Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

निवडणूक व्यवस्थापन

Election Management

Rs.185.00

निवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गांने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गांने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. 1990 ते 1996 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्गांना दूर केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणाम त्यांचे व राजकीय पक्षांचे वारंवार खटके उडाले. सद्यकाळात राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आचारसंहिता व सुधारणांना मान्यता प्रदान केलेली आहे.

सदरील पुस्तकात निवडणूक व्यवस्थापनाशी निगडित सर्व संकल्पनांचा यथायोग्य आढावा घेवून निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व घटकांचा साकल्याने विचार केलेला आहे. पुस्तकातील एकूण चार प्रकरणात अनुक्रमे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटक, निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारासाठी संबंधित माहिती आणि निवडणुकीसंबंधित मतदान प्रक्रिया आणि राजकीय सहभाग इ. माहितीचा समावेश असून प्रस्तुत पुस्तकलेखनातून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल यात शंका नाही.

Nivadnuk Vyavsthapan

  1. निवडणूक व्यवस्थापन आणि संरचना : निवडणूक व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय?; निवडणूक व्यवस्थापनाच्या यशासाठी आवश्यक अटी; निवडणूक व्यवस्थापनाचे विविध टप्पे वा पायर्‍या; निवडणुकीचे महत्त्व आणि ध्येय व कार्य; निवडणूक प्रक्रियेतील आधुनिक काळातील बदल; निर्वाचन आयोग वा निवडणूक आयोग; निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्य; निवडणूक आयोगाचे महत्त्व, निवडणुकीची आचारसंहिता, सामान्य आचारसंहिता, मतदानाच्या दिवशी अंमलात आणावयाची आचारसंहिता, सत्ताधारी राजकीय पक्षासाठी आचारसंहिता; निवडणूकविषयक सुधारणा; मतदान कक्षांची रचना आणि व्यवस्थापन
  2. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध घटक : मतदान यंत्र, मतदान यंत्राची रचना, मतदान यंत्राचे महत्त्व व वैशिष्टये, मतदार पडताळणीयोग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी, मतदानासाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, मतदान केंद्रातील विविध अधिकारी व कर्मचार्‍याची कर्तव्ये व जबाबदार्‍या; मतदान प्रक्रिया; निवडणूक विषयक गुन्हे; राजकारणाचे गुन्हेगारीकरण, निवडणूक याचिका, मत सर्वेक्षण आणि मतदानोत्तर चाचण्या वा सर्वेक्षण, मत सर्वेक्षण वा चाचण्या वा मतदान पूर्व चाचण्या, मूल्यमापन
  3. निवडणूक प्रकिया आणि प्रचारतंत्र (अभियान) : मतदार नोंदणी पद्धती, मतदार नोंदणी यंत्रणा, मतदाराची पात्रता, मतदाराची अपात्रता, मतदार यादीची निर्मिती, मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमूना, अंतिम मतदार यादी, छायाचित्र मतदार याद्या, निवडणुक ओळख पत्र, कागदोपत्री ओळखीचा पुरावा, निवडणूक कार्यक्रम, उमेदवाराच्या प्रतिनिधीत्वाच्या नामनिर्देशनाची कार्यपद्धती, नामनिर्देशन; निवडणूक अपात्रता; निवडणूक भ्रष्टाचार; राजकीय पक्षाच्या नोंदणीच्या अटी व शर्ती, राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मतदार जागृती अभियान, निवडणुकीच्या प्रचार तंत्रात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, पेड न्युज; उपाययोजना
  4. मतदान पद्धती आणि राजकीय सहभाग : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान; राजकीय सहभाग – प्रभाव पाडणारे घटक; राजकीय सहभागाचे प्रकार वा वर्गीकरण; राजकीय सहभागाच्या पातळ्या वा पद्धती, प्रमाणभिन्नता, राजकीय सहभागाचे महत्त्व; मतदार वर्तनावर प्रभाव टाकणारे घटक; मतदार वा राजकीय उदासीनता : स्वरूप, कारणे आणि उपाय; उपाययोजना किंवा उपाय; राजकीय सहभागातील अडथळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निवडणूक व्यवस्थापन”
Shopping cart