Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भौगोलिक विचारधारा व संकल्पना

Geographical Thoughts and Concepts

,

Rs.125.00

आदिमानवाने प्रथमताः प्राकृतिक घटकांतील हवामान, भू-रचना, प्राणी व वनस्पती यांच्या अभ्यासातून भूगोलशास्त्राची सुरुवात केली. मानवी जीवनांचे कल्याण साधण्यासाठी आर्थिक विकास, नागरीकरण अन्नधान्य, आरोग्य, साधनसंपत्तीचे संवर्धन व लोकसंख्येचा विस्फोट इत्यादी क्षेत्रांत मानवी भूगोलशास्त्राचे योगदान आहे. म्हणून भूगोलशास्त्र एक प्रगत व उपयोजित ज्ञानशाखा आहे. बॅबिलोनियन संस्कृतीत खगोलशास्त्राचा विकास तेथील स्वच्छ आकाशामुळे झाला. ग्रीक पूर्व हेलोनिक संस्कृती काळात भूगोलशास्त्र म्हणजे भूपृष्ठावरील प्राकृतिक उठाव, स्थान, देश व त्यांच्या सिमा याबाबत ज्ञान होय असे मानले जाते. पुढे व्यापार व वाहतूकीच्या विकासामुळे भौगोलिक ज्ञानात भर पडत गेली. प्राचीन काळापासून भूगोलशास्त्रातील विचार व संकल्पनांचे जनकत्व ग्रीकाकडे जाते. अनेक ग्रीक तत्वज्ञांनी भूगोलशास्त्रात मोलाची भर घातली. ग्रीकापूर्वी फोनिशियन्सानी भूगोलशास्त्राच्या विकासात भर पाडली. परंतू त्या ही पूर्वी ज्यू इजिप्तीशियन यांनी भूगोल विकसित केल्याचे संदर्भ ग्रंथात आढळतात. फोनिशियन्सानी पश्चिम व मध्य आशियाचा व्यापक भाग व्यापला होता. गडैरा, कार्येज व उटिका इ. नगरे फोनिशियन्सांनी वसविली होती. म्हणून ज्ञानाच्या विविध शाखांचे जनकत्व ग्रीकांकडे जाते. ग्रीक संस्कृतींच्या सुवर्ण युगात खगोलशास्त्र, गणित व भूमिती यात त्यांनी अनेक संकल्पना मांडल्या, त्या बहुतेक त्यांच्या पूर्वीच्या इजिप्तीशियन, वैदिक व कॅलिजोनियन्स संस्कृतीमधून घेतल्या आहेत.

Bhaugolik Vichardhara V Sankalpana

  1. भौगोलिक विचार प्रणालीचा इतिहास : 1.1. प्रस्तावना, 1.2 ग्रीक भूगोलशास्त्राचे विचारवंत – महाकवी होमर, थेल्स, अनाक्झीमॅडर, हेकॅटियस, हिरोडोटस, अ‍ॅरिस्टॉटल, अलेक्झांडर, इरॅटोस्थेनिस हिस्पारकस, 1.3 रोम भूगोलशास्त्राचे विचारवंत – स्ट्रबो, टॉलेमी, पोम्पोनियस, सिकन्द्रिया, 1.4 अरबांचे भूगोलशास्त्रातील योगदान, 1.5 अरबांचे भौगोलिक कार्य, 1.6 अरब भूगोल विचारवंत – हरून अल रशिद, खुर्दवबाह, पहलाव, हॉकल, मसुदी, बिटूनी, बखारी, इंद्रिसी, बतुता, खालदून
  2. आधुनिक भूगोलाचे विचारवंत : 2.1 प्रस्तावना, 2.2 जर्मन भूगोल प्रवाह – हॅम्बोल्ट, 2.3 फ्रेंच भूगोल प्रवाह – झीन बूहज, हमाजिऑ, फेबव्हरे, परजीलू, व्हीदाल-दी ब्लाथ, 2.4 ब्रिटीश भूगोल प्रवाह – मॅकीन्डर, रॉबर्टमिल, बुचनन, हर्बर्टसन रॉकसबी फ्लेअर, 2.5 अमेरिकन भूगोल प्रवाह – मार्क जेफरसन, बोमन, सेंपल, ब्रिघम, हटिंग्टन, आर.डी. सॉलिब्युटी, ग्रिफीभटेलर, डब्ल्यू. एम. डेव्हीस
  3. भूगोलातील द्वैतवाद आणि द्विभाजन : 3.1 प्रस्तावना, 3.2 भूगोलामध्ये द्वैतवादचा आरंभचा इतिहास, 3.3 प्राकृतिक भूगोल विरूध्द मानवी भूगोल, 3.4 सामान्य भूगोल विरूध्द प्रादेशिक भूगोल, 3.5 निसर्गवाद विरूध्द संभववाद ईसा बोमेन
  4. संकल्पनात्मक विकास : 4.1 प्रस्तावना, 4.2 स्थलीय किंवा क्षेत्रीय संघटन, 4.3 प्रादेशिकरण, 4.4 शाश्वत विकास, 4.5 सांस्कृतिक भू दृष्याची संकल्पना
  5. प्राचीन भारतीय भौगोलिक विचारवंत : 5.1 प्रस्तावना, 5.2 विश्व उत्पत्ती व रचना – ग्रहणे, आकार, अक्षांश व देशांतर, दिप, 5.3 प्राचीन भारतीय भूवैज्ञानिक – आर्यभट्ट, कालीदास, वराहमिहीर, ब्रम्हामुफ, भास्कराचार्य

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भौगोलिक विचारधारा व संकल्पना”
Shopping cart