Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

हवामानशास्त्र

Climatology

,

Rs.350.00

पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्‍हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.

Hawamanshastra

  1. हवामानशास्त्र : हवामानशास्त्र व अन्यशास्त्रे, वातावरण/पर्यावरण हवा व हवामानास नियंत्रित घटक.
  2. वातावरण : वातावरण रचना, वातावरणातील चमत्कार, वैशिष्ट्ये, वातावरणाची घटना, वातावरणीय प्रमुख वायु वैशिष्ट्ये, रासायनिक घटनेच्या आधारे वातावरण संरचना, वातावरणीय वायुगतिकी.
  3. सौरशक्ती (सौरऊर्जा) : सौरशक्ती/सूर्यक्षमता, सौर ऊर्जा, सौरशक्ती वितरणातील प्रभावकारी घटक – सूर्यकिरणांची लंबरुपता किंवा तिरकसपणा, पृथ्वीच्या परीभ्रमणातून सूर्यापासूनचे अंतर, दिनमान
  4. तापमान : तापमानाचे महत्त्व, तापमानावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे वितरण, तापमानाच्या उभ्या वितरणाचे प्रकार, तापमानाची विपरीतता- प्रकार, तापमान विपरीततेचे परिणाम. समतापरेषा
  5. वायुभार व वारे : वायुदाब आणि वारे, वायूभार घटक/हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक, वायुभाराचे/हवेच्या दाबाचे वितरण, वायुभाराचे क्षितीज समांतर वितरण, समभार रेषा- वैशिष्ट्ये, वायुभार पट्टे, वायुभाराचे ऋतुनुसार परिवर्तन, ऋतुनुसार भारतातील वायुभाराचे वितरण, ग्रहीय वारे किंवा नित्यवारे.
  6. वायूराशी व सीमाग्र/सीमावर्त : व्याख्या, वायूराशीची वैशिष्ट्ये, वायूराशीची स्तोत्र क्षेत्र, वायूराशीचे वर्गीकरण, उष्ण कटिबंधीय महासागरावरील वायुराशी, आशिया खंडातील वायुराशी, युरोप खंडातील वायुराशी, सीमाग्र/सीमावर्त- वैशिष्ट्ये, प्रकार, महत्त्व.
  7. आर्द्रता, सांद्रीभवन, वृष्टी : बाष्पीभवन- वैशिष्ट्ये. आर्द्रता- प्रकार. सांद्रीभवन, सांद्रीभवन प्रक्रिया, सांद्रीभवनाची अभिजात संकल्पना, सांद्रीभवन सामान्य रुपे. मेघांचे/ढगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण, वैशिष्ट्ये, ढगांचा वातावरणातील परिणाम. वृष्टी, हिमकण सिद्धांत, आघात संमीलन संकल्पना
  8. हवामान वर्गीकरण : व्याख्या, वन्सपती प्रकार, डॉ. वाल्डीमीर कोपेनचे हवामान वर्गीकरण, थॉर्नवेटचे हवामान वर्गीकरण, त्रिवार्थाचे वर्गीकरण, भारतीय हवामानावर परिणाम करणारे घटक. मान्सून – संकल्पना, ऋतुमानातील हवामान, पावसाळ्यातील हवामान, हिवाळ्यातील हवामान, उन्हाळ्यातील हवामान.
  9. महासागरजल व हवामान : सागरजलाचे गुणधर्म, तापमान, क्षारता व घनत्व, सागरजलावर परिणाम करणारे घटक, दैनिक तापमान अंतर, महासागरीय पृष्ठावरील तापमानाचे क्षैतिज वितरण, सागरजलाचे खोलीनुसार वितरण, समताप रेषा. सागरजलाची क्षारता, सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक
  10. वातावरणीय आपत्ती : वातावरणीय आपत्ती, आपत्तीचा पर्यावरणास धोका, नैसर्गिक आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व, उद्दिष्टे, नैसर्गिक आपत्तीद. भूस्सखलन (भूमिपात), भूमिपात अरिष्ट परिणाम- व्यवस्थापन. त्सुनामी- परिणाम, कारणे, व्यवस्थापन. वादळे- वादळे आपत्ती, चक्रीय वादळे
  11. पर्यावरणीय प्रदुषण : पर्यावरणीय प्रदूषण- हवा प्रदूषण, हवा प्रदूषणाचे कारणे, परिणाम. जल प्रदूषण – कारणे, जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, ग्लोबल वार्मिंग. हरितगृह – हरितगृह घटक. भूकंप, ज्वालामुखी, ढगावरण, तापमान वाढीचे परिणाम.
  12. हवामानचक्र परिकल्पना व पर्यावरण नैतिकता : हवामान चक्र आणि परिकल्पना, धृवीय भ्रमण परिकल्पन, पर्यावरण नैतिकता, पर्यावरण आणि समाज.
  13. वातावरणीय प्रक्षोभ व जीपीएस : वातावरणीय प्रक्षोभ, आवर्त- प्रकार, निर्मिती, उष्ण कटिबंधातील आवर्त, समशितोष्ण कटिबंधीय आवर्ते, गतीजन्य/पुरोगामी सिद्धांत, धृवीय सीमा सिद्धांत. प्रत्यावर्त- प्रकार. झंझावात/गडगडाटी वादळे, जागतिक स्थिती पदध्ती/प्रणाली, संकट सूचना.
  14. दैनिक हवामान दर्शक नकाशे : अल्पकालीन-मध्यकालीन-दीर्घकालीन पूर्वानुमान, मापनदंड, हवामान निरीक्षण, तापमापक, कमाल तापमापक, किमान तापमापक, फॉर्टिनचे बॅरॉमीटर, आर्द्रतामापक, वायुवेगमापक, निर्द्रव वायुभार मापक, वर्षामापक. भारतीय दैनंदिन हवामानदर्शक नकाशा-अभ्यास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हवामानशास्त्र”
Shopping cart