Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

आधुनिक जाहिरात तंत्र

Modern Advertising Technique

,

Rs.195.00

आजच्या स्पर्धाच्या युगात जाहिरात कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जाहिरात सेवेला जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणारे बदलाचे पडसाद व्यवसायामध्ये दिसून येतात. प्रत्येक उत्पादक आणि व्यावसायिक संस्था आपल्या विक्रय वस्तूंच्या जाहिरातवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतांना दिसून येतात. अलिकडे जाहिरात हा खर्च नसून ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते. जाहिरातीमध्ये सुरक्षितता, सौंदर्य, आरोग्य, आत्मविश्वास, प्रेम, वात्सल्य, चिंता इ. क्रयप्रेरणांपैकी योग्य खरेदी प्रेरणाव्दारे आवाहन केले जाते. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्रहकांच्या मनावर आघात करीत असते. आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत, वस्तू किंवा सेवांची विक्री वाढावी बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक असते.

Aadhunik Jahirat Tantre

  1. जाहिरातीची ओळख : 1.1 जाहिराती : अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.2 आधुनिक विपणन युगात जाहिरातीचे महत्त्व, 1.3 विपणन मिश्र मधील जाहिरातीची भूमिका, 1.4 जाहिरातीचे प्रकार/वर्गीकरण, 1.5 जाहिरातीचे आर्थिक व सामाजिक परिणाम.
  2. जाहिरातीची माध्यमे : 2.1 जाहिरात माध्यमांचे प्रकार/वर्गीकरण, 2.1.1 छापील माध्यम, 2.1.2 इलेक्ट्रॉनिक माध्यम, 2.1.3 बाह्य/बर्र्हिगत/अप्रकाशित माध्यमे, 2.1.4 चल/धावते वाहन माध्यम, 2.2 जाहिरात माध्यमाची निवड करताना लक्षात घ्यावयाचे घटक, 2.3 जाहिरात : माध्यम मिश्र आणि माध्यम वेळापत्रक, 2.3.1 माध्यम मिश्र, 2.3.2 माध्यम वेळापत्रक, 2.4 माध्यम नियोजन.
  3. जाहिरातीतील सर्जनशिलता : 3.1 जाहिरात मसुदा/मजकूर, 3.1.1 मुद्रीत/छापील जाहिरात मसुदा : अर्थ आणि घटक, 3.1.2 चांगल्या जाहिरात मसुद्याची गुणवैशिष्ट्ये, 3.1.3 जाहिरात मसुदा लेखनाचे प्रकार, 3.2 जाहिरातीचा आराखडा, 3.2.1 जाहिरात आराखडा : अर्थ, घटक आणि प्रकार, 3.2.2 जाहिरात आराखड्यावर परिणाम करणारे घटक, 3.2.3 चांगल्या जाहिरात आराखड्याची गुणवैशिष्ट्ये/घटक.
  4. जाहिरात अंदाजपत्रक : 4.1 जाहिरात अंदाजपत्रक : अर्थ, व्याख्या, महत्त्व, 4.2 जाहिरात अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया, 4.3 जाहिरात अंदाजपत्रक तयार करण्याच्या पद्धती, 4.4 जाहिरात अंदाजपत्रकाचे दृष्टीकोन, 4.5 जाहिरात अंदाजपत्रकाचे फायदे/गुण आणि तोटे/मर्यादा.
  5. जाहिरात संस्था : 5.1 जाहिरात संस्थाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि अर्थ, 5.2 जाहिरात संस्थांची उत्क्रांती आणि ऐतिहासिक मागोवा, 5.3 जाहिरात संस्था निवडीचे निकष, 5.4 जाहिरात संस्था आणि खातेदार (जाहिरातदार संस्था) नातेसंबंध, 5.5 जाहिरातीमधील कारकीर्दीसंबंधी पर्याय, 5.6 जाहिरात प्रतिनिधी संस्थेचे भवितव्य.
  6. जाहिरातीचे नियमन आणि नियंत्रण : 6.1 भारतीय जाहिरात मानके परिषद, 6.2 दूरदर्शनवर जाहिरात प्रसारीत करण्याचे अधिनियम, 6.3 माहिती आणि प्रसारण मंत्रालय, 6.4 जाहिरातीमधील नैतिक मूल्ये.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक जाहिरात तंत्र”
Shopping cart