Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

मौद्रिक प्रणाली

Monetary System

,

Rs.160.00

“मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्‍या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्‍या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्‍या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.

Maudrik Pranali

  1. मुद्रा : 1.1 वस्तू-विनिमय पद्धती आणि त्यातील समस्या, 1.2 मुद्रेचा संक्षिप्त इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरुप, 1.3 मुद्रेची कार्य – 1) प्राथमिक कार्य, 2) दुय्यम/गौण कार्ये, 3) इतर कायर्र्, मुद्रेचे महत्व, 1.4 मुद्रेचे प्रकार, 1.5 विमुद्रीकरण : गुण आणि दोष.
  2. मुद्रामूल्य : 2.1 मुद्रेची मागणी – अर्थ आणि निर्धारक घटक, 2.2 मुद्रेचा पुरवठा : अर्थ आणि निर्धारक, 2.3 मुद्रेच्या मागणी-पुरवठ्याचे संतुलन, 2.4 फिशरचा मुद्रापरिणाम सिद्धांत, 2.5 फिशरच्या सिद्धांताचे टिकात्मक परीक्षण
  3. किंमतीतील चढउतार : 3.1 स्फिती : अर्थ, व्याख्या आणि कारणे, 3.2 मुद्रास्फिती : परिणाम आणि मापन, 3.3 अपस्फिती : अर्थ, व्याख्या आणि कारणे, 3.4 अपस्फिती : परिणाम आणि मापन, 3.5 व्यापार चक्र – संकल्पना आणि अर्थ
  4. मुद्रा बाजार किंवा नाणे बाजार : 4.1 अर्थ, व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि उद्दिष्ट्ये, 4.2 भारतीय मुद्रा बाजार, 4.3 मुद्राबाजाराची कार्ये आणि महत्त्व, 4.4 मुद्रा बाजारातील संस्था आणि साधने, 4.5 विमुद्रीकरणाचा भारतीय मुद्रा बाजारावर झालेला परिणाम
  5. भांडवल बाजार : 5.1 भांडवल बाजाराची संकल्पना, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप आणि उद्दिष्ट्ये, 5.2 भारतीय भांडवल बाजाराची संरचना आणि घटक, 5.3 भांडवल बाजाराची कार्ये आणि महत्त्व, 5.4 सेबी : संघटनात्मक रचना, कार्ये, अधिकार आणि जबाबदार्‍या, 5.5 मुद्रा आणि भांडवल बाजारातील सेबीची भूमिका.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मौद्रिक प्रणाली”
Shopping cart