Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्राकृतिक व मानवी भूगोल

Physical and Human Geography

, , , ,

Rs.225.00

प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. या मध्ये प्रामुख्याने शीलावरण, वातावरण, जिवावरण, व जलावरण या प्रमुख बाबींचा समावेश होतो. पृथ्वीचे भुकवच, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या बाहेरील असणारे वातावरण, त्या वातावरणाचे विविध घटक, पृथ्वीवरील वायुभार पट्टे, त्यांचा इतर अनेक घटकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणार्‍या सह संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे महत्व, स्वरूप, व्याप्ती, याशिवाय त्यामध्ये मानवी लोकसंख्या, मानवी वसाहत, शेती इत्यादी मानवी जीवनाशी निगडीत बाबींचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक पर्यावरण, त्या पर्यावरणातील अनेक घटक मानवी जीवनावर परिणाम घडवून आणतात. लोकसंखेच्या बाबत भारतीय लोकसंख्या, तिची रचना, वितरण, त्यावर परिणाम करणारे घटक, जागतिक दृष्टिकोणातून लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, भारतीय लोकसंख्या वाढीचे गुण दोष, तर भारतातील विविध वसाहतींचे प्रकार, आकृतीबंध, नागरीकरण, नागरीकरणाचे स्वरूप, देशात व राज्यातील नागरीकरणाची स्थिति, भारतीय शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती आणि शेतकरी यांच्या समस्या इत्यादी दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.

Prakritik V Manavi Bhugol

  1. प्राकृतिक भूगोलाची ओळख : 1.1 प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या 1.2 प्राकृतिक भूगोल : स्वरूप व व्याप्ती 1.3 प्राकृतिक भूगोलाच्या शाखा 1.4 पृथ्वी प्रणालीचे घटक
  2. शिलावरण : 2.1 पृथ्वीचे अंतरंग 2.2 वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत 2.3 नदीचे अपक्षरण चक्र
  3. वातावरण : 3.1 वातावरणाचे घटक 3.2 वातावरणाची रचना 3.3 भू-औष्णिक संतुलन 3.4 पृथ्वीवरील दाब पट्टे व हवेची स्थिती 3.5 वृष्टीची रूपे आणि प्रकार
  4. जलावरण : 4.1 जलचक्र 4.2 सागर तळ रचना व भूरूपे 4.3 सागरी लाटा, भरती- ओहोटी
  5. मानवी भूगोलाची ओळख : 5.1 मानवी भूगोलाच्या व्याख्या 5.2 मानवी भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती 5.3 मानवी भूगोलाच्या शाखा आणि महत्व
  6. लोकसंख्या : 6.1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक 6.2 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत 6.3 भारतीय लोकसंख्येची संरचना
  7. वसाहती/वस्ती : 7.1 ग्रामीण वसाहतीचे प्रकार आणि आकृतीबंध 7.2 भारतातील नागरीकरण 7.3 महाराष्ट्रातील नागरीकरण
  8. शेती : 8.1 शेतीचे प्रकार 8.2 शेतीवर परिणाम करणारे घटक 8.3 भारतीय शेती-समस्या

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राकृतिक व मानवी भूगोल”
Shopping cart