Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

सामाजिक विचारवंत

Social Thinkers

,

Rs.175.00

समाजशास्त्रातील आघाडीचे समाजशास्त्रज्ञ ऑगस्त कॉम्प्ट व हर्बर्ट स्पेन्सर आणि अभिजात परंपरेत येणारे व समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे एपिल दुर्खिम, मॅक्स वेबर, विल्फ्रेडो पॅरेतो, कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात विचारांची ओळख व्हावी आणि वर्तमानकाळात देखील त्यांचे विचार व सिद्धांत कसे समायोजित ठरणारे आहेत याचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे हा त्या सैद्धांतिक व पद्धतीशास्त्रीय मुद्यावर भर देणारा आहे. जे मुद्दे आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात समाजशास्त्रज्ञांच्या विचाराला चालना व विशिष्ट आकार प्राप्त करुन देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत तेच मुद्दे समकालीन समाजशास्त्रांच्या वैचारीक मांडणीतून आढळतात. एखाद्या ज्ञानशाखेला विज्ञानाचा अथवा शास्त्राचा दर्जा प्राप्त व्हायचा असेल तर स्वतंत्र्य अभ्यासविषय, पद्धतीशास्त्र व प्रबळ सैद्धांतिक चौकट या अटींची पूर्तता व्हावी लागते. ऑगस्त कॉम्प्ट, हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या लिखाणामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून चर्चेत आले. परंतु समाजशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित करण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या कालखंडातील अभिजात विचार परंपरेत येणार्‍या एपिल दुर्खीम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, विल्फ्रेडो पॅरेतो या समाजशास्त्रज्ञांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रस्तुत पुस्तक हे समाजशास्त्राचे अध्ययन व अध्यपन करणार्‍या विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

Samajik Vicharwant

  1. सामाजिक विचार : प्रस्तावना, सामाजिक विचाराचा अर्थ, सामाजिक विचारांच्या व्याख्या, सामाजिक विचाराचे स्वरुप, सामाजिक विचारांची वैशिष्ट्ये, सामाजिक विचारांचा ऐतिहासिक विकास, समाजशास्त्रीय विचारांचा उदय, प्रबोधन युग, प्रबोधन युगाचा समाजशास्त्राच्या विकासावरील प्रभाव, प्रबोधनयुगातील बौद्धिक प्रभाव, प्रबोधन युगानंतरचा बौद्धीक प्रभाव, फ्रेंच राज्यक्रांती, फ्रान्स क्रांतीशी संबंधीत कारणे
  2. ऑगस्ट कॉम्प्ट : जीवनवृत्तांत, ग्रंथसंपदा, मानवी प्रगतीचे नियम, कॉम्प्टचे शास्त्राचे वर्गीकरण, कॉम्प्टच्या शास्त्राच्या वर्गीकरणाचे टिकात्मक परिक्षण, सामाजिक स्थितीशास्त्र व सामाजिक गतिशास्त्र, सामाजिक स्थितीशास्त्र व सामाजिक गतिशास्त्राचे टिकात्मक परिक्षण, प्रत्यक्षवाद/विज्ञानवादाचा सिद्धांत, प्रत्यक्षवाद/विज्ञानवादाचा सिद्धांताचे टिकात्मक परिक्षण
  3. एमिल दुर्खिम : प्रस्तावना, जीवन वृत्तांत, दुर्खिमची प्रमुख ग्रंथसंपदा, दुर्खिमचा श्रमविभाजनाचा सिद्धांत, श्रमविभाजनाचा अर्थ, श्रमविभाजनाचे अध्ययन करण्याचे उद्देश, श्रमविभाजनाचे प्रकार्य, श्रमविभाजनाची कारणे, श्रम विभाजनाचे परिणाम, दुर्खिमच्या श्रमविभाजनाचे असामान्य प्रकार, श्रमविभाजनाच्या सिद्धांतावर टिका, आत्महत्या सिद्धांत, आत्महत्येची व्याख्या, आत्महत्येची कारणे, सामाजिक तथ्य, सामाजिक तथ्याची व्याख्या, सामाजिक तथ्यांची वैशिष्ट्ये, सामाजिक तथ्याचे निरिक्षण
  4. कार्ल मार्क्स : मार्क्सचा जीवनवृत्तांत, मार्क्सची प्रमुख ग्रंथसंपदा, मार्क्सची ऐतिहासिक भौतिकवादाची संकल्पना, ऐतिहासिक भौतिकवादाची व्याख्या, ऐतिहासिक भौतिकवादाचे मुलतत्त्व, वर्ग आणि वर्ग संघर्ष सिद्धांत, वर्गाचा अर्थ आणि व्याख्या, वर्गाचे लक्षण, वर्गाचे प्रकार, वर्गाची उत्पत्ती, विविध समाजामधील वर्ग, वर्ग संघर्ष सिद्धांत, वर्ग संघर्षावरील टिका
  5. मॅक्स वेबर : प्रस्तावना, मॅक्स वेबरचा जीवन परिचय, वेबरचे प्रमुख ग्रंथ, वेबरची समाजशास्त्राची संकल्पना, सामाजिक क्रियेचा सिद्धांत, सामाजिक क्रियेची व्याख्या, सामाजिक क्रियाची लक्षणे, सामाजिक क्रियेचे प्रकार, सामाजिक क्रियेच्या सिद्धांतावर टिका, शक्ती व सत्तेची संकल्पना, शक्तीची संकल्पना, शक्तीचे लक्षणे, सत्तेची संकल्पना, अधिकार किंवा प्रभुत्व प्रकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सामाजिक विचारवंत”
Shopping cart