Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

Economic Geography of Maharashtra

Rs.160.00

भारतात महाराष्ट्र राज्याचे स्थान वैशिष्ट्येपूर्ण आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य आहे. मुंबई बंदरामुळे भारताने पश्चिमेकडील देशांशी सहजरित्या व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले होते. त्याचप्रमाणे पूर्वेकडील देशांशीदेखील व्यापार वाढत आहे. शेतीवर आधारीत उद्योगधंद्याना शेतीमधूनच कच्चा माल उपलब्ध होतो. महाराष्ट्राच्या शेती अर्थव्यवस्थेत तृणधान्ये, कडधान्ये, अन्नधान्ये, तेलबिया, फळफळावळ व नगदी पिके महत्वाची आहेत. शेती भारताच्या व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार आहे. शेती व्यवसायामुळे अनेक मूलभूत गरजा भागविल्या जातात. भारतात लोहखनिजाचा अंदाजे साठा 1346 कोटी टनांचा आहे. यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विषम वितरणामुळेच व्यापाराची सुरवात झालेली आहे. आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञान व जागतिकीकरणामुळे व्यापाराची एक नवीन संकल्पना उदयास आल्याने जगातील अनेक देशांनी व राज्यांनी एकमेकाशी सहकार्य करार केल्याने व्यापाराची एक नवीन पद्धत रुजू लागली आहे. अभ्यासक्रमातील सर्व संज्ञा व संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य वाचकाला, विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलाची तोंडओळख व्हावी हा या पुस्तकामागील उद्देश आहे. त्यासोबत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण स्वतंत्र पद्धतीने लिहिलेले असल्याने पुस्तक सुटसुटीत आहे.

Maharashtracha Arthik Bhugol

  1. लोकसंख्या : 1.1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक – अ) भौगोलिक, ब) आर्थिक व सामाजिक, क) लोकसंख्याशास्त्रीय, 1.2 महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण (जिल्हे) – 1), दाट लोकसंख्या असलेले,2) मध्यम लोकसंख्या असलेले, 3) कमी लोकसंख्या असलेले, 1.3 महाराष्ट्रातील नागरीकरण- महाराष्ट्रात नागरी वसाहतीचा प्रारंभ व विकास, नागरीकरणाची गती व औद्योगिकिकरण, महाराष्ट्रातील नागरीकरणाच्या अवस्था.
  2. कृषी : 2.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील शेती व्यवसायाची भूमिका, 2.2 महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये, 2.3 कृषीचे प्रकार – अ) बागायत शेती, ब) दुग्ध शेती, 2.4 सेंद्रिय शेती, 2.5 महाराष्ट्राच्या शेतीतील आधुनिक प्रवाह – पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस, 2.6 महाराष्ट्रातील कृषी – हवामान विभाग, 2.7 महाराष्ट्रातील कृषी समस्या व उपाय.
  3. खनिज संपत्ती, ऊर्जासाधने व उद्योग : 3.1 महाराष्ट्रातील प्रमुख खनिजांचे उत्पादन व वितरण – अ) लोहखनिजाचे उत्पादन व वितरण, ब) बॉक्साइटचे उत्पादन व वितरण, 3.2 उर्जासाधने – उत्पादन व वितरण – अ) दगडी कोळश्याचे वितरण ब) औष्णिक विद्युत प्रकल्प, क) जलविद्युत प्रकल्प, ड) पवन उर्जा, ई) सौर उर्जा प्रकल्प, 3.3 महाराष्ट्र उद्योगधंदे – अ) कापड उद्योग, ब) कापड उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, क) महाराष्ट्रातील कापड उद्योगधंद्यापुढील समस्या व वितरण, इ) साखर उद्योग, महाराष्ट्रातील साखर कारखान्यापुढील अडचणी/समस्या.
  4. व्यापार व वाहतूक : 4.1 व्यापारावर परिणाम करणारे घटक, 4.2 महाराष्ट्राचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार, 4.3 वाहतूक – अर्थ व वाहतुकीचे प्रकार – अ) राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, ब) रेल्वेमार्ग – महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे प्रकार, महाराष्ट्रातील काही प्रमुख रेल्वेमार्ग.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल”
Shopping cart