Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भारताचा भूगोल

Geography of India

Rs.225.00

भारत हा जगातील विविधेत एकता दर्शविणारा एकमेव देश आहे. जगातील ङ्गप्रमुख लोकशाही राष्ट्रफ म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्व प्रकारची विविधता अधिक महत्त्वाची आहे. जगातील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, भारतात आढळतात. प्राकृतिकदृष्ट्या भारतातील पर्वत, पठारे, मैदाने, दर्‍या, वाळवंट, इत्यादीबाबतची विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता तर तीव्रतेने जाणवते. भौगोलिक आणि प्राकृतिक विविधतेबरोबर भारतातील वांशिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधताही मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सर्व वंशाचे धर्मांचे लोक भारतात आहेत. सामाजिक आणि आर्थिक विषमताही भारतात आढळते. अनेक भाषा, बोलीभाषा, वेगवेगळ्या रुढी, परंपरा, सण, उत्सव, इत्यादीबाबत भारतात विविधता आढळते. अशा विविधतेतून एकता साध्य करणारे राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. सदरील पुस्तकातून भारताच्या अभ्यासासोबत जगातील देशांचाही तोंडओळख सहजपणे होईल.

Bharatacha Bhugol

 1. भारत : भौगोलिक स्थान, आकारमान, भूसीमा जलसीमा, घटक राज्ये – केन्द्रशासित प्रदेश
 2. भारताची प्राकृतिक रचना : भारतीय उपखंड निर्मिती, भूशास्त्रीय कालखंड, प्राकृतिक विभाग – हिमालय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, सागर किनारी मैदाने, बेटे
 3. नद्या व सरोवरे : हिमालयीन नद्या, द्वीपकल्पीय नद्या सरोवरे
 4. हवामान : परिणाम करणारे घटक, हवामानाचे वर्गीकरण, भारतातील ऋतू, मान्सून वार्‍यांची निर्मिती, आगमन, पर्जन्याचे वितरण, मान्सूनचे निर्गमन
 5. मृदा : मृदेची निर्मिती, मृदेचे प्रकार, मृदेची धूप, मृदा संधारण
 6. नैसर्गिक वनस्पती : वर्गीकरण, अरण्याचे प्रकार, वन परिस्थितीकी, वनसंवर्धन, भारतातील राष्ट्रीय उद्यान
 7. प्राणी संपदा व मासेमारी : प्राण्यांचे वर्गीकरण, मासेमारीचे प्रकार
 8. खनिज संपत्ती : खनिजांचे वर्गीकरण, लोहखनिज, मँगेनिज, बॉक्साईट, तांबे, कोळसा, खनिजतेल, विद्युत शक्ती, वितरण व उत्पादन
 9. शेती : शेतीचे प्रकार, स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती, ओलिताची शेती, सखोल शेती, मळ्याची शेती, मंडई – बागायती शेती पीकांचा क्रम, पीक संयोग, शेतीची प्रगती, शेतीच्या समस्या
 10. उद्योगधंदे : औद्योगिक विकास, उद्योगधंद्याचे वर्गीकरण, स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, शेती उत्पादनावर आधारित उद्योग, खनिजांवर आधारित उद्योग, रासायनिक उद्योग, इतर उद्योग, भारतातील औद्योगिक प्रदेश, उद्योग धंद्याचे एकत्रीकरण, केन्द्रीकरण
 11. वाहतूक, संदेशवहन आणि व्यापार : प्रकार – रस्ते, लोहमार्ग, जलवाहतूक, प्रमुख बंदरे, हवाई-वाहतूक; संदेशवहन – संदेशवहनाची साधने, टपाल, तार, दूरध्वनी, आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, उपग्रहीय संदेशवहन; व्यापार – व्यापाराचे प्रकार, व्यापारावर परिणाम करणारे घटक जागतिक व्यापारी संघटना
 12. भारताची लोकसंख्या : लोकसंख्येची वाढ, वाढीची कारणे, ग्रामीण-शहरी लोकसंख्या, साक्षरता, लोकसंख्येचे वितरण, परिणाम करणारे घटक, स्थलांतर, नागरीकरण, वयोगट रचना, अनुसूचित जाती-जमाती, भाषा, धर्म, वंश
 13. भारतातील मानवी वस्ती : घरांचे प्रकार, वस्ती-प्रकार-ग्रामीण-वस्त्या, नागरी-वस्त्या, नगरांचे वर्गीकरण भारतातील प्रमुख शहरे
 14. राज्य आणि केन्द्रशासित प्रदेश : राज्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, भाषा, राजधानी, स्थापना, प्रमुख व्यवसाय, खनिज संपत्ती, पर्यटन केन्द्र, जिल्हे
 15. जगातील देश : देशाचे नांव – खंड, राजधानी, लोकसंख्या, क्षेत्रफळ, साक्षरता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताचा भूगोल”
Shopping cart