Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

राजकीय समाजशास्त्राचा परिचय

Introduction of Political Sociology

Rs.395.00

दुसर्‍या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्‍या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्‍या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्‍या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.

Rajkiya Samajshastracha Parichay

  1. राजकीय समाजशास्त्राचा परिचय : प्रस्तावना, राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय?, राजकीय समाजशास्त्राची व्याख्या, राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती, राजकीय समाजशास्त्राची वैशिष्टये वा विशेषता, राजकीय समाजशास्त्राच्या उदयाची कारणे आणि विकासाची कारणमीमांसा, राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप, राजकीय समाजशास्त्र शास्त्र आहे काय?, राजकीय समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राशी संबंध, राजकीय समाजशास्त्र विषयाचे महत्त्व, राजकीय समाजशास्त्राच्या मर्यादा
  2. राजकीय व्यवस्था : राजकीय व्यवस्था म्हणजे काय?, राजकीय व्यवस्था अर्थ आणि व्याख्या; राजकीय व्यवस्थेची कार्य वा कार्यपध्दती – अ) रूपांतराचे कार्य – 1) डेव्हिड ईस्टनचा दृष्टिकोन 2) गॅबिएल आल्मंडचा दृष्टिकोन – आदानाची कार्य, प्रदान प्रक्रियेतील कार्य ब) क्षमतेची कार्य क) संपोषणाचे कार्य; राजकीय व्यवस्थेची वैशिष्टये
  3. राजकीय संस्कृती : प्रस्तावना, राजकीय संस्कृती म्हणजे काय?, राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारे घटक वा आधार, राजकीय संस्कृतीची स्वरूप व वैशिष्टये, राजकीय संस्कृतीची प्रतीके, राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण वा प्रकार, डॉ. फायनर यांनी राजकीय संस्कृतीचे केलेले वर्गीकरण, राजकीय संस्कृतीतील बदल व विकास, बदल घडवून आणणारे घटक, महत्त्व/आवश्यकता, राजकीय संस्कृतीचे ऐहिकीकरण
  4. राजकीय सामाजीकरण : राजकीय सामाजीकरण म्हणजे काय?, राजकीय सामाजिकरण अर्थ व व्याख्या, राजकीय सामाजीकरणाचे स्वरूप, राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया, राजकीय सामाजीकरणाची वैशिष्टये, राजकीय सामाजीकरणाची साधने, अभिकरणे किंवा माध्यमे, राजकीय सामाजीकरणाचे प्रकार किंवा वर्गीकरण, राजकीय सामाजीकरणाची आवश्यकता, गरज वा महत्त्व, राजकीय सामाजीकरण आणि राजकीय संस्कृती परस्परसंबंध, राजकीय व्यवस्था आणि राजकीय सामाजीकरण
  5. राजकीय सहभाग : राजकीय सहभाग म्हणजे काय?, राजकीय सहभागाचा अर्थ व व्याख्या, राजकीय सहभागाचे स्वरूप आणि विशेषता, राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक, राजकीय सहभागाचे प्रकार वा वर्गीकरण, राजकीय सहभागाच्या पातळया, राजकीय सहभागाची प्रमाणभिन्नता, राजकीय सहभागाचे महत्त्व; राजकीय उदासीनता – दौषकदृष्टी वा राजकीय अश्रद्धपणा, राजकीय अलगत्व वा विरक्ती, अनास्था व प्रमाणक-हीनता, हिंसा किंवा हिंसाचार
