Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यवहारिक कौशल्ये विकास

Soft Skills Development

, ,

Rs.135.00

मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवाला विविध कौशल्ये प्राप्त करावी लागतात. मानवाला जीवनाची कारकिर्द व पेशा सुरू करण्यासाठी, त्याच्याजवळ पात्रता कौशल्ये असणे आवश्यक असते. मनुष्याला पेशा सुरू करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे लागते. त्याशिवाय पेशा सुरू करता येत नाही. व्यवहारिक कौशल्यास व्यक्तीनिष्ठ कौशल्य किंवा अंतर व्यक्तीगत कौशल्य असेही म्हणतात. इतर व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग तसेच परस्पर संबंध निर्माण करण्याचा मार्ग व्यवहारिक कौशल्य दर्शवित असते. सामाजिक आनंद, संभाषण प्रतिभा, भाषा कौशल्ये, व्यक्तीगत वर्तणूक, बौद्धीक किंवा भावनिक सहानुभूती आणि नेतृत्व वैशिष्ट्ये यांच्याशी व्यवहारी कौशल्याचा संबंध येतो. व्यवहारी कौशल्ये आणि पात्रता कौशल्ये यात फरक आहे. विशिष्ट व्यक्तीला त्याच्या विशिष्ट पेशामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवहारिक कौशल्ये महत्वाची भूमिका बजवित असतात. माहिती व ज्ञानाच्या आधारे कार्यस्थळावर त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व व महत्व सिद्ध करण्यासाठी व्यवहारी कौशल्ये सहाय्य करीत असतात. सर्वसाधारण कौशल्ये व बुद्धीमत्ताद्वारे नोकरीचा शोध घेणार्‍या व्यक्तीला उच्च स्पर्धात्मक कार्पोरेट जगात सर्व श्रेष्ठत्व सिद्ध करून देण्यास मदत करीत असते.

सदर पुस्तकात व्यवहारी कौशल्ये विकास याची तोंड ओळख, वेळ व्यवस्थापन कौशल्ये, ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्ये, समस्या निवारण आणि निर्णय निश्चितीकरण कौशल्ये, समूहकार्य व समूह बांधणी कौशल्ये आणि अध्ययन कौशल्ये संबंधी घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या प्रभावी भाषेत केलेली आहे. हा ग्रंथ चोखंदळ शिक्षक व विद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास आहे.

Vyavharik Kaushalye Vikas

  1. व्यवहारिक कौशल्ये – तोंड ओळख : प्रस्तावना, व्यवहारिक कौशल्याचा अर्थ आणि व्याख्या, व्यवहारिक कौशल्याचे ठळक वैशिष्ट्ये, व्यवहारिक कौशल्यांचे महत्त्व, प्रकार, स्वॉट विश्लेषण, प्रेरणा किंवा अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा, प्रेरणाची ठळक वैशिष्ट्ये, प्रेरणाचे महत्त्व, आवश्यकता किंवा गरज, प्रेरणांचे स्त्रोत किंवा मार्ग, शिष्टाचार, शिष्टाचाराची आवश्यकता किंवा गरज.
  2. वेळेचे व्यवस्थापन किंवा समय व्यवस्थापन कौशल्य : प्रस्तावना , वेळेची ठळक वैशिष्ट्ये, वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय?, वेळ व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये, वेळ व्यवस्थापनाचे महत्व, वेळ व्यवस्थापनाचे फायदे किंवा लाभ, वेळ व्यवस्थापनाची तंत्रे, आदर्श किंवा परिणामकारक वेळ व्यवस्थापनासाठी आवश्यक बाबी, वेळ व्यवस्थापनाची साधने, वेळ व्यवस्थापनातील व्यूहरचना.
  3. ताण तणाव व्यवस्थापन कौशल्य : प्रस्तावना, ताण तणाव म्हणजे काय?, ताण तणावाचे लक्षणे, ताण तणाव निर्माण करणारे घटक, ताण तणावाचे प्रकार, परिणाम, ताण तणाव समस्येवर उपाययोजना किंवा व्यूहरचना, ताण तणाव व्यवस्थापन म्हणजे काय?, ताण तणाव व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये, ताण तणाव व्यवस्थापनाचे महत्व किंवा उपयुक्तता.
  4. समस्या निवारण आणि निर्णय निश्चितीकरण कौशल्य : प्रस्तावना, समस्या ओळखणे आणि स्पष्ट करणे, समस्या निवारण – कल्पनामंथन, कल्पनामंथनाचे टप्पे, चिकित्सक विचार आणि रचनात्मक विचार, चिकित्सक विचार कौशल्याचे महत्व, रचनात्मक विचार – रचनात्मक विचार कौशल्याची वैशिष्ट्ये.
  5. सांघिक कार्य आणि संघ बांधणी कौशल्य : सांघिक कार्य आणि संघबांधणी संकल्पना, संघ व्यवस्थापन, संघर्ष निरसन, संघटनेतील संघांची भुमिका किंवा प्रकार, नेतृत्व कौशल्य, नेतृत्वाचे प्रकार, नेतृत्वाचे गुण, नेतृत्वाची कार्ये, व्यावसायिक नेटवर्किंग.
  6. अध्ययन कौशल्य : अध्ययन म्हणजे काय?, अध्ययन ही आजन्य चालणारी प्रक्रिया आहे-जॉन ड्युई, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये, अध्ययनांचे प्रकार, अध्ययन सिद्धांत आणि प्रतिकृती, स्मृती किंवा स्मरण तंत्रे, मनोमापन (माईंडमापन), व्यावसायिक विकासासाठी रोजनिशी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवहारिक कौशल्ये विकास”
Shopping cart