Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

आरोग्य / खेळ / व्यक्तिमत्व विकास

गर्भसंस्कार

,

Rs.195.00

मातृत्व या विश्वातील महान सृजनता आणि संस्कार आहे. ‌‘आई-अपत्याचे’ प्रेम प्रत्यक्ष परमेश्वरालाही गवसलेले नाही. गर्भसंस्काराचा आणि भारतीयांचा अनन्यसंबंध आहे. प्राचीन भारतीयांची जगाला मिळालेली ती एक देणगी आहे. गर्भसंस्काराची आवश्यकता जशी जननी आणि जन्मभूमीसाठी आहे तशीच ती कुटुंब सौख्यासाठी आणि कल्याणासाठी आहे. पती-पत्नी या उभयतांनी भावी जीवनाची फक्त काळजी चिंता करण्यात वेळ दवडू नये तर त्यांनी गर्भावस्थेचा परिपूर्ण आनंद उपभोगावा; निरोगी स्वस्थ बालक जन्माला यावेत, तसेच त्यांच्या पोषणाच्या योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी हे संस्कार अत्यावश्यक आहेत. प्रसुतीपूर्वीची निगराणी जेवढी आवश्यक आहे तेवढी प्रसुतीनंतरही व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. प्राचीन भारतीयांनी शुद्ध बीजासाठी अन बुद्धीमान व आरोग्यसंपन्न प्रसुतीसाठी संस्काराचा मार्ग अवलंबला. संस्कारक्षम उत्तम, कुशाग्र बुद्धीमत्तेची, सशक्त, सर्वगुणसंपन्न पिढी निर्माण करायची असेल तर संस्कार जपलेच पाहिजे. संस्काराची सुरुवात गर्भसंस्कारापासूनच होते. तांत्रिक-वैज्ञानिक, स्पर्धात्मक या बुद्धीमान युगात सक्षम आणि संस्कार संपन्न होण्याचा मूलभूत पाया मुलांच्या जन्माच्या आधीपासून घालणे महत्त्वाचे आहे. त्याचसाठी उत्तम स्वास्थ्य, स्वभाव आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या संततीसाठी गर्भाधान व गर्भसंस्काराची आवश्यकता आहे.

Garbhasanskar

  1. गर्भसंस्कार
  2. संस्कार
  3. आहार-विहार-व्यायाम प्रश्नोत्तरे
  4. प्रसुती प्रश्नोत्तरे
  5. बालसंगोपन प्रश्नोत्तरे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गर्भसंस्कार”
Shopping cart