Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे

Principles of Business Organisation

, ,

Rs.325.00

व्यवसाय ही एक व्यापक संकल्पना असून त्यामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करणे, उपयुक्तता निर्माण करणे आणि पैसा मिळविणे यासाठी केल्या जाणार्‍या मानवी आर्थिक कृतींचा समावेश होतो. व्यवसाय म्हणजे सतत कार्यमग्न राहण्याची स्थिती असून हे कार्य उत्पादन, विनिमय, वितरण व संबंधीत सेवांचे असू शकते. नफा मिळविणे हा व्यवसायाचा प्रमुख उद्देश असतो. त्याबरोबरच समाजाला आवश्यक असणार्‍या वस्तू व सेवांचा मागणीनुसार पुरवठा करुन व्यवसायाद्वारे लोकांच्या गरजा भागविल्या जातात. उद्योग, व्यापार, वाणिज्यविषयक सेवा आणि प्रत्यक्ष सेवा या सर्वांचा व्यवसायात समावेश होतो. व्यवसायाचे वर्गीकरण उद्योग आणि वाणिज्य या दोन प्रमुख भागात केले जाते.

विषयाशी संबंधीत सखोल पण आवश्यक माहिती मिळावी आणि विद्यापीठीय परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखन करताना अनेक मराठी-इंग्रजी संदर्भ पुस्तके, वेबसाईटस व शोधनिबंधाचा आधार घेतलेला आहे जेणेकरुन विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचलक यांना देखील सदरील पुस्तक उपयुक्त ठरेल.

Vyavsay Sanghatneche Multatve

  1. वाणिज्य आणि उद्योग : 1.1. वाणिज्य आणि उद्योग : अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती- अर्थ, व्याप्ती, उत्क्रांती, वाणिज्याचा अर्थ, व्याणिज्याची व्याप्ती, वाणिज्याची उत्क्रांती. 1.2 औद्योगिक क्रांती – प्रस्तावना, औद्योगिक क्रांतीचा अर्थ, यंत्रपूर्वयुग- औद्योगिक क्रांतीपुर्वीचा काळ, यंत्रयुग-औद्यागिक क्रांतीनंतरचा काळ, औद्यागिक क्रांतीचे वैशिष्ट्ये, औद्यागिक क्रांतीचे परिणाम, 1.3 भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या -प्रस्तावना,बहुराष्ट्रीय कंपन्या: अर्थ आणि संकल्पना, प्रारंंभ व विकास
  2. व्यवसाय : 2.1. व्यवसायाची क्षेत्रे व स्वरूप – प्रस्तावना, व्यवसायाची क्षेत्रे व स्वरूप, 2.2. व्यवसाय संघटनांचे प्रकार – प्रस्तावना, 2.3. असंघटीत व्यवसाय – किरकोळ व्यापार -प्रकार, 2.4. ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार – प्रस्तावना, ई-कॉमर्स व ऑनलाईन व्यापार यांचा अर्थ, ऑनलाईन व्यापार, ई-कॉमर्सच्या व्यवहारातील टप्पे किंवा इंटरनेटवर ऑनलाईन व्यापार प्रक्रीया, पारंंपारीक व्यापार आणि ई-वाणिज्य यांच्यातील फरक, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापारातील प्रमुख संकल्पना, फायदे, मर्यादा.
  3. विलीनीकरण आणि अधिग्रहण : 3.1 विलीनीकरण – संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये, तत्त्वे, कारणे/उद्दिष्टे, प्रकार, फायदे-दोष. 3.1.1. अधिग्रहण किंवा संपादन – प्रस्तावना, व्याख्या, वैशिष्ट्ये, कारणे, तत्वे, फायदे-दोष. 3.2 व्यवसायाचे नेटवर्किंग- व्याख्या, वैशिष्ट्ये, फायदे, 3.3. व्यवसायाधिकार किंवा मक्ताधिकार – अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, पायर्‍या किंवा टप्पे, फायदे 3.3.1. डिलरशिप – डिलरशिपचे फायदे 3.3.2. व्यावसायिक विक्री केंद्र. 3.4 व्यवसाय प्रक्रिया बाह्य स्त्रोत- संकल्पना, फायदे, मर्यादा
  4. नवीन उपक्रम : 4.1 उपक्रम उभारणीचा निर्णय, 4.2 व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध, 4.3 उपयोजित (सर्जनशील) आणि नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणार्‍या उद्योजकाची भूमिका, 4.4 व्यवसायाची व्यवहार्यता किंवा योग्यता आणि व्यावसायिक नियोजन, 4.5 व्यवसायाचा आकार किंवा आकारमान, आकारमानांचे मोजमाप, व्यवसायसंस्थेच्या आकारमानावर परिणाम करणारे घटक व आकारमानाचा निर्णय, व्यवसाय संस्थेचा पर्याप्त आकारमान, उद्योगाचा स्थानीकरणाचा निर्णय
  5. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था : 5.1 घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार- घाऊक व्यापार-अर्थ, वैशिष्ट्ये कार्ये/सेवा. किरकोळ व्यापार – वैशिष्ट्ये, कार्ये किंवा सेवा प्रकार, मॉलची परंपरागत व आधुनिक संकल्पना, वैशिष्ट्ये, उदय आणि विकास, मॉलची संख्या, नव्या संकल्पनेचा उदय, ‘मॉल’ किरकोळ विक्री व्यवस्थेचे फायदे. सुपर मार्केट विक्री व्यवस्था-व्याख्या, वैशिष्ट्ये, हायपर मार्केट विक्री व्यवस्था, वैशिष्ट्ये. 5.3 स्पेशालिटी स्टोअर्स- प्रकार, वैशिष्ट्ये, सोयीची विक्री केंद्र – अर्थ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे”
Shopping cart