Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

औद्योगिक भूगोल

Industrial geography

, , ,

Rs.250.00

पृथ्वीच्या विविध भागात आढळणार्‍या साधन संपदा, त्यांचा विनियोग व औद्योगिक विकास यांच्या बदलानुसार कारखानदारीचे स्वरूप व व्याप्ती बदलते. पूर्वीच्या काळात उद्योगावर प्रामुख्याने स्थानबद्ध घटकांचा जास्त प्रभाव होता परंतु आजच्या काळात स्थानबद्ध घटकाबरोबरच जास्त प्रभाव अस्थायी घटकांचा परिणाम उद्योगांच्या स्थान व विकासावर होत आहे. जसे मुंबई शहरात आर्द्र हवामान असल्याने कापसाचा लांब धागा निघतो त्यामुळे सुती कापड गिरण्याचे केंद्रीकरण झालेले होते. परंतु आता मानवनिर्मित कृत्रिम हवामान निर्मिती तंत्रज्ञान प्रगत झाल्याने मुंबईतील सुती कापड उद्योग महाराष्ट्रातील अंतर्गत भागातील नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव या शहरात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे औद्योगिक भूगोलाचे स्वरूप स्थलात कालपरत्वे बदलत आहे. त्यामुळेच औद्योगिक भूगोलाला गतीमान शाखा मानले जाते.

मानवाच्या सामाजिक विकासाबरोबरच आर्थिक विकासाचे महत्व आहे. आर्थिक विकासात औद्योगिक विकास व भूगोल यांचे महत्वाचे योगदान आहेत. सदरीलपुस्तकात अद्ययावत आकडेवारी, महत्त्वाचे मुद्दे, अवलोकन होण्यासाठी नकाशा, आकृत्या, तक्ते, चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. विविध विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व स्पर्धा परिक्षांसाठी पुस्तक उपयुक्त आहे.

Audyogik Bhugol

  1. औद्योगिक भूगोल : 1.1 अ) औद्योगिक भूगोल अर्थ व व्याख्या, ब) औद्योगिक भूगोलाचे स्वरूप, क) औद्योगिक भूगोलाची व्याप्ती, 1.2 भारतातील औद्योगिक विकास – भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील औद्योगिक विकास, भारतातील प्राचीन उद्योग, भारतातील मध्ययुगातील उद्योग, भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील उद्योग, भारताच्या पंचवार्षिक योजना व उद्योग, भारताचे औद्योगिक धोरण, नीति आयोग.
  2. उद्योगधंद्याचे स्थान : 2.1 उद्योगधंद्याचे स्थान, 2.2 उद्योगधंद्याचा विकास : अ) उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राथमिक घटक 2.2.1 उद्योगांचे स्थान, विकास व कच्चा माल संबंध, 2.2.2 उद्योगाचे स्थानक जमिनीची उपलब्धता, 2.2.3 उद्योगाचे स्थान व पाणी पुरवठा, 2.2.4 उद्योगाचे स्थान व हवामान, 2.2.5 उद्योगाचे स्थान व शक्ती साधने. ब) उद्योगाचे स्थान व द्वितीयक घटक : उद्योगाचे स्थान व मजूर वर्ग, उद्योगाचे स्थान व वाहतुक संदेशवहन, उद्योगाचे स्थान व बाजारपेठ, उद्योगाचे स्थान व भांडवल पुरवठा, उद्योगाचे स्थान व सरकारचे ध्येय धोरण, उद्योगाचे स्थान व सुविधा
  3. जगातील प्रमुख उद्योग व औद्योगिक विभाग : 3.1 लोह पौलाद उद्योग : 3.1.1 संयुक्त संस्थानातील लोह पोलाद उद्योग, 3.1.2 भारतातील लोह पोलाद उद्योग, 3.2 सुती कापड उद्योग : 3.2.1 भारतातील सुती कापड उद्योग, 3.2.2 जपानमधील सुती कापड उद्योग, 3.3 मोटार वाहन निर्मिती उद्योग : 3.3.1 संयुक्त संस्थानातील वाहन उद्योग, 3.3.2 जपान वाहन निर्मिती उद्योग, 3.3.3 भारत वाहन निर्मिती उद्योग, 3.4 भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग, 3.5 भारतातील यांत्रिकी उद्योग : भारतातील यांत्रिकी उद्योगावर परिणाम करणारे घटक 1) कृषी अवजारे, 2) भारतातील मोटर वाहनांची निर्मिती, 3) भारतातील आगगाडी इंजिन व डबे निर्मिती, 4) भारतातील विमान निर्मिती, 5) भारतातील जहाज बांधणी, 3.6 औद्योगिक प्रदेशः 3.6.1 संयुक्त संस्थानातील औद्योगिक प्रदेश, 3.6.2 जपानमधील औद्योगिक प्रदेश
  4. उद्योग प्रदुषण व पर्यावरणातील र्‍हास : 4.1 पर्यावरण प्रदूषण : अ) कागद लगदा उद्योग व प्रदुषण, ब) साखर उद्योग व प्रदुषण, क) सिमेंट उद्योग व प्रदुषण, ड) रसायन उद्योग व प्रदुषण, 4.2 मानव व पर्यावरण संबंध : अ) मानव, प्राणी जीवनावर परिणाम करणारे प्रदूषण प्रकार ब) नैसर्गिक वनस्पती व प्रदूषण, 4.3 औद्योगिकरणाच्या समस्या व परिणाम : 4.3.1 औद्योगिकरण स्थलांतर व लोकसंख्या वाढ, 4.3.2 औद्योगिकरण नागरी केंद्राचा विस्तार, 4.3.3 औद्योगिकरण घनकचरा विल्हेवाट, 4.3.4 औद्योगिकरण व सामाजिक समस्या

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “औद्योगिक भूगोल”
Shopping cart