Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

लोकसहभाग आणि पी.आर.ए.

People Participation and P.R.A.

Rs.250.00

लोकसहभाग हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचा बारकाईने विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, सर्वच लहान मोठी विकासाची असो अथवा विघातक स्वरूपाची असो कामे ही लोकसहभागातून झालेली आहेत. लोकांनी जर एखादे काम मनावर घेतले तर ते सांघिक प्रयत्नातून लिलया करू शकतात. लोकसहभाग म्हणजे एकीची शक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते. लोकसहभागात्मक विकास कार्यात लोकांच्या वेळ, श्रम, पैसा, बुद्धी आणि उपलब्ध संसाधनांचा सुरेख संगम असतो आणि म्हणून आज सर्व स्तरावरील विकासात्मक उपक्रमासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. सदर पुस्तकात लोकसहभागाचा अर्थ, संकल्पना, व्याख्या, लोकसहभागाकरीता अपेक्षीत कृती योजना, लोकसहभागाच्या संकल्पनेतून झालेले अपेक्षीत परिवर्तन, लोकसहभागाचे प्रकार, लोकसहभागातील अडथळे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय लोकसहभागात्मक मार्गाची आवश्यकता, लोकसहभागात्मक मार्गाचे फायदे, लोकसहभागात्मक मार्गातून प्रश्न सोडविण्याची पद्धत इ. विषयक बाबींवर देखील प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Loksahbhag Aani P.R.A.

  1. लोकसहभाग : व्याख्या, अर्थ, अपेक्षीत कृती योजना, संकल्पना, लोकसहभागाफच्या संकल्पनेतून (अपेक्षीत) झालेले परिवर्तन
  2. लोकसहभागाचे प्रकार : लोकसहभागाचे सर्वसाधारण प्रकार, इतर प्रकार, शहरवासीयांची/नगरवासीयांची सहभागाची शिडी
  3. लोकसहभाग वाढविण्याचे मार्ग व अडथळे : लोकसहभाग कसा मिळविणार/वाढविणार, लोकसहभाग वाढविण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबी, लोकसहभागातील अडथळे
  4. लोकसहभागाची गरज : ऐतिहासिक काळ, स्वातंत्र्योत्तर काळ, 1970 ते 1980 चा कालखंड, लोकसहभागात्मक मार्ग का?, लोकसहभागाचे फायदे
  5. लोकसहभागाचे महत्त्व : लोकसहभागाचे महत्त्व, लोकसहभागाच्या मर्यादा, लोकसहभागात्मक मार्गात अपेक्षीत घटक, नियोजनाची प्रक्रिया
  6. महाराष्ट्रातील विविध लोकसहभागात्मक कार्यक्रम : वॉटरशेड ऑरगानायझेजन ट्रस्ट – माहिती, मुलभूत मुल्ये, विश्वस्त मंडळ, दात्यांची/भागीदारांची यादी
  7. पानी फाउंडेशन – एक लोकसहभागात्मक चळवळ : पानी फाउंडेशन, भारतातील पाणी संकट, पाणी संकटाची कारणे, पाणी संकट आणि उपाययोजना, पाणी फाउन्डेशनची आवश्यकता
  8. स्वच्छ भारत अभियान : पार्श्वभूमी, स्वच्छताविषयक कार्यक्रम, सुरुवात, प्रकार, उद्देश, प्रमुख घटक, भारतातील स्वच्छ शहरांची यादी, आर्थिक सहाय्य, मुख्य प्रचारक
  9. शासनाचा लोकसहभागाकरीता पुढाकार : लोकसहभागाचा कार्यक्रमात्मक मार्ग, लोकसहभागाचा प्रकल्पात्मक मार्ग, लोकसहभागाच्या विविध पद्धती, प्रक्रियात्मक मार्ग, उद्देशाची निश्चिती करणे
  10. पी.आर.ए. – ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन : व्याख्या, सेवाभावी संस्था – अफार्म, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन कार्यपद्धती, गरज/आवश्यकता, वैशिष्ट्ये
  11. ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची (पी.आर.ए.) तत्वे : पी.आर.ए. ची तत्वे, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन (पी.आर.ए.) चे महत्व; ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन/पी.आर.ए. चे प्रकार
  12. ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची महत्त्वपूर्ण साधने : ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची महत्त्वपूर्ण साधने, बदलता सामाजिक प्रवाह/ट्रेड, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाच्या पद्धती
  13. सूक्ष्म नियोजन : महत्त्व, पायर्‍या, अंमलबजावणी, पायर्‍या, आवश्यकता/गरज, कारणे, वैशिष्ट्ये व फायदे (उपयोगीता), प्रक्रियेतील टप्पे, विश्वासावर व समुदायावर आधारीत संस्था

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकसहभाग आणि पी.आर.ए.”
Shopping cart