Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यटन व्यवस्थापनाचा भूगोल

Geography of Tourism Management

Rs.250.00

आधुनिक काळात धकाधकीच्या जीवनापासून मनाला शांती मिळण्यासाठी व विरंगुळासाठी मानव निसर्गरम्य अशा स्थळी जाणे पसंत करतो. त्यातूनच पर्यटन विकसित झाले अलीकडे पर्यटन हे अत्यावश्यक झाल्याने जगातील सर्वच देशात पर्यटनाचे महत्त्व वाढलेले आहे. म्हणजे पर्यटन ही एक अत्यावश्यक गरज झालेली आहे. प्रवास व पर्यटन हा जगातील अग्रेसर जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त करून देणारा असा व्यवसाय आहे. संपूर्ण जगात पर्यटनाचा विकास एक आर्थिक क्रिया म्हणून होत असल्याने पर्यटन हा एक ‘अदृश्य व्यापार’ म्हणून संबोधला जातो. यामुळे पर्यटनाचे आर्थिक स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनाला विशेष महत्त्व समाज व राजकारण, पर्यावरण व सांस्कृतिक घटकांचे जतन, संवर्धन व संरक्षण यादृष्टीने ही आहे. अतिप्राचीन काळापासून प्रवास करणे हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. पर्यटन ही आधुनिक व शास्त्रीय संकल्पना म्हणून उदयाला आलेली आहे.

Parytan Vyavsthapanacha Bhugol

  1. पर्यटन भूगोलाचा परिचय : 1.1 पर्यटनाची संकल्पना, 1.2 पर्यटनाचे घटक, 1.3 पर्यटनावर परिणाम करणारे घटक.
  2. पर्यटनाचे वर्गीकरण : 2.1 उद्देशानुसार पर्यटनाचे वर्गीकरण, 2.2 राष्ट्रीयत्वनुसार – आंतरराष्ट्रीय पर्यटन, 2.3 प्रवास काळानुसार, 2.4 अंतरानुसार, 2.5 पर्यटनाच्या स्वरुपानुसार.
  3. पर्यटनाचे परिणाम : 3.1 पर्यावरणीय परिणाम, 3.2 आर्थिक परिणाम, 3.3 सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, 3.4 पर्यावरण प्रदुषण.
  4. पर्यटन विकास : 4.1 पर्यटन विकास, 4.2 पर्यटन संघटनाची भूमिका, 4.3 पर्यटन विकासातील इंटरनेटची भूमिका, 4.4 भारतातील पर्यटन केंद्राचा अभ्यास.
  5. प्रवास व्यवस्थापन : 5.1 प्रवास व पर्यटनाचे महत्त्व, 5.2 प्रवास प्रेरणा, 5.3 प्रवास व्यवस्थापनाची गरज, 5.4 अर्थ व संकल्पना, 5.5 प्रवासी संस्था, 5.6 जागतिक प्रवासासाठी आवश्यक बाबी.
  6. निवास व्यवस्था : 6.1 निवास व्यवस्थेची गरज व महत्त्व, 6.2 निवास व्यवस्थेचे प्रकार.
  7. पर्यटन बाजारपेठ : 7.1 पर्यटन बाजारपेठ व्याख्या व संकल्पना, 7.2 पर्यटन निर्मिती/उत्पादनाचे घटक, 7.3 पर्यटन बाजारपेठेचे कार्य.
  8. पर्यटन नियोजन : 8.1 पर्यटन नियोजनाचे महत्व, 8.2 विकसित व विकसनशील देशातील पर्यटन नियोजन, 8.3 पर्यटन नियोजनाचे घटक, 8.4 पर्यटन नियोजनाचे प्रारुप, 8.5 सहल व्यवहार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यटन व्यवस्थापनाचा भूगोल”
Shopping cart