Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

अर्थशास्त्राची मूलतत्त्वे

Principles of Economics

,

Rs.195.00

अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. 16 व्या व 17 व्या शतकात व्यापारवादी विचारवंतानी शासनाला ज्या शिफारसी व धोरणे सुचविली ती अर्थव्यवस्थेसंदर्भातच होती. 18 व्या शतकात निसर्गवादी फ्रेंच विचारवंतानीसुध्दा राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यावर विश्लेषण केलेले दिसून येते. तसेच अ‍ॅडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस.मिल यांच्या सिध्दातांतही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण वेतन, एकूण खंड व एकूण नफा यामध्ये होणार्‍या विभाजनाविषयी चर्चा केलेली आढळते. 1929 च्या जागतिक महामंदीनंतर मात्र अर्थशास्त्रीय विचारात मूलभूत व क्रांतिकारी बदल झालेले दिसतात. लॉर्ड केन्स यांचे 1936 मध्ये ‘द जनरल थिअरी’ हे युगप्रवर्तक पुस्तक प्रकाशित झाले. केन्सने प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा पाया रचला. सदर पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या, उपयोगिता दृष्टीकोण, मागणी व मागणीची लवचिकता, उत्पादन फलन, उत्पादन व्यय, प्राप्ती किंवा उत्पन्न ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा उहापोह केला आहे.

Arthashasarachi Multatve

  1. अर्थशास्त्राची ओळख : 1.1. अर्थशास्त्राची व्याख्या : अ‍ॅडम स्मिथ, मार्शल, रॉबिन्स, 1.2. अर्थशास्त्राची व्याख्याः जे.के.मेहता, अमर्त्य सेन, महालनोबिस, 1.3 आर्थिक नियम, 1.4 सूक्ष्म अर्थशास्त्र, 1.5 स्थूल अर्थशास्त्र
  2. उपयोगिता दृष्टीकोण : 2.1 उपयोगिता : अर्थ व व्याख्या, 2.2 आर्‍हासी सिमांत उपयोगिता नियम, 2.3 समसिमांत उपयोगिता नियम, 2.4 मागणी : अर्थ, व्याख्या व मागणीतील बदल, 2.5 मागणी नियम व अपवाद
  3. मागणीची लवचिकता : 3.1 मागणीची लवचिकता : संकल्पना व प्रकार, 3.2 मागणीची लवचिकता मापन पध्दती, 3.3 मागणीची लवचिकता : निर्धारक घटक व महत्व, 3.4 तटस्थता वक्र: अर्थ, व्याख्या व पर्यायता दर, 3.5 तटस्थता वक्र : वैशिष्ट्ये
  4. उत्पादन फलन : 4.1 उत्पादन फलन, 4.2 बदलत्या प्रमाणाचा नियम, 4.3 समउत्पत्ती वक्र : संकल्पना व वैशिष्ट्ये, 4.4 अंतर्गत मितव्ययता किंवा बचती व अमितव्ययता किंवा अबचती, 4.5 बहिर्गत मितव्ययता किंवा बचती व अमितव्ययता किंवा अबचती
  5. उत्पादन व्यय व उत्पन्न : 5.1 उत्पादन व्यय : अर्थ व व्याख्या, 5.2 अल्पकाळ : उत्पादन व्यय वक्र, 5.3 दीर्घकाळ : उत्पादन व्यय वक्र, 5.4 प्राप्ती, 5.5 एकूण, सरासरी व सिमांत प्राप्ती वक्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अर्थशास्त्राची मूलतत्त्वे”
Shopping cart