Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

लोकसंख्या भूगोल

Population Geography

,

Rs.150.00

लोकसंख्या भूगोल ही अगदी अलीकडे विकसित झालेली ज्ञानशाखा असून, मानव हा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. या विषयात मानवाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित प्राकृतिक व अप्राकृतिक अशा घटकांचाही अभ्यास समाविष्ट होतो. प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांमध्ये विविधता आढळते. या प्राकृतिक/भौगोलिक विविधतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिरणाम त्या त्या भौगोलिक प्रदेशात वास्तव्य असणार्‍या मानवी समुहाच्या जीवनावर होत असतो. यामुळेच भिन्न भिन्न हवामान प्रदेशांत राहणार्‍या मानवाच्या जीवनातही विभिन्नता आढळून येते. तसेच लोकसंख्येचे वितरणही सर्वत्र सारखे नाही. कारण लोकसंख्येच्या क्षेत्रीय वितरणावर प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. या घटकांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. यामुळेच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप बहुव्यापी व बहुस्पर्शी असे असल्याचे दिसून येते. लोकसंख्या भूगोल गतिमान व परिवर्तनशील असा अभ्यासविषय आहे. या विषयात प्रामुख्याने मानव व त्यासंबंधित पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. हे दोन्ही घटक गतिमान व परिवर्तनशील आहेत. पृथ्वीवर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडींचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. मानव स्वत:च गतिमान व परिवर्तनशील प्राणी आहे. मानव आपल्या सुप्त गुणांचा वापर नेहमी करत असतो. त्यामुळेही भौगोलिक व अभौगोलिक बदल पर्यावरणात होत असतात. या बदलांचा परिणाम मानवी जीवनावर होतो. लोकसंख्याविषयक घटकांमध्येही नेहमी बदल होतात. या सर्व प्रकारच्या बदलांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप गतिमान व परिवर्तनशील असे आहे.

Lokshnkhya Bhugol

  1. लोकसंख्या भूगोल परिचय आणि लोकसंख्या सामग्री : 1.1 लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, 1.2 लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती, 1.3 लोकसंख्या भूगोल इतिहास आणि विकास, 1.4 लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासपध्दती, 1.5 लोकसंख्या भूगोलाचा इतर विद्याशाखांशी संबंध
  2. लोकसंख्या सामग्री : 2.1 लोकसंख्या सामग्रीची गरज, 2.2 लोकसंख्या सामग्रीचे प्रकार, 2.3 लोकसंख्या सामग्री मिळविण्याच्या पद्धती व उगमस्थाने, 2.4 लोकसंख्या-सामग्रीविषयक समस्या
  3. लोकसंख्येचे वितरण व घनता : 3.1 लोकसंख्या वितरणाची ठळक वैशिष्ट्ये व जागतिक लोकसंख्येचे वितरण, 3.2 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, 3.3 लोकसंख्येची घनता
  4. लोकसंख्या स्थलातंर : 4.1 स्थलांतराच्या व्याख्या, 4.2 स्थलांतराचे नियम (सिद्धान्त), 4.3 स्थलांतराचे प्रकार, 4.4 स्थलांतराची कारणे, 4.5 स्थलांतराचे परिणाम
  5. लोकसंख्या सिद्धांत व भारतीय लोकसंख्या : 5.1 न्यूनतम, पर्याप्त व अतिरिक्त लोकसंख्येची संकल्पना, 5.2 लोकसंख्या व साधनसंपत्ती यांच्या संदर्भात मांडलेले महत्वाचे सिद्धांत, 5.3 भारतातील लोकसंख्या विभाग
  6. भारतातील लोकसंख्येच्या समस्या : 6.1 भारतातील घटते लिंग गुणोत्तर, 6.2 भारतातील लिंग गुणोत्तर कमी कमी होत असल्याने निर्माण होणार्‍या समस्या, 6.3 भारतातील लोकसंख्येच्या समस्या, 6.4 भारतातील अतिनागरीकरण व प्रदुषण समस्या, 6.5 लोकसंख्या समस्यांवरील उपाय, 6.6 बुद्धी स्थलांतर, 6.7 भारताचे लोकसंख्या धोरण : अर्थ, गरज व हेतू

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकसंख्या भूगोल”
Shopping cart