Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

मानवी व आर्थिक भूगोल

Human and Economic Geography

,

Rs.450.00

भूगोल हे सर्वसमावेशक शास्त्र आहे. भूगोल या विषयात केवळ प्राकृतिक वा नैसर्गिक घटक व घटनांचाच अभ्यास समाविष्ट होत नसून त्यात मानवी क्रियाशीलतेचाही अभ्यास समाविष्ट होतो. किंबहुना मानवी भूगोल हे संपूर्ण भूगोल विषयाचे एक आवश्यक अंग आहे. मानवाने आपल्या बुध्दी व कौशल्याच्या जोरावर निसर्गातील साधनसंपदेचा उपयोग आपले जीवन सुखकर होण्यासाठी केलेला आहे. कोळसा, खनिज तेल, लोह, धातु यांचा शोध घेऊन त्यांचा उपभोग घेऊन आपले राहणीमान उंचावले व जीवन अधिकाधीक संपन्न करुन घेतले. मानव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी विविध साधनांची निर्मिती करीत असतो. अशा संपदेचा त्यांच्या उत्पादन, वितरण यासंबंधीचा अभ्यास व मानव-संसाधन सहसंबंधाचा अभ्यास हे आर्थिक भूगोलाचे अभ्यासक्षेत्र आहे. प्राथमिक, व्दितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांमध्ये पर्यावरणीय घटकांमुळे बदल होतांना दिसून येतात. म्हणूनच आर्थिक भूगोलात मानवी व्यवसाय व भौगोलिक घटकांचा अभ्यास व त्यातील परस्पर संबंध अभ्यासला जातो.

प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा यथायोग्य प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशांचा वापर केलेला आहे. प्रत्येक संज्ञा व संकल्पना सर्वांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.

Manavi Ani Aarthik Bhugol

  1. मानवी भूगोलाचा परिचय : 1.1 मानवी भूगोल, 1.2 मानवी भूगोलचे स्वरूप, 1.3 मानवी भूगोलाची व्याप्ती, 1.4 मानवी भूगोलाच्या शाखा, 1.5 मानव आणि पर्यावरण, 1.6 निसर्गवाद व संभववाद, 1.7 थांबा व जा निसर्गवाद
  2. मानव वंश : 2.1 मानवी वंश, 2.2 मानववंशाची शारीरिक लक्षणे (मानवी वंश : निकष), 2.3 जगातील प्रमुख वांशिक गट, 2.4 मानव वंश उत्क्रांतीचा ग्रिफिथ टेलरचा भूकटिबंध व स्तर सिध्दांत, 2.5 भारतातील वांशिक गट
  3. पर्यावरण समायोजनाचे प्रकार : 3.1 शीत हवामान प्रदेशातील मानवी जीवन, 3.2 आयनिक/उष्ण हवामान प्रदेशातील मानवी जीवन, 3.3 पर्वतीय प्रदेशातील मानवी जीवन
  4. भारतीय आदिवासींचा अभ्यास : 4.1 भारतातील आदिवासी जमाती; भारतातील काही प्रमुख जमाती व त्यांचा निवास प्रदेश, अ) भिल्ल, ब) गोंड, क) नागा, ड) संथाळ
  5. आर्थिक भूगोलाचा परिचय : 5.1 आर्थिक भूगोलाच्या व्याख्या, 5.2 आर्थिक भूगोलाचे स्वरुप, 5.3 आर्थिक भूगोलाची व्याप्ती, 5.4 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासपध्दती
  6. आर्थिक क्रिया : 6.1 आर्थिक क्रिया, 6.2 आर्थिक क्रियांचे प्रकार/वर्गीकरण – अ) प्राथमिक आर्थिक क्रिया, ब) व्दितीयक आर्थिक क्रिया, क) तृतीयक आर्थिक क्रिया, ड) चतुर्थक आर्थिक क्रिया
  7. खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने : 7.1 खनिज संपत्ती व ऊर्जासाधनांचे महत्व – लोहखनिज, दगडी कोळसा 7.2 भारतातील प्रमुख ऊर्जासाधने/विद्युत प्रकल्प – अ) औष्णिक विद्युत प्रकल्प, भारतातील प्रमुख जल विद्युत केंद्र
  8. उद्योग आणि व्यापार : 8.1 उद्योग – उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घट, वेबर यांचा औद्योगिक स्थानिकीकरणाचा सिध्दांत, सुती कापड उद्योग/सुती वस्त्रोद्योग, साखर उद्योग, साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक, 8.2 व्यापार – आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करणारे घटक, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवी व आर्थिक भूगोल”
Shopping cart