Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सिद्धांत / विचारप्रणाली / चळवळी

आधुनिक राजकीय विचार प्रणाली

Modern Political Thought System

Rs.450.00

राज्यशास्त्रात राजकीय, सामाजिक विचार प्रणालीची सुरवात हॉब्ज, लॉक, रुसो, नंतर हेगेल, मॅक्स वेबर, बेर्थेम सारख्या विचारवंतानी केली आहे. या विचारसरणीला एक वैचारिक व सोबत नैतिक स्वरुपाचे अधिष्ठान होते. नंतरच्या कालखंडात विचारसरणीतील अतिरेकी भूमिका, हिंसात्मकतेला देण्यात आलेले पाठबळ दुसर्‍याच्या विचारांना तुच्छ लेखने यासारख्या आत्मकेंद्रीत विचारांमुळे विचारसणींना विरोध हेऊ लागला. यामुळे वैचारिक प्रगती ऐवजी वैचारिक संघर्षाचे रुपांतर व्यावहारिक संघर्षात होऊन वैचारिक सहिष्णूता अमान्य करण्यात येऊ लागली. त्यातुनच विचारसरणीवर टीका होऊन तिला नाकारणे यासारखा विचार पुढे येऊन ‘विचारसरणीचा अंत’ यासारखा विचार पुढे आला.

‘विचार हा मानवी ठेवा’ असून त्याचा सर्वाधिक प्रभाव हा राज्यशास्त्रावर पडतो. विचारसरणीचे ऐतिहासिक संदर्भ उत्क्रांतत्वानुसार त्यात झालेले बदल, त्यातील विविध प्रवाह व उपप्रवाह, सातत्य वस्तुस्थिती तसेच प्रत्येक विचारसरणीचे महत्त्व तिच्या मर्यादा आणि त्या विचारसरणीवर होणारी टीका या सर्वाच्या अभ्यासासाठी प्रस्तुतचा प्रयत्न यशस्व्ी होईल ही अपेक्षा…

Aadhunik Rajkiya Vichar Pranali

 1. लोकशाही : प्रास्ताविक, लोकशाही संकल्पना अर्थ व व्याख्या, लोकशाहीचे प्रकार लोकशाहीसाठी आवश्यक असणारे घटक, संपूर्ण लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक परिस्थिती
 2. राष्ट्रवाद : प्रास्ताविक, राष्ट्रवादाचा अर्थ व व्याख्या, राष्ट्रवादाचे घटक, राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये, राष्ट्रवादाचा उदय व विकास, राष्ट्रवादाच्या विकासाची कारणे, स्वंयनिर्णयाचे, तत्व वा सिद्धांत
 3. लोकशाही समाजवाद : प्रास्ताविक, समाजवादाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप, भांडवलशाहीचे दोष व समाजवादी उपाय योजना, समाजवादी विचारसरणीचा विकास
 4. पर्यावरणवाद : प्रास्ताविक, पर्यावरणवाद अर्थ, व्याख्या व स्वरूप पर्यावरणवादाचा वा हरित राजकारणाचा विकास पर्यावरण वादाची वैशिष्ट्ये, पर्यावरण विषयाचे महत्त्व. पर्यावरण-अर्थ
 5. मार्क्सवाद : प्रास्ताविक, शास्त्रीय समाजवाद, ऐतिहासिक भौतिकवाद वर्गसंघर्ष सिद्धांत, अतिरिक्त मुल्य सिद्धांत, वर्गयुद्ध, कामगार क्रांती, श्रमिकांची हुकूमशाही, वर्गविरहित समाजरचना
 6. सर्वोदय : प्रास्ताविक, म. गांधीजींचे सर्वोदय संबंधीचे विचार, सर्वोदय अर्थ व व्याख्या, सर्वोदयाची आधारभूत तत्वे. सर्वोदय समाजातील अहिंसात्मक राज्य वा लोकतंत्र
 7. जागतिकीकरण : प्रास्ताविक, जागतिकीकरणाचा अर्थ, स्वरुप, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये, जागतिकीकरणाची प्रक्रिया, जागतिकीकरणाचे परिणाम तसेच प्रभाव
 8. स्त्रीवाद : प्रास्ताविक, स्त्रीवाद अर्थ, स्वरुप, वैशिष्ट्ये आणि विकास, राजकीय प्रक्रियेशी संबंध, महिलांचे सबलीकरण – 1) हिंदु कोडबिलाचे महत्व 2) शासकीय पातळीवरील प्रयत्न
 9. उदारमतवाद : प्रास्ताविक, उदारमतवाद – अर्थ व व्याख्या, उदारमतवादाचे स्वरूप, उदारमतवादाची मूलतत्त्वे, उदय आणि विकास, भारतातील उदारमतावद, उदारमतवादाचे भवितव्य.
 10. फॅसिस्टवाद : प्रास्ताविक – अर्थ, व्याख्या, स्वरूप व विकास, फॅसिझमचे तत्त्वज्ञान फॅसिझमची मुलतत्त्वे वा वैशिष्ट्ये. महामंडळात्मक राज्य, मूल्यमापन, परिक्षण.
 11. नाझीवाद : प्रास्ताविक, नाझीवाद, नाझीतत्त्वज्ञान, नाझीवादाच्या उदयाची कारणे, नाझीवादाची वैशिष्ट्ये, नाझीवादाची सैद्धांतिक भूमिका, नाझीपक्ष त्याची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम.
 12. अराज्यवाद : प्रास्ताविक, अराज्यवादाचा अर्थ व व्याख्या, अराज्यवादाची मूलभूत तत्त्वे वा सुत्रे, अराज्यवादी तत्त्वाचे परिक्षण, अराज्यवादी तत्त्व प्रणालीचे महत्त्व
 13. कन्फ्युशिअसवाद : प्रास्ताविक, परिचय, ग्रंथसंपदा, उत्तम शिक्षक, उत्तम प्रशासक, श्रेष्ठ तत्ववेत्ता, कन्फ्युशिअसचे विचार, जेन एक जीवन मार्ग.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक राजकीय विचार प्रणाली”
Shopping cart