Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

भारतीय युद्धकला

Indian Art of War

,

Rs.250.00

जगातील कोणत्याही राष्ट्राचा लष्करी इतिहास पाहिला तर असे दिसून येते की संघर्ष जिंकण्यासाठी प्रत्येक राष्ट्र विशाल युद्धनीती, युद्धापूर्वीची युद्धनीती व युद्धातील युद्धनीती किंवा डावपेच या संकल्पनांचा वापर करताना दिसतात. भारतीय लष्करी इतिहासही याला अपवाद नाही. लढाई व युद्धाचा संबंध हा फक्त रणक्षेत्रापुरताच मर्यादित नसून त्याचा मानवाच्या सर्वांगिण घडामोडींशी संबंध आहे. कारण मानवनिर्मित सर्वच क्षेत्रांवर लढाईचे व युद्धाचे परिणाम होतात.

भारताच्या लष्करी इतिहासात प्राचीन कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक लाहन-मोठ्या स्वरुपाच्या लढाया झाल्या. यात झेलमची लढाई,ख पानिपतची पहिली व तिसरी लढाई, इंग्रज-मराठा यांच्यात झालेली असईची लढाई, स्वतंत्र काश्मीरचे युद्ध, भारत-चीनमधील 1962 मध्ये झालेले युद्ध, 1965 व 1971 मध्ये भारत-पाकिस्तानात झालेली युद्धे इ. या सर्व लढायात किंवा युद्धात उभय बाजूकडील तुलनात्मक सैन्यशक्ती, त्यांच्या युद्धयोजना, लढाईचे परिणाम, प्रत्यक्ष युद्धकार्यवाही व लढाईपासून मिळालेले लष्करी धडे या सर्व मुद्यांचा सविस्तर ऊहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

भारतावर प्राचीन काळापासून जेवढी परकीय आक्रमणे झाली त्यांचा भारतीय संस्कृतीशी संबंध आला. त्या आक्रमणांमुळे भारतीय समाज व इतिहास बदलला. एवढेच नाही तर या लढायांनी किंवा युद्धांनी भारतीय लष्करी इतिहासाला नवे बळण मिळवून दिले. म्हणूनच ङ्गभारतीय युद्धकलाफ या ग्रंथामध्ये सर्वांचा सखोलपणे विचार केलेला आहे.

Bharatiya Yuddhakla

  1. युद्धनिती किंवा सामरिकता किंवा डावपेच : अ) ग्रँड स्ट्रॅटेजी, व्याख्या; महान युद्धनीती – अर्थ आणि संकल्पना, महान युद्धनीतीचे उद्देश, ब) युद्धनीती – व्याख्या, युद्धनीती – अर्थ आणि संकल्पना, युद्धनीतीचे उद्देश, युद्धनीतीचे प्रकार, क) युद्धकला किंवा डावपेच – अर्थ आणि संकल्पना
  2. भारत-ग्रीक युद्धकला : (झेलमची लढाई – इ.स.पूर्व 326) : अ) प्रस्तावना – ग्रीक संस्कृती व लष्करी वारसा ब) अलेक्झांडर किंवा सिकंदर क) पौरस/पोरस उर्फ पोरू – झेलमची लढाई, कारणे ड) तुलनात्मक सैन्यशक्ती इ) युद्धयोजना ई) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही, परिणाम
  3. भारत-तुर्क युद्धकला : (तराईनची पहिली व दुसरी लढाई – इ.स.1191 व 1192) : अ) प्रस्तावना ब) तुर्कांची सैन्यपद्धती; तराईनची पहिली लढाई (इ.स.1191), तराईनची दुसरी लढाई (इ.स.1192) क) सैन्यशक्ती व शस्त्रास्त्रे, सैन्यरचना ड) लढाईची रचना किंवा योजना ई) आक्रमण/युद्धकार्यवाही
  4. भारत-मोगल युद्धकला : (पानिपतची पहिली लढाई – इ.स.1526) : अ) प्रस्तावना; पानिपतची पहिली लढाई ब) तुलनात्मक लष्करी क्षमता किंवा सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या, शस्त्रास्त्रे क) युद्धयोजना व युद्धरचना ड) युद्धकार्यवाही किंवा आक्रमण ई) बाबरच्या विजयाची व खानाच्या पराभवाची कारणे
  5. हळदीघाटची लढाई : (इ.स.1576) : अ) प्रस्तावना, ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा पूर्वेतिहास किंवा कारणे ब) सैन्यशक्ती क) युद्धयोजना ड) आक्रमण इ) परिणाम, महत्त्व किंवा शिकवण फ) लढाईत वापरण्यात आलेल्या युद्धतंत्राचा वापर – उद्दिष्टांची निवड व त्यांचे सातत्य, आक्रमक कार्यवाही
  6. प्लासीची लढाई : (इ.स.1757) : अ) प्रस्तावना – ऐतिहासिक पार्श्वभूमी ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) युद्धयोजना किंवा लढाईची योजना किंवा सैन्यरचना ड) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही – इंग्रजांच्या विजयाची कारणे ई) लढाईचे परिणाम व महत्त्व; लढाईपासून मिळालेले लष्करी धडे
  7. मराठ्यांची युद्धकला : (पानिपतची तिसरी लढाई – इ.स.1761) : अ) प्रस्तावना; पानिपतची तिसरी लढाई (1761) ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) युद्धयोजना – सैन्यरचना इ) प्रत्यक्ष युद्ध कार्यवाही किंवा आक्रमण फ) मराठ्यांच्या पराभवाची कारणे ह) पानिपतच्या तिसर्‍या लढाईचे परिणाम
  8. भारत-ब्रिटिश युद्धकला : (असईची लढाई – इ.स.1803) : अ) प्रस्तावना – लढाईची कारणे, लढाईपूर्वीच्या हालचाली ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) लढाईची युद्धयोजना/सैन्यरचना ड) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही किंवा लढाई किंवा युद्धकार्यवाही इ) लढाईचे परिणाम
  9. भारत-पाक युद्धकला : (काश्मीर संघर्ष – सन 1947-48) : अ) प्रस्तावना ब) ऑपरेशन चिनार क) लडाख विभागातील लढाई – जोझिलाची लढाई ड) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा युद्धबंदी रेषा ई) 1947-48 च्या युद्धातून निघालेले निष्कर्ष किंवा भारताला मिळालेली शिकवण
  10. भारत-चीन युद्धकला : (सन 1962 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ब) तुलनात्मक सैन्यसंख्या क) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही; अघोषित युद्धाची स्थगिती व कोलंबो प्रस्ताव ड) नेफामधील मोहिम किंवा नामकाचूची लढाई ई) लडाख मोहिम; चीनची विभागानुसार युद्धकार्यवाही
  11. भारत-पाक युद्धकला : (सन 1965 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – 1965 च्या युद्धाची कारणे ब) तुलनात्मक सैन्यशक्ती; प्रत्यक्ष युद्धकार्यवाही किंवा 1965 चे युद्ध क) असल उत्तरची लढाई किंवा खेमकरणची किंवा रणगाड्याची लढाई ड) छांबमधील मोहिम किंवा छांबची आघाडी ई) ताश्कंद करार
  12. भारत-पाक युद्धकला : (सन 1971 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा कारणे ब) तुलनात्मक सैन्यशक्ती – भारतीय युद्धडावपेच, पाकिस्तानी युद्धडावपेच क) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही – पूर्व आघाडी; पश्चिम आघाडी; ड) सिमला करार इ) लढाईपासून मिळालेले लष्करी धडे किंवा मिळालेली शिकवण; प्रमुख लढाया

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय युद्धकला”
Shopping cart