Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)

Indian Economy (Since 1980) (Part - II)

Rs.425.00

भारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.

Bharatiya Arthavyavastha

  1. भारतीय वित्तीय प्रणाली : 1.1 वित्तीय प्रणाली : अर्थ, कार्ये, भूमिका आणि महत्व, 1.2 भारतीय वित्तीय प्रणालीची रचना, 1.3 नाणे बाजार, 1.4 नाणेबाजाराचे महत्व, 1.5 नाणे बाजाराची वैशिष्ट्ये, 1.6 भारतीय नाणेबाजाराचे दोष, 1.7 भारतीय नाणेबाजारात सुधारणा करण्यासाठी सूचना, 1.8 भारतीय नाणेबाजारातील अलीकडील सुधारणा, 1.9 भांडवल बाजार, 1.10 भारतीय भांडवल बाजाराची रचना, 1.11 भारतीय भांडवल बाजाराच्या विकासाला कारणीभूत ठरलेले घटक, 1.12 भारतीय भांडवल बाजाराचे दोष, 1.13 भांडवल बाजारातील सुधारणा, 1.14 सेबी आणि सेबीची कार्ये
  2. भारतातील किंमतीची प्रवृत्ती आणि बँकींग : 2.1 भारतातील किंमतीची प्रवृत्ती, 2.2 भारतातील किंमत वाढीची कारणे, 2.3 भाववाढीचे परिणाम, 2.4 भाववाढ विरोधी सरकारी धोरण, 2.5 भारतीय बँकींग प्रणालीची संरचना, 2.6 व्यापारी बँकांची कार्ये, 2.7 भारतातील व्यापारी बँकांची प्रगती, 2.8 वित्तीय व बँकींग क्षेत्रातील सुधारणा, 2.9 बँकांचे विलीनीकरण, 2.10 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये, 2.11 रिझर्व्ह बँकेचे मौद्रीक/चलन विषयक धोरण, 2.12 विकास बँका, 2.13 भारतातील प्रमुख विकास बँकांची कार्ये व प्रगती
  3. भारताचा विदेश व्यापार आणि व्यवहारतोल : 3.1 विदेश व्यापार, 3.2 भारताच्या विदेश व्यापाराची संरचना, 3.3 भारताच्या विदेश व्यापाराची दिशा, 3.4 भारताचा व्यवहारतोल, 3.5 भारताचे विदेशी व्यापारविषयक धोरण
  4. जागतिकीकरण आणि भारत : 4.1 खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) संकल्पना, 4.2 जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, 4.4 आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था व व्यापार संघटना, 4.2 आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक/जागतिक बँक, 4.3 जागतिक व्यापार संघटना
  5. भारतातील संघीय वित्त : 5.1 भारतातील संघ वित्तीय प्रणालीची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये, 5.2 वित्तीय साधनांचे विभाजन, 5.3 वित्त आयोगाची कार्ये, 5.4 पहिला ते नवव्या वित्त आयोगांनी केलेल्या शिफारशींचा सारांश, 5.5 वित्त आयोगांच्या शिफारशी, 5.6 केंद्र आणि राज्य सरकारांच्या वित्तीय संबंधांमध्ये तणाव
  6. भारताचा सार्वजनिक महसूल : 6.1 सार्वजनिक महसूल, 6.2 भारतीय कर रचना, 6.3 केंद्र सरकारचा महसूल, 6.4 राज्य सरकारांचा कर महसूल, 6.5 वस्तू व सेवा कर, 6.6 भारतीय करप्रणालीची वैशिष्ट्ये, 6.7 भारतीय करप्रणालीचे दोष, 6.8 कर सुधारणाबाबत विविध समितीच्या शिफारशी, 6.9 भारतातील काळा पैसा
  7. भारतातील सार्वजनिक खर्च : 7.1 भारत सरकारच्या खर्चाची रचना, 7.2 केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती, 7.3 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 7.4 सार्वजनिक खर्चाचे परिणाम, 7.5 सार्वजनिक खर्चाचे व्यवस्थापन
  8. सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा : 8.1 सार्वजेनक कर्ज, 8.2 सार्वजनिक कर्जाचे प्रकार, 8.3 सार्वजनिक कर्जाचे मार्ग, 8.4 भारतातील सार्वजनिक कर्जाची प्रवृत्ती, 8.5 सार्वजनिक कर्जात वाढ होण्याची कारणे, 8.6 सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 8.8 भारतातील तुटीचा अर्थभरणा, 8.9 तुटीच्या अर्थभरणाची सुरक्षित मर्यादा, 8.10 तुटीच्या अर्थभरणाचे परिणाम, 8.11 भारतातील वित्तीय उत्तरदायित्व / जबाबदारी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)”
Shopping cart