश्यक घटक, वैशिष्ठ्ये, नियोजनाचे प्रकार, नियोजनाची प्रक्रिया; भारताचे नियोजन मंडळ – नियोजनाची यंत्रणा, रचना
 8. तुलनात्मक प्रशासन : तुलनात्मक प्रशासन- स्वरुप, लोकप्रशासनाच्या अध्ययनाला व्यापक स्वरुप, व्याप्ती, वैशिष्ट्ये, दुहेरी उद्दिष्ट, तुलनात्मक लोकप्रशासनाचा उदय, तौलनिक प्रशासनाचा विकास, लोकप्रशासनाची नवी शाखा, तुलनात्मक लोकप्रशासनाची सुरुवात, अभ्यासाचे प्रकार
 9. विकास प्रशासन : विकास प्रशासन- अर्थ, उद्देश, व्याप्ती, वैशिष्ट्ये, स्वरुप, प्रशासनाचा विकास, विकास प्रशासनाची सुरुवात, विकास प्रशासनाच्या दोन बाजु, विकासात्मक प्रशासन, विकास प्रशासनाची साधने, विकास प्रशासनाच्या समस्या, विकास प्रशासनाची कार्ये, विकास प्रशासनाचे महत्त्व
 10. सार्वजनिक धोरण : प्रशासकिय व्यवस्थेतील मध्यवर्ती प्रक्रिया, धोरण निर्मितीत बाह्य प्रभाव, नीती निर्धारणाचे स्तर, धोरण निश्चित करण्याची पद्धत/प्रक्रिया, धोरण निश्चितीच्या प्रक्रियेत काही वैशिष्ट्ये; धोरण निर्मिती प्रक्रिया – धोरणाचे विश्लेषण, धोरण निर्मिती प्रक्रियेतील अंगे, निती निर्धारणाचे आधार
 11. कर्मचारी प्रशासन : सेवक प्रशासनाची उद्दिष्ट्ये, नोकरशाहीची वैशिष्ट्ये, प्रशासनातील मानवी घटकाचे महत्त्व; सेवक प्रशासन- 1) नोकरशाही/सेवक प्रशासन 2) कुलीन, तांत्रिक व्यवस्था 3) लोकशाही व्यवस्था (लोकतंत्रात्मक पद्धती); नोकरशाहीचे प्रकार, सेवक प्रशासनाचे महत्त्व, नोकरशाहीचे दोष
 12. वित्तीय प्रशासन : वित्तीय प्रशासनाच्या संस्था, वित्तीय प्रशासनाची कार्ये, वित्ताचे महत्त्व, वित्तीय प्रशासनाचे महत्त्व; अंदाजपत्रक/अर्थ संकल्प – अंदाजपत्रक रचनेतील तत्वे, अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, आदर्श अंदाजपत्रकाचे स्वरूप, अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट्ये, आर्थिक नियंत्रणाची उद्दिष्ट्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकप्रशासन”
Shopping cart