Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संशोधन

शास्त्रीय संशोधन पद्धती

Scientific Research Methodology

,

Rs.150.00

नवीन आणि अनपेक्षित परिस्थिती संशोधकास संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करते. जीवनातील कोणतेही कार्य असो ते पार पाडण्यासाठी प्रथम कार्याचे नियोजन तयार करावे लागते. आपल्या या नियोजनामुळे त्या कार्याला सुसूत्रता येते. त्या कार्याचे पद्धतशीर रचना, मांडणी ठरवावी लागते. वैज्ञानिक पद्धतीनुसार संशोधनाची सुरूवात समस्या सूत्रण किंवा विषय निवड करण्यापासून केली जाते. आणि शेवटी त्या संशोधनातून निष्कर्ष काढून त्याचा अहवाल तयार केला जातो. समग्रातील निवडलेल्या एककाच्या पाहणीवरून समष्टीबाबत सामान्य स्वरूपाचे निष्कर्ष काढता येतात. संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखणे, गृहीतकृत्य असेल तर त्याची चाचणी घेणे किंवा संशोधन प्रश्नाची उत्तरे मिळविणे या वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. संशोधनात विविध नमुना निवड पद्धतींचा उपयोग नेहमीच केला जातो. सदरील पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक तसेच अध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.

Shastriya Sanshodhan Paddhati

  1. संशोधन पद्धतीचा परिचय : 1.1 संशोधन : स्वरूप, वैशिष्ट्ये, व्याप्ती/क्षेत्र आणि गरज, 1.2 संशोधनाचे वर्गीकरण : मौलिक, शुद्ध किंवा सैद्धांतिक संशोधन, व्यावहारिक संशोधन आणि क्रियात्मक संशोधन, 1.3 वर्णनात्मक संशोधन : सर्वेक्षण पद्धती, व्यष्टी अध्ययन, 1.4 ऐतिहासिक संशोधन : पायर्‍या/उगमस्थाने, प्राथमिक-दुय्यम तंत्रे, ऐतिहासिक निकष, 1.5 मानसशास्त्रीय/तत्वज्ञान संशोधन : अर्थ, पायर्‍या, उणीवा/अडचणी आणि तथ्यांचे संकलन/एकत्रीकरण, 1.6 गुणात्मक संशोधन : व्यष्टी अध्ययन, मानववंशशास्त्र, इंद्रियंगोचर, 1.7 प्रायोगिक संशोधन : अर्थ, स्वरूप, महत्व, प्रायोगिक संशोधनात चराचे उपयोग
  2. संशोधन प्रस्ताव : 2.1 संशोधन प्रस्ताव : संकल्पना, गरज, महत्व, प्रकार, 2.2 संशोधन समस्या : अर्थ, प्रकार, उगमस्थाने, महत्व, समस्येच्या अटी/क्षेत्र, संशोधन समस्येच्या निवडीबाबत निकष, संशोधन समस्यांचे मूल्यांकन, 2.3 उद्दिष्ट्ये : संकल्पना, स्वरूप आणि प्रकार, 2.4 संशोधन चर/परिवर्त्य : अर्थ, प्रकार, 2.5 गृहितकृत्य : अर्थ, गरज, वैशिष्ट्ये, उगमस्थाने प्रकार, गृहितकृत्याचे परिक्षण (पॅरामेट्रीक व नॉन पॅरामेट्रीक), 2.6 उरकुंडची विरोधी वा प्लमय यंत्रणा
  3. नमुना निवड व संशोधन तंत्रे/साधने : 3.1 नमुना निवड : अर्थ, व्याख्या, संकल्पना, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्ये, नमुना निवडीच्या त्रुटी, नमुना निवडीचे प्रकार (साधा, स्तरित, व्यवस्थाबद्ध, बहुपदी, बव्हव्यवस्थीय) गैर संभाव्यता नमुना निवड पद्धती (सोपीस्कर/सुविधाजनक नमुना, सहेतूक किंवा उद्देशपूर्ण नमुना, कोटा नमुना, स्वयं निर्वाचित नमुना), 3.2 संशोधन साधने/तंत्रे : संकल्पना आणि स्वरूप संशोधनाचे विविध प्रकार (मुलाखत, निरीक्षण, समाजमिती, हिस्टोग्राम, प्रश्नावली, अनुमान तंत्रे – थसर्टन/लिंकन, तंत्रे आणि तीव्रतामापक/श्रेणी निर्धारक अनुमापन, 3.3 सांख्यिकीय परिक्षण : टी परिक्षण, झेड परिक्षण, काई स्क्वेअर, अनोवा, एसपीएसएसचे उपयोग, एमएस एक्सेल
  4. संभाव्यता विभाजन आणि बिंदुरेषीय अनुमानात्मक सांख्यिकी : 4.1 समतोल वक्र : संभाव्यतेचा अर्थ, समतोल वक्राचे गुणधर्म व तत्व सांख्यिकीय तथ्यांचे रेषाचित्राद्वारे प्रस्तुतीकरण (विखुरलेले चित्र, रेखीय चित्र, दंडचित्र, हिस्टोग्राम, वारंवारता वक्र, ओग्रीव्ह वक्र), 4.2 परिक्षण : महत्वपूर्ण अर्थ वितरण आधारावर परिक्षण, स्वतंत्र आणि परावलंबी नमुने, टी परिक्षण, काई – स्क्वेअर (वर्ग) परिक्षण, 4.3 सहसंबंध : अर्थ सहसंबंध गुणक मापन करण्याच्या पद्धती आणि श्रेणी, अंतर पद्धत, 4.4 अनोवाची एकमार्गी संकल्पना : अनकोवाचा सिद्धांत
  5. संशोधन प्रस्ताव व संशोधन अहवालाचे मूल्यांकन : 5.1 संशोधन अहवालाचा आकृतीबंध, 5.2 प्राथमिक पृष्ठ विभाग : शीर्षक पृष्ठ – सहयोग देणार्‍यांना धन्यवाद – अनुक्रमणिका, 5.3 मुख्य विभाग : प्रस्तावना/विषय प्रवेश, संशोधन प्रणाली, सामुग्री विश्लेषण, सूचना व निष्कर्ष, गृहीतके, स्पष्टता प्रस्तावाचा मर्यादा, संशोधन पद्धती, 5.4 संशोधन पूर्व आढावा : प्रस्तावाची योजना, सांख्यिकीय विश्लेषण, तथ्य संकलन, प्रस्तावाचे विश्लेषण, प्रस्तावाचा सारांश निष्कर्ष, शिफारशी संदर्भ, ग्रंथसूची, सूचीपत्र, एपीए, एमएलए शिकागो पद्धत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शास्त्रीय संशोधन पद्धती”
Shopping cart