  6. राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व : राजकीय श्रेष्ठजन म्हणजे काय?, श्रेष्ठीजन व्याख्या वा अर्थ, राजकीय अभिजन वर्गाचे स्वरूप आणि वैशिष्टये; श्रेष्ठीजन, उदय वा सिद्धांत – श्रेष्ठीजनवादाचे स्वरूप, श्रेष्ठीजनाचे स्तर वा प्रकार; राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे आधार – अ) परंपरागत घटक ब) अर्जित घटक क) नेमणुकीची प्रक्रिया ड) निवडणुक प्रक्रिया इ) सत्तेची सोपान परंपरा इ) इतर घटक; श्रेष्ठीजनाचे अभिसरण व बदल, राजकीय अभिजन व जनता, भारतातील राजकीय अभिजन; राजकीय नेतृत्व – नेतृत्व व्याख्या, राजकीय नेतृत्वाचे आधारभूत घटक, राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये व गुण, नेतृत्वाचे राजकीय स्वरूप, शासकिय वा राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये, राजकीय नेतृत्व आणि विचारधारा, राजकीय नेतृत्व आणि अधिमान्यता, राजकीय नेतृत्व आणि राजकीय व्यवस्था
  7. राजकीय बदल, राजकीय विकास आणि राजकीय आधुनिकीकरण : राजकीय बदल म्हणजे काय?, राजकीय बदलाची लक्षणे, राजकीय बदलाला कारणीभूत घटक, राजकीय विकास संकल्पना, राजकीय विकास अर्थ व व्याख्या, राजकीय विकासाचे स्वरूप, राजकीय विकासातील अडथळे, राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन, राजकीय विकासाचे मूलभूत घटक किंवा राजकीय विकास घडविणारे घटक, साधने आणि अभिकरणे, राजकीय विकासाच्या समस्या वा अडचणी, राजकीय विकास आणि राजकीय आधुनिकीकरण, राजकीय परिवर्तन आणि क्रांती; राजकीय आधुनिकीकरण म्हणजे काय? – राजकीय आधुनिकरणाच्या व्याख्या, राजकीय आधुनिकरणाची वैशिष्टये वा उद्दिष्टये, राजकीय आधुनिकीकरणाचे परिणाम, राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरणे, राजकीय आधुनिकीकरणाचे पेचप्रंसग वा अडथळे आणि समस्या; भारतातील राजकीय आधुनिकीकरण
  8. राजकीय संसूचन आणि लोकमत : राजकीय संसूचन म्हणजे काय? – राजकीय संसूचन अर्थ व व्याख्या, राजकीय संसूचनाचे स्वरूप आणि विशेषता, राजकीय संसूचनाचे कार्य, राजकीय संसूचनाची मार्ग, साधने व माध्यमे वा लोकमत निर्मितीची माध्यमे आणि साधने किंवा वृत्त आणि प्रसारमाध्यमाची भूमिका; लोकमत म्हणजे काय? – लोकमत संकल्पना अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टये, लोकमताची विशेषता, लोकमत निर्मितीची प्रक्रिया, लोकमत निर्मितीच्या पायर्‍या, लोकमततील बदल घडवून आणणारे घटक
  9. सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता : सत्ता म्हणजे काय? – सत्ता संकल्पनेची अर्थ व व्याख्या, सत्ता संकल्पनेची वैशिष्टये, सत्ता निर्मितीची साधने, सत्तेचे मूलभूत आधार, सत्ता संकल्पनेचे परीक्षण वा मर्यादा; प्रभाव – प्रभावाची अर्थ व व्याख्या, प्रभावाचे स्वरूप, प्रभावाचे आधार, प्रभावाचे मोजमाप, प्रभाव आणि सत्ता परस्परसंबध आणि फरक; अधिसत्ता किंवा अधिकार – अधिकार संकल्पनेची व्याख्या, सत्ता व अधिकार यांच्यातील परस्परसंबंध व फरक, अधिसत्तेची वैशिष्टये, अधिसत्तेचे प्रकार; अधिमान्यता – अधिसत्तेचा अर्थ व व्याख्या, अधिमान्यतेची प्राप्तीची मार्ग
  10. नोकरशाही : नोकरशाहीची व्याख्या व अर्थ, मॅक्स वेबरचा नोकरशाही सिद्धांत, नोकरशाही सिद्धांताचे परीक्षण, मूल्यमापन वा दोष, नोकरशाहीचे प्रकार, नोकरशाहीची कार्य, नोकरशाहीचे महत्त्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजकीय समाजशास्त्राचा परिचय”
Shopping cart