Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यटन भूगोल

Geography of Tourism

,

Rs.275.00

पर्यटन भूगोल ही मानवी भूगोलाची अतिशय नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे. 1950 च्या दशकापर्यत पर्यटन भूगोलाला स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून स्विकारले गेले होते. संयुक्त संस्थाने व जर्मनीतील वैज्ञानिक कार्यात पर्यटन भूगोलाचे अभ्यास क्षेत्र आधोरेखित केले गेले. भूगोल तज्ञांनी नव्या क्षेत्रांचा अभ्यास करुन पर्यटन भूगोलाची अचूकता सुधारण्यास मदत केली. सध्याच्या काळातील ‘पर्यटन’ हा शब्द प्रयोग 13 व्या शतकापासून प्रचलित झाला.
पर्यटनासाठी पर्यटक हा महत्वाचा केंद्र बिंदू आहे. पर्यटन हा मानवाचा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय असुन तो फार झपाट्याने विकसित होत आहे. पर्यटन व्यवसाय पर्यावरणाशी संबधित आहे. पर्यावरण व त्यातील बदल मानवाचे आर्थिक व्यवहार व साधनसंपत्ती त्याचे स्थळ व काळ संदर्भातील अध्ययन भूगोलशास्त्रात केले जाते. त्यातूनच पर्यटन भूगोल हि शाखा निर्माण झाली.

प्रस्तुत पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख, पर्यटनात आधुनिक आणि पर्यटन प्रकार, पर्यटनाचे परिणाम, भारतातील पर्यटन, कोकणातील पर्यटन विकास, खान्देशातील पर्यटन विकास, गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्रातील गड किल्ले इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केल्याने सर्वांसाठी ते उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

Paryatan Bhugol

  1. पर्यटन भूगोलाची ओळख : पर्यटन भूगोलाची संकल्पना, पर्यटन व पर्यटकाची व्याख्या, पर्यटन भूगोलाचे स्वरुप, पर्यटन भूगोलाची व्याप्ती, पर्यटनात भूगोलाची भूमिका, पर्यटन भूगोलातील उत्पादन घटक, पर्यटन भूगोलाची गुण-वैशिष्ट्ये, पर्यटन भूगोलाची वैशिष्ट्ये, पर्यटनावर परिणाम करणारे घटक.
  2. पर्यटनात आधुनिक आणि पर्यटन प्रकार : पर्यटनाचे प्रकार – 1) आरोग्य विषयक पर्यटन, 2) तीर्थक्षेत्र पर्यटन 3) सांस्कृतिक पर्यटन 4) पर्यावरणीय पर्यटन; इतर पर्यटन प्रकार – 1) शाश्वत सुदृड/टिकाऊ पर्यटन, 2) कृषि पर्यटन, 3) सांस्कृतिक वारसा पर्यटन/विरासत पर्यटन, 4) साहसी पर्यटन.
  3. पर्यटनाचे परिणाम : अ) पर्यटनाचे आर्थिक परिणाम – 1) रोजगारांची उपलब्धता, 2) परकीय चलन, 3) वाढीव व्यापार, 4) सरकारला मिळणर्‍या महसुलात (राजस्व) वाढ, 5) जमिनीच्या किंमती वाढतात.
  4. भारतातील पर्यटन : राष्ट्रीय पर्यटन धोरण, भारताचे नवीन राष्ट्रीय पर्यटन धोरण, राष्ट्रीय पर्यटन धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये.
  5. कोकणातील पर्यटन विकास : 1) मुंबई, 2) पालघर, 3) तारापूर, 4) डहाणु, 5) जव्हार, 6) वसई, 7) नायगाव, 8) ठाणे, 9) कल्याण, 10) टिटवाळा, 11) माळशेज घाट, 12) वज्रेश्वरी, 13) शहापूर.
  6. खान्देशातील पर्यटन विकास : 1) तोरणमाळ – यशवंत तलाव, गोरक्षनाथ मंदिर, सीता खाई, मच्छिंद्र गुंफा 2) पाटणा देवी – धवलतीर्थ धबधबा, केदारकुंड, हेमाडपंथी महादेव मंदिर, सीता न्हाणी.
  7. गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य : नल सरोवर पक्षी अभयारण्य, गिर राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, शुलपानेश्वर वन्य प्राणी अभयारण्य, बळराम अंबाजी वन्यजीव अभयारण्य.
  8. मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य : अचनाकमर वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय चंबळ अभयारण्य, वन विहार वन्य प्राणी अभयारण्य, बोरी वन्यजीव अभयारण्य, ग्रेट इंडियन बुस्टर्ड सॅन्युच्युरी.
  9. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य : ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागझिरा राष्ट्रीय उद्यान, बोर वन्यप्राणी अभयारण्य, मेळघाट वन्य जीव अभयारण्य, गुगमल राष्ट्रीय उद्यान.
  10. महाराष्ट्रातील गड किल्ले : रायगड किल्ला, अर्नाळा किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा दुर्ग, कर्नाळा किल्ला, सुधागड किल्ला, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग किल्ला, रत्नदूर्ग, जयगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यटन भूगोल”
Shopping cart