Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संज्ञापन

बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती

Principles and Practices of Banking

Rs.395.00

वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र ही एक गतीमान विद्याशाखा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात. त्या वाणिज्य विद्याशाखेत प्रतिबिंबीत होतात. खरे म्हणजे ही विद्याशाखा प्रत्येक देशात एक लिडरच्या भूमिकेत वावरत असते. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असतो. याची ही विद्याशाखा धोरणकर्त्यांना जाणिव करून देत असते. देशाच्या अर्थखात्याचा प्रमुख अर्थशास्त्र व वाणिज्यचा जाणकार असेल तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेवून पोहोचवतो हे प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. मनमोहन सिंग ह्या माजी अर्थमंत्र्यांनी सिद्ध केले आहे.
वाणिज्य विद्याशाखेत बँकींग अ‍ॅन्ड फायनान्स हा एक कोअर विषय आहे. उद्योगधंद्यांना कर्जरूपाने रक्त पुरवठा करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. बँक हा एक नफा तोट्याला जबाबदार असणारा व्यवसाय आहे. काळानुरूप त्यात सतत बदल होत आहेत. आजची भारतीय बँकींग प्रणाली बरीच विकसित झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची गती वाढविण्याचे कार्य बँका आणि वित्तीय संस्था करीत आहेत.

Banking Multattve Karyapaddhati

  1. पैसा : 1.1 पैशांची उत्क्रांती – व्याख्या आणि अर्थ, पैशाची कार्ये, भूमिका आणि महत्त्व 1.2 पैशाचे प्रकार 1.3 पैसा आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था 1.4 पैशाचा चक्राकार प्रवाह – कुटुंबसंस्था आणि व्यवसाय संस्थांमध्ये पैशाचा चक्राकार प्रवाह; पैशाच्या चक्रीय प्रवाहाची गृहिते, बचत आणि गुंतवणूक युक्त पैशाचा चक्राकार प्रवाह.
  2. बँकींगचा परिचय : 2.1 बँकांची उत्क्रांती – बँकांची उत्क्रांती आणि विकास 2.2 बँक : अर्थ अणि व्याख्या 2.3 बँकाची कार्ये 2.4 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका 2.5 बँकेत्तर वित्तीय संस्था.
  3. बँकांचे वर्गीकरण आणि प्रकार : 3.1 बँकांचे रचनात्मक वर्गीकरण – अ) शाखा बँकींग – वैशिष्ट्ये, फायदे/गुण, तोटे/दोष ब) एकल/एकावयवी बॅकींग – वैशिष्ट्ये, फायदे/गुण, तोटे/दोष क) शृंखला बँकींग – फायदे/गुण, तोटे/दोष ड) समुह बँकींग-फायदे/गुण, तोटे/दोष 3.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण 3.3 बँकांचे मालकीनुसार वर्गीकरण 3.4 आधुनिक बँका – प्रकार
  4. भारतात इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम : 4.1 बँक उत्पादने/सेवांमधील तंत्रज्ञान – बँकींग सेवांमध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता/महत्व/भूमिका/फायदे; बँक खातेदार/ग्राहकाचा फायदे, बँकेला फायदे 4.2 भारतातील देणी देण्याच्या (भुगतान) आणि हिशेब पूर्ती (निपटारा) करण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीची उत्क्रांती – भारतातील देणी देण्याच्या आणि हिशेबपूर्तीच्या पद्धती – बँकांचे संगणकीकरण, स्वयंचलित टेलर यंत्र, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, टेलेबँकिंग, क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग
  5. बँकांचे आर्थिक व्यवहार-1 : 5.1 बँक खात्याचे प्रकार – चालू खाते , बचत खाते, मुदत ठेव खाते, पुनरावर्ती/आवर्ती ठेव खाते 5.2 बँकेत खाते उघडण्याची पद्धती व बँक खाते बंद करणे 5.3 के.वाय.सी. तुमच्या ग्राहकाची ओळख 5.4 ग्राहकांचे/खातेदारांचे प्रकार, मर्यादित कंपनी खाते; कंपनीचे प्रकार, विश्वस्त/न्यासाचे खाते.
  6. बँकींगचे व्यवहार-2 : 6.1 कर्ज सुविधांचे प्रकार 6.2 चलनक्षम दस्तऐवज 6.3 धनादेश 6.4 प्रदायी बँकांची जबाबदारी 6.5 धनादेशाचे रेखांकन 6.6 पृष्ठांकन 6.7 प्रदायी बँकर/पैसे देणारी बँक/पेढी 6.8 प्रभार आणि प्रभाराच्या पद्धती
  7. बँकांचा ताळेबंद आणि व्यापारी बँकांची बहुगुणीत पतनिर्मिती : 7.1 बँकांचे ताळेबंद- देयता/देणे बाजू, मालमत्ता/येणे बाजू 7.2 पतनिर्मिती – पतनिर्मितीचा अर्थ, व्याख्या 7.3 पतनिर्मिती प्रक्रिया 7.4 पतनिर्मिती प्रक्रियेच्या मर्यादा
  8. सुदृढ बँकींगची तत्वे : 8.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता 8.2 बँकीगची तत्वे 8.3 रोखता आणि लाभप्रदता यांच्यात परस्पर विरोध 8.4 रोखता आणि लाभप्रदता या तत्वामध्ये समन्वय/सलोखा
  9. बँकेची वित्तीय आणि आर्थिक स्थिरता : 9.1 आर्थिक स्थिरता : अर्थ 9.2 वित्तीय स्थिरतेचे महत्व – बँकेच्या सक्षमतेबाबत सुदृढ निर्देशक 9.3 वित्तीय स्थिरता प्रमाण 9.4 भांडवल पुर्तता प्रमाण किंवा भांडवली पर्याप्तता प्रमाण 9.5 अनुत्पादक मालमत्ता किंवा अलाभदायी मालमत्ता 9.6 वित्तीय अस्थिरता टाळण्याचे मार्ग
  10. मध्यवर्ती बँक : 10.1 मध्यवर्ती बँक 10.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये 10.3 मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यातील फरक 10.4 मध्यवर्ती बँकेची अर्थव्यवस्थेतील भूमिका 10.5 भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना व संघटन 10.6 भारतीय रिझर्व्ह बँकेची विकासात्मक आणि प्रवर्तनात्मक कार्ये
  11. मध्यवर्ती बँकेचे मौद्रीक/चलन विषयक धोरण : 11.1 चलन विषयक/मौद्रिक धोरण 11.2 चलनविषयक धोरणाचे लक्ष्य – मुख्य लक्ष्य 11.3 भारतीय रिझर्व्ह बँक आणि पत नियंत्रण 11.4 पतनियंत्रणाची चलन विषयक साधने 11.5 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन रोखतेचे व्यवस्थापन 11.6 रोखता समायोजन सुविधा
  12. ग्रामीण व सूक्ष्म वित्तपुरवठा आणि वित्तीय समावेशन : 12.1 ग्रामीण वित्तपुरवठा 12.2 ग्रामीण भागाला व शेतीला पतपुरवठ्याची गरज 12.3 ग्रामीण भागात व शेतीसाठी कर्जपुरवठ्याची साधने 12.4 वित्तीय समावेशन 12.5 सूक्ष्म वित्तपुरवठा – व्याख्या, अर्थ; सूक्ष्म वित्तपुरवठ्याची वैशिष्ट्ये, सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे फायदे/महत्व, मायक्रोफायनान्सचे महत्व, सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे उद्देश; भारतातील सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांचे प्रकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती”
Shopping cart