Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

मानवी भूगोल

Human Geography

,

Rs.195.00

मानवी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा असून यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. मानवाला केंद्रस्थानी मानून भूगोलाचा अभ्यास करताना मानवाच्या प्रत्येक कार्यावर, क्रियेवर, वर्तनावर, बौध्दिक क्षमतेवर आणि एकुणच कार्यक्षमतेवर विविध भौगोलिक घटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. हे सर्व भूगोलवेत्यांनी सप्रमाण सिध्द केलेले आहे. यातूनच संपुर्ण जगात मानवी भूगोलाच्या अध्ययन आणि अध्यापनाला मोठया प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाले. भारतासारख्या विकसनशील देशात मानवी भूगोलाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच भारतातील अनेक विद्यापीठातील सर्व महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर मानवी भूगोलाचे अध्ययन व अध्यापन केले जात आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठातून मानवी भूगोल शिकविण्यात येत आहे.
प्रस्तूत ग्रंथामध्ये मानवाची जीवनशैली स्पष्ट करण्यासाठी मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप व व्याप्ती, मानवी भूगोलाच्या शाखा, मानवाचे पर्यावरणाशी असलेले सहसंबंध, मानवी भूगोलातील प्रमुख विचारधारा, मानवी वंश, वांशिक समुह, जगातील प्रमुख वंश, ग्रिफित टेरलने केलेले मानवी वंशाचे वर्गीकरण तसेच निवडक प्रदेशातील मानवाची जीवनशैली, भारतातील आदिवासी जमातींचे भौगोलिक घटकांशी असलेली बांधिलकी इत्यादी घटकांविषयी सविस्तर विचार मांडण्यात आलेले आहेत.

Manavi Bhugol

  1. मानवी भूगोलाचा परिचय : अ) अर्थ व व्याख्या, ब) मानवी भूगोलचे स्वरूप, क) मानवी भूगोलाच्या शाखा, ड) मानवी भूगोलाची व्याप्ती, इ) मानवी भूगोलाचे महत्त्व
  2. मानवी भूगोलातील विचारधारा : अ) प्रागैतिहासिक कालखंड, ब) मध्ययुगीन कालखंड (रोमन कालखंड), क) आधुनिक कालखंड, ड) निसर्गवाद व संभववाद परिकल्पना आणि ‘थांबा व जा निसर्गवाद’
  3. मानवी उत्क्रांती आणि मानव वंश : अ) मानवी उत्क्रांती व अवस्था, ब) मानवी उत्क्रांतीच्या काळात झालेल्या प्रक्रिया व बदल, क) मानवी वंश ः अर्थ व व्याख्या, ड) मानववंशाची शारीरिक लक्षणे (मानवी वंश-निकष)ः इ) मानव वंश उत्क्रांतीचा ग्रिफिथ टेलर यांचा भूकटिबंध व स्तर सिध्दांत, ई) मानवी वंश
  4. पर्यावरण समायोजनाचे प्रकार : अ) शीत हवामान प्रदेशातील मानवी जीवन, ब) आयनिक/उष्ण हवामान प्रदेशातील मानवी जीवन (पिग्मी व बुशमेन), क) पिग्मी जमात, ड) बुशमेन
  5. भारतीय आदिवासींचा अभ्यास : भारतातील आदिवासी जमाती, अ) भिल्ल, ब) गोंड, क) नागा
  6. मानवी संस्कृती : अ) जागतिक मुख्य भाषा समूह/भाषा कुटुंबे, ब) भाषा आणि राष्ट्रीय एकात्मता, क) जगातील प्रमुख धर्म, ड) धर्म व राष्ट्रीय एकात्मता
  7. मानवी स्थलांतर : अ) स्थलांतराच्या व्याख्या, ब) स्थलांतराचे नियम (सिद्धान्त), क) स्थलांतराचे प्रकार, ड) स्थलांतराची कारणे, इ) स्थलांतराचे परिणाम, ई) आधुनिक काळातील स्थलांतरे
  8. लोकसंख्या व साधन संपदा : अ) लोकसंख्या वितरणाची ठळक वैशिष्ट्ये व लोकसंख्येचे जागतिक वितरण, ब) लोकसंख्या एक साधनसंपदा, क) मानवी लोकसंख्या वाढीचा नैसर्गिक साधन संपदेवर होणारा परिणाम, ड) मानव विकास निर्देशांक, इ) माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवी भूगोल”
Shopping cart