Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

बालकामगार समस्या व समाधान

Child Labor Problems and Solutions

Rs.275.00

डॉ. आर. के. शेख विदर्भातील प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे गेल्या पाच वर्षापासून पदव्यूत्तर अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणुन अध्यापनाचे कार्य करित आहेत. याआधि त्यांनी या संस्थेअंतर्गत डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे 28 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अध्यापनाचा एकूण अनुभव 33 वर्षाचा आहे. संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च आचार्य पदवी (पीएच.डी.) बालकामगारासारख्या ज्वलंत विषयावर 2007 मध्ये संपादित केली आहे. त्यांच्या आचार्य पदवी संशोधनाचा विषय, ‘अकोला जिल्ह्यातील लघुउद्योगात काम करणार्‍या बालकामगारांच्या समस्या व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण’ हा होता. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थ्यांनी संशोधन प्रबंध विद्यापिठाला सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून आतापर्यंत त्यांचे विविध परिषदांमधून 35 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रे व नियतकालीकांमधून त्यांचे विविध आर्थिक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. एक अभ्यासू, विद्यार्थाप्रिय प्राध्यापक म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत.

Balkamagar Samasya V Samadhan

  1. प्रस्तावना
  2. बालकामगार अर्थ, उगम व इतिहास
  3. बालकामगार कारणे, परिणाम व समस्या
  4. बालकामगारांची व्याप्ती
  5. बालकामगार विविध कायदेशिर तरतूदी
  6. बालकामगार अकोला जिल्हा
  7. उपाययोजना व सूचना

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बालकामगार समस्या व समाधान”
Shopping cart