Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

समाजशास्त्राची ओळख

Introduction to Sociology

Rs.275.00

समाजशाास्त्राच्या उदयाला अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील युरोपमधील सामाजिक, बौध्दिक वातावरण जसे कारणीभूत ठरले तसेच 18 व्या शतकातील औद्यागिक क्रांती आणि पाठोपाठ झालेली फे्रंच राज्यक्रांतीही महत्वाची ठरली. समाजात मुख्यतः युरोपमध्ये त्यामुळे फार मोठे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आले. समाजाच्या पुनर्निर्मितीचा, नव-बांधीणीचा प्रश्न निर्माण झाला. विस्कळीत होऊ घातलेल्या समाजाला व्यवस्थित रुप देणे गरजेचे झाले. यातुनच समाजशास्त्राचा उदय झाला.

समाजशास्त्र हे एक आधुनिक शास्त्र आहे. समाजशास्त्राच्या वस्तुनिष्ठ अध्ययनाला 19 व्या शतकात सुरवात झाली. समाजशास्त्र हे मानवाच्या सर्वसामान्य सामाजिक जीवनाचा अभ्यास करते. मानवी सामाजिक वर्तनाबाबतचे नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो मानवी समाजाच्या आरंभिक टप्यापासून समाजाचे अध्ययन सुरु आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मानवाने समाज निर्माण केला. समाजाला कायम टिकवण्यासाठी मानवाने मूल्ये निर्माण केलीत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, परिवर्तने घडून आली. मानवाचे आचार-विचार काळानुसार बदलले. परंतु सामाजिकता मात्र टिकून राहीली.
सदरील पुस्तकात समाजशास्त्राचा इतिहास, समाजशास्त्रीय संकल्पना, सामाजिक नियंत्रण आणि परिवर्तन, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक संस्था, राज्य आणि समाजव्यवस्थेची आव्हाने या घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

Samajshastrachi Olkha

  1. समाजशास्त्राचा इतिहास : समाजशास्त्राचा उगम आणि विकास, समाजशास्त्राचे स्वरुप, समाजशास्त्राचा अभ्यासविषय, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध, समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व.
  2. समाजशास्त्रीय संकल्पना : सामाजिक संरचना – अर्थ आणि घटक, सामाजिक गट/समूह, समुहाचे प्रकार, प्रमाणके (नियमने), सामाजिक मूल्ये. संस्कृती – अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, घटक, समुह केंद्रीतता- व्याख्या, गुण, दोष. सामाजिकरण- अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये आणि साधने. पुनर्सामाजिकरण- व्याख्या, प्रकार, तत्त्वे.
  3. सामाजिक नियंत्रण आणि परिवर्तन : सामाजिक नियंत्रण- अर्थ, व्याख्या, प्रकार, सामाजिक नियंत्रणाची गरज. सामाजिक परिवर्तन- व्याख्या, सामाजिक परिवर्तनाला जबाबदार ठरणारे घटक, सामाजिक परिवर्तनास अडथळा आणणारे घटक.
  4. सामाजिक स्तरीकरण : सामाजिक स्तरीकरण – अर्थ व स्वरूप, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार-1) आवृत्त/बंद स्तरीकरण – जाती व्यवस्था-अर्थ, वैशिष्ट्ये, 2) मुक्त/खुले स्तरीकरण – वर्गव्यवस्था- अर्थ, वैशिष्ट्ये, जातिव्यवस्थेचे बदलते स्वरूप. आदिवासी समाज – व्याख्या व वैशिष्ट्ये.
  5. सामाजिक संस्था : कुटूंब व्यवस्था- अर्थ व वैशिष्ट्ये, कुटुंबाची कार्ये, प्रकार, विवाहाचे बदलते स्वरूप. नातेसंबंध – अर्थ, वैशिष्ट्ये. विवाहसंस्था- अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार.
  6. राज्य आणि समाजव्यवस्थेची आव्हाने : एकता आणि विविधता- अर्थ व वैशिष्ट्ये, सामाजिक विविधतेला कारणीभूत घटक, प्रकार, सामाजिक एकतेला कारणीभूत घटक, भारतीय समाजातील एकता. धर्मनिरपेक्षता- अर्थ व वैशिष्ट्ये, धर्मनिरपेक्षता आणि भारत. सांप्रदायिकता – अर्थ व वैशिष्ट्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समाजशास्त्राची ओळख”
Shopping cart