Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण (बी.एड.द्वितीय वर्ष)

Guidance, Counseling and Inclusive Education

,

Rs.295.00

आधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयाचा समावेश झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व एकमेवद्वितीय असते. त्याचा समस्या व गरजा वेगवेगळ्या असतात. यात सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थीदेखील आहेत. या सर्वांना समजून घेणे, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट्य आहे. वर्तमानकालीन सामान्यांच्या शाळेतच विशेष गरज असलेल्या बालकांना शिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे बालक सर्वसामान्य शाळेत सामावून घेणे ही शाळा, शिक्षक, प्रशासक यांची जबाबदारी आहे. प्रस्तुत पुस्तकात वरील घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Margadharshan, Samupdeshan & Samaveshak Shikshan

1. शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचे आकलन :
1.1 मार्गदर्शनाचा अर्थ आणि गरज
1.2 करिअर मार्गदर्शनाची उद्दिष्टे-स्व-आकलन, स्व-शोध, आत्मनिर्भरता, स्व-निर्देशन, आत्मप्रचिती
1.3 करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाची व्याप्ती, प्रक्रिया आणि करिअर विकासावर परिणाम करणारे घटक
1.4 विद्यार्थ्यांच्या करिअर विकास गरजा

2. शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमातील आवश्यक सेवा :
2.1 मार्गदर्शन सेवा प्रकार- उद्बोधन, माहिती, समुपदेशन, स्थापना सेवा, अनुधावन, संशोधन आणि मूल्यमापन
2.2 शालेय मार्गदर्शन समिती- स्थापना, भूमिका आणि कार्ये
2.3 शालेय अभ्यासक्रमात मार्गदर्शनाचे स्थान
2.4 शालेय मार्गदर्शन कार्यक्रमात प्राचार्य आणि शिक्षकाची भूमिका

3. समुपदेशन :
3.1 समुपदेशनाचा अर्थ, स्वरुप आणि व्याप्ती
3.2 समुपदेशनाची उद्दिष्टे- समस्यांवरील उपाय/निर्णय, वर्तन सुधारणा, मानसिक आरोग्य वृद्धी
3.3 मार्गदर्शन आणि समुपदेशनातील संबंध
3.4 समुपदेशन प्रक्रियेचे टप्पे आणि तंत्रे

4. मार्गदर्शन आणि समुपदेशनाचे प्रकार :
4.1 मार्गदर्शनाचे प्रकार- शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगार/करिअर
4.2 समुपदेशनातील समूहप्रक्रियेचे उपयोग
4.3 समुपदेशनाची क्षेत्रे- कुटुंब, पालक, कुमार, मुली, विशेष गरजा असलेल्या बालकांचे समुपदेशन
4.4 समवयस्क समुपदेशन-संकल्पना आणि भारतीय परिस्थितीत त्याचे महत्व

5. समावेशक शिक्षणाची ओळख :
5.1 समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि वैशिष्टे
5.2 समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे व व्याप्ती
5.3 व्यक्ती व समाजासाठी समावेशक शिक्षणाचे फायदे
5.4 विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण आणि समावेशक शिक्षणातील फरक
5.5 समावेशक शिक्षणासंदर्भात शिक्षण आयोग व समितींच्या शिफारशी
5.6 समावेशक शिक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रारंभ

6. समावेशक शिक्षणासाठी शिक्षक सज्जता :
6.1 समावेशक वातावरणात माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांची आवश्यक कौशल्ये व क्षमता
6.2 समावेशक शिक्षणात शिक्षकाच्या भूमिका, जबाबदाऱ्या व व्यावसायिक नीतितत्वे
6.3 शिक्षक सज्जता आणि अध्यापनाचे मार्गांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शिक्षक शिक्षण) 2009
6.4 बोधात्मक आणि बोधात्मक व्यतिरिक्त इतर निष्पत्तीच्या समावेशक मूल्यमापनासाठी मूलभूत तंत्रे आणि साधने
6.5 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची समावेशक शिक्षणाच्या विकासात भूमिका
6.6 समावेशक शिक्षणातील संशोधनाचे नवीन प्रवाह
6.7 समावेशक शिक्षण व संशोधनासाठी आधारभूत सेवा

7. विविध गरजा असणारी बालके आणि संसाधनाचे उपयोग :
7.1 श्रवणदोष, दृष्टिदोष आणि शारीरिक अपंगत्व, सामाजिक आणि भावनिक समस्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, अवसंपादन (अपेक्षेपेक्षा कमी संपादणूक), गतिमंद, आरोग्यविषयक समस्या असणारी बालके, पर्यावरणीय समस्या असलेली बालके, व्याख्या आणि वैशिष्टे
7.2 सर्व समावेशक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाची भूमिका आणि शैक्षणिक कौशल्य विकासामध्ये शिक्षकांकरीता स्त्रोत किंवा संसाधन
7.3 अध्ययनकर्त्यांच्या विविध गरजा भागविण्यात तंत्रविज्ञानाची भूमिका
7.4 सेवा दृष्टीकोनाचे प्रकार, कार्यनीती, व्यक्तिगत सहभाग त्यांचे विशिष्ट कार्य व जबाबदाऱ्या
7.5 विविध गरजा असलेल्या बालकांसाठी आवश्यक साधन स्त्रोतांचा परिचय

8. भारतातील सामाजिकदृष्ट्या मागासलेली बालके : दर्जा आणि सुविधा :
8.1 सामाजिकदृष्ट्या मागासलेली बालके ः अर्थ
8.2 भारतातील सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले अल्पसंख्यांक आणि झोपडपट्टीत राहणारी मुले
8.3 भारताच्या राज्यघटनेने सामाजिक समता आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विभागाच्या शिक्षणासाठी केलेल्या तरतुदी
8.4 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, कृती कार्यक्रम 1992, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005
8.5 सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या बालकांची संपादणूक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण (बी.एड.द्वितीय वर्ष)”
Shopping cart