Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

संरक्षण अर्थशास्त्र

Defense Economics

, ,

Rs.275.00

‘संरक्षण अर्थशास्त्र’ राष्ट्रीय विकासाच्या पायातील महत्त्वाचा भाग असून त्याचा संबंध नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनमानाच्या, राहणीमानाच्या स्तराशी आहे. अर्थशास्त्राच्या सर्व योजनामध्ये प्रथमतः संरक्षण खर्चाचा विचार होणे अत्यावश्यक असते. संरक्षण खर्च अनुत्पादीत आहे का आवश्यक आहे. या विचारापलिकडे जावून राष्ट्राची अस्मिता सांभाळणे गरजेचे आहे.

संरक्षण आणि सामरिकशास्त्राच्या अभ्यासकांच्या अत्यावश्यक गरजेतील महत्त्वाची गरज ‘संरक्षणावर होणारा योग्य खर्च’ आहे. भूतकालीन खर्चाच्या आढाव्यातून, अनुभवातून, भविष्यकालीन सुखावह, स्थिर मार्ग निश्चित करता येतो. संरक्षण अर्थशास्त्रावर जी काही माहिती उपलब्ध आहे ती बहुतांशी इंग्रजी भाषेतून असून काही अंशी हिन्दी भाषेतून प्राप्त होते. मराठी भाषेत मात्र या विषयावर सविस्तर लिखाण झालेले नाही. महाराष्ट्रातील अभ्यासकांना मराठा रेजिमेंटच्या शूटशिपाई, अधिकारी आणि योद्ध्यांना संरक्षण अर्थशास्त्राची जाणीव व्हावी, त्याची दिशा निश्चित करता यावी यासाठी या लेखनाचा प्रयत्न झालेला आहे.

Sanrkshan Arthashastra

  1. संरक्षण आर्थिक सिद्धांत : अ) समकालिन आर्थिक सिद्धांत – अ‍ॅडमस्मिथ, डेव्हिड रिकार्डो, थॉमस रॉबर्ट माल्यस, अल्फ्रेड मार्शल, जॉन बॅटिस्ट से ब) परिणामकारक मागणी, प्रभावी मागणी – परिणामकारक मागणीचे घटक, आर्थिक कल्याण आणि राष्ट्रीय उत्पन्न
  2. संरक्षण अर्थसंकल्प : अ) अर्थसंकल्प, ब) अंदाजपत्रक प्रकार – अर्थसंकल्पातील उद्दिष्ट्ये, क) भारतीय संरक्षण अंदाजपत्रक – तुलनात्मक संरक्षण खर्च, भारतीय संरक्षण खरेदी पद्धती, संरक्षण लहान शस्त्र निर्मिती करार
  3. संरक्षण आणि विकास : स्वतंत्र भारताचे प्रशासन – केंद्रीय भारत सरकारचे उत्पन्न खर्च, अंदाज पत्रकाचे कार्य, उद्दिष्ट्ये संघटन ब) योजना खर्च – मुलकी खर्च, संरक्षण खर्च, राज्यांना सहाय्यक अनुदाने, भांडवली अंदाजपत्रक, अंदाजपत्रक रचना, खाद्यनियंत्रण, युद्धाचे आर्थिक व्यवस्थेवरील परिणाम
  4. राष्ट्रीय उत्पन्न : राष्ट्रीय उत्पन्न – स्थूल देशांतर्गत उत्पादन, विदेशी गुंतवणूक, बौद्धीक संपदा अधिकार, संरक्षण खर्च, संरक्षण सेवावरील महसुली व भांडवली खर्च, संरक्षण खर्चातील निवृत्तीवेतनावरील खर्च
  5. युद्धकालीन अर्थव्यवस्था : युद्धकालिन अर्थव्यवस्था – विदेशी भांडवल, भांडवलाची आवश्यकता, परकीय चलन, नियंत्रण पद्धती, कर पद्धती, निश्चितीवरील समस्या, कर पद्धतीची गुणवैशिष्ट्ये, कर्ज पद्धती, कर्ज.
  6. युद्धोत्तर अर्थव्यवस्था : युद्धोत्तर अर्थव्यवस्था आणि पुनःनिर्मिती – युद्धोपरांत अर्थव्यवस्थेतील दोष, युद्धकालिन नियोजन आणि उत्पादन, शांतताकालिन अर्थव्यवस्था, युद्धाची संरक्षणक्षमता, औद्योगिक विकास, वाहतुक व दळणवळणाची साधने, लोकसंख्या, अन्नधान्य, भांडवल, भौतिक साधने.
  7. स्वातंत्र्योत्तर भारतीय संरक्षण खर्च : संरक्षण खर्च – भारतीय संरक्षण अंदाजपत्रक, तिनही सेवादलांचा अर्थसंकल्पातील सहभाग, संरक्षणासाठी ‘मेक इन इंडिया’, अस्त्रे क्षेपणास्त्रे, संरक्षण पार्क, भारत ईस्त्राइल करार, संरक्षण औद्योगिक हब, सर्जिकल स्ट्राईक, एफडीआय, सैनिक मनोधैर्य, राफेल करार, वन रँक वन पेन्शन, संरक्षण खरेदी पद्धती, एक्झरसाईज कोर्स 18
  8. युद्धमुल्य व गतिमान अर्थव्यवस्था : युद्धाची किंमत – एकूण युद्ध खर्च, राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाण स्तरावर, लोकजीवनाच्या राहणीमानाधारे, आयात-निर्यातीच्या स्तरावर, गतिमान अर्थव्यवस्था, लोकसंख्येतील बदल, उत्पन्नातील बदल, जनतेच्या आवडीनिवडीतील बदल, संघटनेतील बदल, भांडवली पुरवठा व यातील बदल, अन्य बदल, मुल्य नियंत्रण.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संरक्षण अर्थशास्त्र”
Shopping cart