Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

मानवी हक्क

Human Rights

Rs.695.00

मानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक, मानवाच्या नैसर्गिक अस्तित्वाशी संबंधित अशा सर्व अधिकारांना मानवाधिकार म्हणतात. प्रत्येकात आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपले व्यक्तिगत गुण, बुद्धिमत्ता व स्वत्त्व भावनेची जपणूक करण्यासाठी मानवाधिकाराची आवश्यकता असते. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. तसेच मानवी हक्कांना नैतिक हक्क. तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.

या ग्रंथात मानवाधिकार, बालविकास, महिला विकास, तरुणवर्गाचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, अपंग कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण मूल्ये आणि नैतिकता इ. प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

Manavi Hakka

 1. मानवाधिकार : मानवी हक्क, अधिकाराची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्कांची वैशिष्ट्ये, स्वरूप, मानवी हक्कांचे वर्गीकरण, नकारात्मक व सकारात्मक हक्क, मानवी हक्क वर्गीकरण
 2. बालविकास /बालकल्याण : प्रस्तावना, बालविकासाचा अर्थ, समाजीकरणाला महत्त्वाचे स्थान, मानवी हक्क जाहीरनाम्यात केलेली तरतूद, बालकांच्या हक्काकडे दुर्लक्ष
 3. महिला विकास : प्रस्तावना, महिला विकासाची आवश्यकता, भारतीय मानसिकता, स्त्री-पुरुष भेद, स्त्रियांच्या महत्त्वाच्या समस्या, विषम स्त्री-पुरुष प्रमाण, भारतातील लिंग विषमता
 4. युवक विकास/युवक कल्याण : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, स्वरूप, युवाशक्तीचे महत्त्व, तरुणांचे वेगळेपण, युवक देशाचे भावी आधारस्तंभ, युवकांसाठी सेवा
 5. आदिवासी विकास : प्रस्तावना, आदिवासी समाजाचा अर्थ, आदिवासी समाजाची व्याख्या, आदिवासींची वैशिष्ट्ये, भारतातील आदिवासींचे वर्गीकरण, भारतातील आदिवासी स्वरूप
 6. सामाजिकद़ृष्ट्या वंचित/उपेक्षित वर्गाचा विकास : प्रस्तावना, अर्थ, जातीची व्याख्या, जातीची लक्षणे, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये, जाती व्यवस्थेचे स्वरूप, अस्पृश्यतेच्या प्रथेचा उगम
 7. वृद्धांचे कल्याण : प्रस्तावना, वृद्धावस्थेची संकल्पना, वृद्धाचा अर्थ, व्याख्या, वृद्धावस्थेतील सुविधांचे स्वरूप, पार्श्वभूमी, वृद्धांचे कल्याण, वृद्धांसाठी कल्याण कार्यक्रम व योजना, वृद्धांच्या समस्या
 8. कामगार कल्याण : प्रस्तावना, औद्योगिक क्रांतीचा अर्थ, नव्या उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये, कारखाना उत्पादन पद्धतीचे परिणाम, आधुनिक उद्योगधंद्यांची वाढ, भारतात आधुनिक उद्योगधंद्यांची वाढ
 9. अपंगांचे कल्याण : प्रस्तावना, अपंगत्वाचा अर्थ, अपंगत्वाच्या व्याख्या, अपंगत्वाचे प्रकार, शारीरिक व्यंग/मानसिक अपंगत्वाची कारणे, मतिमंदत्वाची कारणे, अपंगांच्या समस्या
 10. लोकांचे, विस्थापितांचे पुनर्वसन : प्रस्तावना, पुनर्वसन अर्थ, विस्थापन अर्थ, पुनर्स्थापन अर्थ, विस्थापित म्हणजे कोण?, स्थलांतर करावे लागणे म्हणजे विस्थापन नव्हे
 11. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना : प्रस्तावना, संयुक्त राष्ट्राचा उगम, युनोच्या स्थापनेचा इतिहास, युनोची उद्दिष्टेे, युनोची तत्त्वे, संयुक्त राष्ट्राचे उद्देश, युनोचे सदस्य
 12. ग्राहक संरक्षण : प्रस्तावना, ग्राहक संकल्पना, ग्राहक-अर्थ, ग्राहक संरक्षण अर्थ, ग्राहक चळवळीचा उगम, उद्दिष्टेे, ग्राहक चळवळीचे उद्देश, ग्राहक संरक्षणाची गरज
 13. मूल्ये व नैतिकता : प्रस्तावना, नियमन/प्रमाणके अर्थ, व्याख्या, नियमनाची आवश्यकता, मूल्ये अर्थ, मूल्ये व्याख्या, नीतितत्त्वे, नियमने, मूल्ये व नीतितत्त्वे यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवी हक्क”
Shopping cart